AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेटमध्ये होणार महत्त्वपूर्ण बदल, BCCI च्या बैठकीत मोठे निर्णय, सर्व बदल जाणून घ्या एका क्लिकवर

बीसीसीआयने एका महत्त्वाच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले. यामध्ये स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फि, भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक अशा काही महत्त्वांच्या गोष्टींबाबत निर्णय झाले.

| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 11:52 PM
Share
भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सोमवारी (20 सप्टेंबर) एका व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे 9वी एपेक्स काउंसिल बैठक घेतली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेत आगामी क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले. नव्या काही नियमांमुळे अगदी अंडर 16 पासून ते वरिष्ठ स्तरावरील 2000 क्रिकेटपटूंना याचा फायदा होणार आहे. तर या बैठकीत घेण्यात आलेले नेमके निर्णय काय जाणून घेऊ...

1 / 6
बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या फीसमध्ये वाढ केली आहे. यानुसार अंडर-23 आणि अंडर-19 क्रिकेटर्सना अनुक्रमे 25,000 आणि 20,000 रुपये सामन्याच्या प्रत्येक दिवसाला मिळतील. तसेच महिला क्रिकेटपटूंना प्रतिसामना 12,500 रुपये मिळत होते त्याजागी आता 20,000 रुपये मिळतील.

2 / 6
याशिवाय ज्या रणजी खेळाडूंनी 40 हून अधिक सामने खेळले आहेत. त्यांची मॅच फी जवळपास दुप्पट करण्यात आली असून त्यांना सामन्यासाठी प्रतिदिन 60 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय ज्या खेळाडूंनी 21 ते 40 सामने खेळले आहेत. त्यांना सामन्या दरम्यान प्रतिदिन 50 हजार रुपये मिळणार आहेत. यापेक्षा कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना प्रतिदिन 40 हजार रुपये मिळतील. या नव्या नियमांनी 2000 हून अधिक क्रिकेटपटूंना फायदा होईल.

3 / 6
तसेच 2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे.

4 / 6
स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले असले तरी अंडर-16 टूर्नामेंट खेळवण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. याचे कारण कोरोना प्रतिबंधक लस अजूनही 18 वर्षाखालील नागरिकांना उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी घेता ही स्पर्धा होण्यालर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण अंडर 19 स्पर्धानंतर याबबात लगेचच निर्णय़ घेणार असल्याचं यावेळी सांगितलं गेलं आहे.

5 / 6
या निर्णंयासह भारतीय संघाचं टी20 विश्वचषकानंतरच वेळापत्रकही यावेळी जाहीर करण्यात आलं. भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी आमंत्रित करणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळलाने (BCCI) त्यांच्या एपेक्स काउंसिल मीटिंगमध्ये ही माहिती दिली. या वेळापत्रकात विविध देशांसोबक भारत  4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे.

6 / 6
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.