AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश

जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या तीन दिग्गजांनी एकाच सामन्यात इंग्लंडच्या द ओवल मैदानावर कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. तिघांनीही अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले होते.

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 1:02 PM
Share

लंडन : क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे योगायोग घडत असतात. कधी कधी एकाच सामन्यात दोन खेळाडू पदार्पण करतात, कधी अंडर 19 चषकात कर्णधार म्हणून आमने-सामने आलेले वरिष्ठ चषकात देखील कर्णधार म्हणून आमने सामने येतात. एकदातर इंग्‍लंड आणि वेस्‍टइंडीज सामन्यात 10 हून अधिक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्‍यू केला होता. पण याहून विशेष म्हणजे जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी नावं असणाऱ्या तीन खेळाडूंनी देखील एकाच सामन्यात निवृत्ती घेतली होती. यातील एक भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक होता. हा योगायोग आजच्याच दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला इंग्लंडच्या ओवल मैदानात घडला होता.

इंग्‍लंड आणि वेस्‍टइंडीज (England vs West Indies) या संघात 1991 मध्ये  8 ते 12 ऑगस्ट या काळात ओवलच्या मैदानात कसोटी सामना खेळला जात होता. टेस्‍ट खेला गया. हा सामना वेस्‍टइंडीजचा दिग्‍गज यष्टीरक्षक जेफ डुजोन (Jeff Dujon), वेगवान गोलंदाज मॅल्‍कम मार्शल (Malcolm Marshall) आणि धुरंदर फलंदाज विव रिचडर्स (Viv Richards) यांचा शेवटता कसोटी सामना ठरला. तिघेही सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला राम राम करतच मैदानाबाहेर पडले.

असा झाला सामना

इंग्‍लंडने सामन्यात प्रथ्म फलंदाजी करत 419 धावा केल्या. ज्यात रोबिन स्मिथने 109 धावा, कर्णधार ग्राहम गूचने 60 आणि एच. मॉरिसने 44 धावाचं योगदान दिलं. क्रिस लुइसही नाबाद 47 धावांवर राहिला. विंडीजकडून कर्टली एंब्रोस आणि कर्टनी वॉल्‍श यांनी तीन-तीन विकेट्स घेतले. ज्यानंतर वेस्‍टइंडीजचा पहिला डाव अवघ्या 176 धावावंर गुंडाळला. डेसमंड हेंसने केवळ नाबाद 75 रन्स केले. इंग्लंडकडून 6 विकेट फिल टफनेल याने घेतले. वेस्‍टइंडीजने फॉलोऑन खेळत 375 धावा केल्या. यात रिचर्डसनने 121 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार विव रिचडर्सने 60 आणि कार्ल हूपरने 54 धावा केल्या. ज्यानंतर इंग्लंडला विजयासाठी केवळ 143 धावांचे लक्ष्‍य होते जे त्यांनी  5 विकेट्च्या बदल्यात मिळवत सामना खिशात घातला.

हे ही वाचा

IND v ENG: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे अंतिम 11, 4 वेगवान गोलंदाजाना मिळू शकते संधी, ‘ही’ आहेत नावं

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(At west indies vs england test jeff dujon malcolm marshall viv richards took retirement on this day)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.