टीम इंडियासाठी बीसीसीआयचा स्पेशल व्हिडिओ, रोहित शर्मा, विराट कोहली अन् टीम….
T20 world Champion Team India Arrives Delhi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे.
T20 world Champion Team India Arrives Delhi: टी 20 विश्वचषकातील भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी टीम इंडियाचे फॅन्स मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. भारतीय संघाच्या चाहत्यांकडून इंडिया-इंडिया अशा घोषणा दिल्या जात होत्या. टीम इंडियाच्या खेळाडूंना स्पेशल बसने विमानतळापासून हॉटेलपर्यंत नेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे. काही तासांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला हजारो जणांना लाइक अन् कॉमेंट केल्या आहेत. या व्हिडिओनंतर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतूक करण्यात आले आहे. It’s home असे दोन शब्दांचे कॅप्शन बीसीसीआयने व्हिडिओ ट्विट करताना दिले आहे.
Travelling with the prestigious 🏆 on the way back home! 😍
🎥 WATCH: #TeamIndia were in excellent company during their memorable travel day ✈️👌 – By @RajalArora #T20WorldCup pic.twitter.com/0ivb9m9Zp1
— BCCI (@BCCI) July 4, 2024
यामुळे टीम इंडियाला उशीर
बारबाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 29 जून रोजी 7 धावांनी पराभव केला. त्यानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने विश्वविजेतपदावर नाव कोरले. वेस्ट इंडिजमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे सर्व विमाने बंद होती. विमानतळावरील सर्व ऑपरेशनही बंद होते. त्यामुळे 30 जून ते 3 जुलैपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमधील हॉटेलमध्येच अडकला होता. चक्रीवादळ शांत झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आणण्यासाठी विशेष विमान पाठवले. त्या विमानाने भारतीय संघ 4 जुलै रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. आता गुरुवारी भारतीय संघाची विजयी मिरवणूक मुंबईतून निघणार आहे.
It's home 🏆 #TeamIndia pic.twitter.com/bduGveUuDF
— BCCI (@BCCI) July 4, 2024
रोहित शर्माच्या टीम इंडियाचा कार्यक्रम
- 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
- 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
- 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
- 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
- 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
- दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
- 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
- 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
- 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
- 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
- 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
- 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान