Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी
Australia vs India today WTC Final Match Live Score in Marathi | महामुकाबलच्या दृष्टीने सामन्यातील तिसरा दिवस हा फार निर्णायक असा ठरणार आहे. भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यातील आजचा (9 जून) तिसरा दिवस आहे. टीम इंडियासाठी हा तिसरा दिवस निर्णायक असा ठरणार आहे. सामन्यातील पहिल्या 2 दिवसात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या 5 फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोवर अजिंक्य रहाणे आणि केएस भरत ही जोडी नाबाद परतली.
टीम इंडिया अजून 318 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे या तिसऱ्या दिवशी रहाणेकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे रहाणे अनेक महिन्यांच्या कमबॅकनंतर टीम इंडियासाठी कशी भूमिका बजावतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | ऑस्ट्रेलयाकडे 296 धावांची आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या. दुसऱ्या डावातील 173 धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाकडे होती. त्यामुळे आता तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची मोठी आघाडी आहे. मार्नस लाबुशेन आणि कॅमरुन ग्रीन ही जोडी नाबाद परतली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Stumps on Day 3 of the #WTC23 Final!
Australia finish the day with 123/4 as #TeamIndia scalp 3️⃣ wickets in the final session ????
Join us tomorrow for Day 4 action!
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw pic.twitter.com/NzVeXEF0BX
— BCCI (@BCCI) June 9, 2023
तिसऱ्या दिवसानंतर सामन्याचा लेखाजोखा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : 123-4, 44 ओव्हर, एकूण 296 धावांची आघाडी.
टीम इंडियाचा पहिला डाव : 296 ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव : 469 ऑलआऊट
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | ट्रेव्हिस हेड आऊट
ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजाने टीम इंडियाची डोकेदुखी दूक केली आहे. जडेजाने पहिल्या डावात शतक करणाऱ्या ट्रेव्हिस हेड याला आपल्या बॉलिंगवर कॅच आऊट केलंय. ट्रेव्हिसने 18 धावा केल्या.
ट्रेव्हिस हेड आऊट
Caught and bowled!
Ravindra Jadeja gets his man ??
Australia 4 down as Travis Head departs for 18.
Follow the match ▶️ https://t.co/0nYl21pwaw#TeamIndia | #WTC23 | @imjadeja pic.twitter.com/JoxGLjVJPq
— BCCI (@BCCI) June 9, 2023
-
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | स्टीव्हन स्मिथ आऊट
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या स्टीव्हन स्मिथ याला रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 31 व्या आणि आपल्या स्पेलमधील 5 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आऊट केलं. शार्दुल ठाकुर याने स्मिथचा चांगला कॅच घेतला. स्टीव्हनने 47 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | उस्मान ख्वाजा आऊट
उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका देत पहिली विकेट मिळवली आहे. उमेशने उस्मान ख्वाजा याला विकेटकीपर केएस भरत याच्या हाती कॅच आऊट केलं. उस्मानने 39 बॉलमध्ये 13 धावांची खेळी केली.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात
टी ब्रेकनंतर तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राला सुरुवात झाली आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नल लाबुशेन दोघे खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 23 धावांसह 196 धावांची आघाडी आहे.
-
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे 196 धावांची आघाडी
तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडियाला 296 धावांवर ऑलआऊट केल्यानं ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात टी ब्रेकपर्यंत 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 23 धावा केल्या. ऑस्ट्रेलियालाकडे यासह एकूण 196 धावांची आघाडी आहे. तर मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा ही जोडी मैदानात खेळत आहे. मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरच्या रुपात एकमेव झटका दिला.
दुसऱ्या सत्राचा खेळ संपला
It's Tea on Day 3 of the #WTC23 Final!
A wicket for #TeamIndia as Australia scored 23 runs before heading for the break!
Final Session of the Day to begin soon.
