आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; महाराष्ट्राच्या राजवर्धन, कौशलची अप्रतिम गोलंदाजी
हरनूर सिंगचे शतक तसेच राजवर्धन हंगगेंकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच समान्यात बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये भारताने संयुक्त अरब अमिराती( UAE)चा 154 धावांनी धुव्वा उडवला.
दुबई : हरनूर सिंगचे शतक तसेच राजवर्धन हंगगेंकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच समान्यात बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये भारताने संयुक्त अरब अमिराती( UAE)चा 154 धावांनी धुव्वा उडवला. भारताने संयुक्त अरब अमिरातीसमोर 283 धावांचे आवाहन ठेवले होते. मात्र धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज भारतीय भेदक गोलंदाजीचा सामना करू शकले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 34. 2 षटकांमध्ये अवघ्या 128 धावांवर गारद झाला. भारताकडून राजवर्धन याने तीन तर विकी, कौशल व गर्व यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अंमत्रित केले होते. तिसऱ्याच षटकामध्ये भारताला अंगक्रिश रघवंशीच्या रुपाने पहिला धक्का बसला. तो वयक्तीक दोन धावांवर असताना धावबाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या रशीद शेख आणि हरनूरसिंग यांनी 90 धावांची भागीदारी करत भरताची एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. त्यानंतर अयान अफजल खान यांने रशीद खानला बाद केले. मात्र दुसऱ्या बाजून हरनूर सिंग याने भारताची बाजू लावून धरली. त्याने 130 चेंडूमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 120 धावा फटकावल्या. याच 120 धावांच्या बळावर भारताने 283 धवांचा पल्ला गाठला.
भारताची गोलंदाजीमध्ये वर्चस्व
मात्र भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरलेल्या प्रतिस्पर्धी संघाला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडल्या. त्यांचा संघ 34. 2 षटकांमध्ये अवघ्या 128 धावांवर गारद झाला. भारताकडून राजवर्धन याने तीन तर विकी कौशल व गर्व यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या विजयासोबत भारताने स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान भारताच्या या विजयामध्ये मराठमोळ्या राजवर्धन हंगगेंकर आणि कौशल तांबे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले, राजवर्धन याने तीन तर कौशल याने दोन गडीबाद केले. राजवर्धन हा सोलापूर जिल्ह्यातल्या तुळजापूरचा रहिवाशी आहे. तर कौशल तांबे हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रहिवासी आहे.
India U19 ride on Harnoor Singh’s ton & handy contributions from captain Yash Dhull, Rajvardhan Hangargekar & Shaik Rasheed to post 282/5 on the board against UAE U19. ? ?
Over to our bowlers now! #BoysInBlue #ACC #U19AsiaCup #INDVUAE pic.twitter.com/fT7uEDy5xd
— BCCI (@BCCI) December 23, 2021
संबंधित बातम्या
Pro Kabaddi 2021 Time Table Today: यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, किती वाजता, कुठे पाहाल सामना