विराटच्या राजीनाम्यानंतर अनिल कुंबळे पुन्हा मुख्य प्रशिक्षक?, का दिला होता कुंबळेने राजीनामा?
विराट कोहली भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडताच नवा कर्णधार कोण या चर्चेसह, आता नवा मुख्य प्रशिक्षक कोण या चर्चेलाही उधाण आलं आहे. कारण रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपत आला असून ते पुढे हा कालावधी वाढवण्यातही इच्छूक नाहीत.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 16 सप्टेंबर रोजी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याच्या या घोषणेनंतर आता नवा कर्णधार कोण? या चर्चेला तर उधाण आलंच आहे. पण सोबतच नवा मुख्य प्रशिक्षक अर्थात हेड कोच कोण? ही चर्चा देखील सुरु आहे. याचे कारण रवी शास्त्री यांच्या कोच पदाचा कार्यकाळ संपत आला असून त्यांना तो पुढे वाढवायचा नाही. त्यामुळे ते देखील पायउतार होणार असून त्यांच्या जागी काही नावांची चर्चा आहे. आधी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा होती. पण आता नवीन नाव समोर येत असून हे म्हणजे अनिल कुंबळे (Anil Kumble) हे आहे.
सध्या भारतीय संघाचे हेड कोच रवी शास्त्री, बोलिंग कोच भरत अरूण आणि फील्डिंग कोच आर. श्रीधर या सर्वांचा कार्यकाळ T20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे BCCI या सर्वांसाठी पर्याय शोधत असून इंडियन एक्सप्रेसच्या वृत्त्तानुसार अनिल कुंबळेला हेड कोचचं पद मिळू शकतं. याआधी अनिलने 2016 साली टीम इंडियाचा हेड कोच म्हणून काम पाहिलं होतं. पण नंतर विराट आणि त्याच्यात न जमनल्याने त्याने 2017 मध्ये राजीनामा दिला. पण आता टी20 संघातं कर्णधारपद विराट सोडणार असल्याने यानंतर नवा कोच म्हणून कुंबळेना पुन्हा संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया मालिकेत कोहली आणि कुंबळेमध्ये खटकलं
2016 मध्ये भारतीय संघाचा हेड कोच असणाऱ्या कुंबळेमध्ये तत्कालीन कर्णधार कोहली सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वादाला सुरुवात झाली. कसोटी मालिकेचा शेवटचा सामना धर्मशाला येथे होता. सामन्यात कोहली दुखापतीमुळे बाहेर होता. रहाणे संघाचा कर्णधार होता. पण त्याच वेळी संघ निवडीमध्ये कोहलीने सहभाग घेतला, ज्यामुळे कुंबळे आणि कोहलीमध्ये कुलदीप यादवला संघात घेण्यावरुन वाद झाला. कुलदीपने चांगले प्रदर्शन केले होते. पण त्याच्या संघात असण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि तिथून त्यांच्या नात्यात खटका उडाला.
कोचच्या शर्यतीत लक्ष्मणसह जयवर्धनेही सहभागी
बीसीसीआय शास्त्रींच्या बदली हेड कोच म्हणून अनिल कुंबळेचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण याच सोबत वीवीएस लक्ष्मण याचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे. लक्ष्मणलाही या पदासाठी अप्लाय कऱण्यासाठी सांगितलं असून या शर्यतीत आणखी एक नाव आहे. हे नाव भारतीय नसून श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याच आहे. जयवर्धनेने आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला उत्तमरित्या प्रशिक्षण दिल्यामुळे त्याला भारतीय संघाचा कोच म्हणूनही निवडलं जाऊ शकतं.
हे ही वाचा :
रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!
(Anil Kumble may took place of head coach after kohli resignes captaincy know clash between kohli and kumble)