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21oYkY pic.twitter.com/jYprE1x9KZ
— BCCI (@BCCI) June 9, 2023
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | डेव्हिड वॉर्नर आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिला झटका
मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला आहे. सिराजने डेव्हिड वॉर्नर याला विकेटकीपर केएस भरत याच्या हाती 1 धावेवर कॅच आऊट केलं.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात
टीम इंडियाला 296 धावावंर ऑलआऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्याने दुसऱ्या डावात त्यांना 173 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | टीम इंडिया ऑलआऊट
टीम इंडिया पहिल्या डावात 296 धावांवर ऑलआऊट झाली आहे. टीम इंडियाला 300 आधी रोखल्याने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर शार्दुल ठाकुर याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने 3 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात कमी धावात रोखण्याचं आव्हान असणार आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | शार्दुल ठाकुर आऊट
भारताला नववा झटका लागलाय. शार्दुल ठाकुर अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झालाय. शार्दुलने 109 बॉलमध्ये 51 धावांची अर्धशतकी भागीदारी केलीय.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | चौकार ठोकत शार्दुल ठाकुरचं अर्धशतक
शार्दुल ठाकुर याने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय. ठाकुरने 108 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलंय. शार्दुलच्या कसोटी कारकीर्दीतील चौथं अर्धशतक ठरलंय.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | उमेश यादव आऊट
टीम इंडियाला आठवा झटका लागला आहे. पॅट कमिन्स याने उमेश यादव याला क्लिन बोल्ड केलंय.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | टीम इंडियाला सातवा झटका, रहाणे आऊट
ऑस्ट्रेलियाने अखेर अजिंक्य रहाणे-शार्दुल ठाकुर जोडी फोडली आहे. लंच ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाने भारताला सातवा झटका दिला आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने आपल्या बॉलिंगवर कॅमरुन ग्रीन याच्या हाती अजिंक्य रहाणे याला कॅचआऊट केलं. ग्रीनने अफलातून कॅच घेतला. रहाणेने 129 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 89 धावांची झुंजार खेळी केली.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात
तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्राला खेळाला सुरुवात झाली आहे. रहाणे आणि ठाकूर मैदानात आले आहेत. या जोडीकडून मोठ्या आशा आहेत
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाच्या 260 धावा
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टीम इंडियाने या पहिल्या सत्रात 1 विकेट गमावून 109 धावा केल्यात. टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलंय. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी लंच ब्रेकपर्यंत नाबाद 108 धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडियाने लंचपर्यंत 60 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 260 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही 209 धावांनी पिछाडीवर आहे. रहाणे 89 आणि शार्दुल 36 धावांवर नाबाद आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने या पहिल्या सत्रात एकूण 3 कॅच सोडल्या. या संधीचा रहाणे आणि शार्दुल या जोडीने शानदार फायदा घेतला.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | शार्दुल आऊट, मात्र नो बॉलमुळे वाचला
टीम इंडियाला नशिबाची साथ मिळाली आहे. शार्दुल ठाकूर एलबीडबल्यू आऊट झाला होता. अंपायरने शार्दुलला बाद घोषित केलं. मात्र शार्दुलने रीव्हीव्हयू घेत निर्णयाला आव्हान दिलं. या दरम्यान शार्दुल आऊट आहे की नाही, हे तपासत असताना नो बॉल असल्याचं लक्षात आलं. अशा प्रकारे शार्दुलला जीवनदान मिळालं. विशेष बाब म्हणजे रहाणे पण दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे एलबीडबल्यू आऊट झाला होता. मात्र नो बॉल असल्याने रहाणेला जीवनदान मिळालं.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी 124 बॉलमध्ये 103 धावांची भागीदारी केली. रहाणेने चौकार ठोकत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली. टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी जबाबादारीने भागीदारी साकारली.
रहाणे-ठाकूर जोडीची झुंजार शतकी भागीदारी
A gritty, solid and determined 100-run partnership comes up between @ajinkyarahane88 and @imShard ??
Live – https://t.co/0nYl21oYkY… #WTC23 pic.twitter.com/fcSBTJFSU2
— BCCI (@BCCI) June 9, 2023
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | अजिंक्य रहाणे याला जीवनदान
अजिंक्य रहाणे याला 56 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर जीवनदान मिळालंय. स्लीपमध्ये असलेल्या वॉर्नरने रहाणेची कॅच सोडली. त्यामुळे रहाणेला जीवनदान मिळालंय.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | अजिंक्य रहाणे-शार्दुल ठाकूर जोडी जमली
टीम इंडियाची तिसऱ्या दिवसाची खराब सुरुवात झाली. केएस भरत याच्या रुपात भारताने सहावी विकेट गमावली. केएस भरत 5 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात आला. ठाकुरने रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी ताज्या आकडेवारीनुसार 70 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. या दरम्यान रहाणेने अर्धशतक ठोकलं. या दोघांनी झुंजार भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला आहे.
