AUSW vs INDW, 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) महिला क्रिकेट संघामध्ये उद्यापासून (21 सप्टेंबर) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियातील मकाय येथे खेळवला जाईल

AUSW vs INDW, 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय महिला क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 6:34 PM

मुंबई: एकीकडे भारतीय पुरुष संघातील खेळाडू आगामी टी 20 चषकाची तयारी करत असून त्याचाच सराव म्हणून आयपीएलचे सामने खेळत आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियन महिला संघाला मात देण्यासाठी तयार झाला आहे. भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलांमध्ये क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले असून उद्यापासून (21 सप्टेंबर) या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. सर्व भारतीय महिला मैदानात सराव करत असून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला मात देण्यासाठी रणनीती आखत आहेत.

एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघात सराव सामना खेळवण्यात आला. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने 36 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या रेचल हेन्सने 65 धावांची खेळी करत 50 षटकात 9 विकेट्च्या बदल्यात संघाला 278 धावांपर्यंचत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाच्या डावात हेन्ससह मेग लेनिंगने 59, बेथ मूनीने 59, एश्ले गार्डनरने 24, एनाबेल सदरलँडने 20, एलिसा हेलीने 8 आणि एलिस पेरीने 1 धाव केली. तर जॉर्जिया वारेहम 17 धावांवर नाबाद राहिली. त्यानंतर भारतीय महिलांना हे लक्ष्य गाठता न आल्याने त्यांचा 36 धावांनी पराभव झाला. आता या सराव सामन्यातील पराभवाचा बदला घेत पहिली वनडे मॅच जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज झाल्या आहेत.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी, 21 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या मकाय येथीली हरप पार्क येथे खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 05:35 वाजता सुरु होईल. नाणेफेक 05:00 वाजता असेल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचं Live Streaming Hotstar वर असेल.

हे ही वाचा :

तालिबानकडून IPL बॅन, चिअर लीडर्स डोळ्यात खुपतात? अफगाणिस्तानमध्ये आयपीएलचे ढोल थंडच

IPL 2021: दुखापतग्रस्त रायडूबद्दल मोठी अपडेट, पत्रकार परिषदेत समोर आली माहिती

या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया

(AUSW vs INDW, 1st ODI live Streaming When And Where To watch online to free in marathi)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.