रहाणे-ठाकूरची झुंजार भागीदारी
Ajinkya Rahane and Shardul Thakur's partnership now 76* runs – Highest ever partnership for India in WTC Final history. pic.twitter.com/uA0TGrtw9w
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 9, 2023
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. टीम इंडियाने 48.1 ओव्हरमध्ये 200 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | अजिंक्य रहाणे याचं अर्धशतक
अजिंक्य रहाणे याने झुंजार अर्धशतक ठोकलंय. रहाणेने 74 मीटर लांब सिक्स ठोकत दिमाखात अर्धशतक ठोकलंय. रहाणेच्या या खेळीमुळे टीम इंडियाची झुंज सरु आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज?
टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 38 ओव्हरमध्ये 151 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचीही खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये केएस भरत आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाला फॉलोऑनचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज आहे असा प्रश्न पडलाय. टीम इंडियाला फॉलोऑनचा धोका टाळण्यासाठी किमान 271 धावा कराव्या लागणार आहेत.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | शार्दुल ठाकुूर याला जीवनदान
टीम इंडियाचा केएस भरत तिसऱ्या दिवसातील पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवरच आऊट झाला. केएस भरतच्या रुपात टीम इंडियाला सहावा झटका लागला. त्यानंतर शार्दुल ठाकुर मैदानात आला. ठाकुरला या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर जीवनदान मिळालं. स्कॉट बॉलँड याच्या बॉलिंगवर शार्दुलच्या बॅटला बॉल लागून स्लिपच्या दिशेने गेला. डोक्यावरुन जात असेलली कॅच उस्मान ख्वाजा याने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅच हातून सटकला. त्यामुळे टीम इंडियाला 2 धावा आणि शार्दुल ठाकुर याला जीवनदान मिळालं.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 3 | टीम इंडियाला सहावा झटका, केएस भरत आऊट
टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवसाची वाईट सुरुवात झालीय. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच बॉलवर केएस भरत क्लिन बोल्ड झालाय. बोलँडने केएसला 5 धावांवर बोल्ड केला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर आता 38.2 ओव्हरमध्ये 6 बाद 152 असा झाला आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 | महाअंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी काय झालं?
महाअंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यानंतर भारतीय गोलंदांजांनी कांगारुंना ठराविक अंतराने झटपट 3 झटके दिले. मात्र त्यांतर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने टीम इंडियाला जेरीस आणलं. आणखी काय काय झालं पहिल्या दिवशी जाणून घेण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर
सविस्तर वाचा | Wtc Final 2023 Day 1 Stumps | पहिला दिवस ट्रेव्हिस हेड -स्टीव्ह स्मिथ जोडीचा, टीम इंडियाचे गोलंदाज फेल
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 | दुसऱ्या दिवशी काय काय झालं? जाणून घ्या एका क्लिकवर
पहिल्या दिवशी अपयशी ठरल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना दुसऱ्या दिवशी सूर गवसला. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी एकूण 7 विकेट्स घेतल कांगारुंचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर कांगारुंनी टीम इंडियाचा अर्ध संघ आऊट केला. दुसऱ्या दिवशी काय काय झालं जाणून घेण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर
सविस्तर वाचा | Australia vs India WTC Final 2023 Highlight | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 5 बाद 151 धावा
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 | अजिंक्य रहाणे याच्यावर टीम इंडियाची मदार
तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे याच्यावर टीम इंडियाची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीनंतर मिडल ऑर्डरने सपशेल निराशा केली. त्यामुळे टीम इंडियाचे दुसऱ्या दिवशी झटपट 4 विकेट्स गेल्या. त्यांनतर रहाणे आणि जडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मात्र नेथन लायन याने जडेजा याला आऊट करत ही जोडी फोडली.
त्यानंतर रहाणेची साथ देण्यासाठी विकेटकीपर केएस भरत मैदानात आला. केएसने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रहाणेला चांगली साथ दिली. आता बाकी फलंदाजांच्या तुलनेत अजिंक्य रहाणे हा सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्यात टीम इंडिया 300 पेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर आहे. यामुळे टीम इंडियाला अजिंक्य रहाणे याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया दिवस तिसरा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 318 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत 5 विकेट्स गमावून 38 ओव्हरमध्ये 151 धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि केएस भरत हे दोघे नाबाद आहेत.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या जोडीने शतक ठोकलं. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
Published On - Jun 09,2023 1:18 PM