IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार

याआधी जो रुटनेही आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच रुटने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं.

IPL 2022 ला आणखी एक झटका, इंग्लंडच्या एक मोठ्या ऑलराऊंडर प्लेयरने घेतली माघार
आयपीएल 2022
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:00 AM

लंडन: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) झालेला 4-0 पराभव इंग्लिश खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवासाठी इंग्लंडमधल्या काही क्रिकेट तज्ज्ञांनी भारतात होणाऱ्या IPL स्पर्धेला जबाबदार धरलं आहे. इंग्लंडचा आणि जागतिक क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने (Ben Stokes) यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. कामगिरीत सुधारणा आणि पुढच्या सीजनमध्ये मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी स्वत:ला सज्ज ठेवण्यासाठी स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश माध्यमांनी हे वृत्त दिलं आहे.

खराब कामगिरीमुळे त्याने आपला निर्णय बदलला

याआधी जो रुटनेही आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच रुटने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. पण इंग्लिश संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने आपला निर्णय बदलला. रुट पाठोपाठ आता बेन स्टोक्सनेही तसाच निर्णय घेतला आहे.

त्याने फक्त 236 धावा केल्या

बंगळुरुत फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन पार पडणार आहे. बेन स्टोक्सने नुकत्याच संपलेल्या अ‍ॅशेस मालिकेत लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्याने फक्त 236 धावा केल्या व चार विकेट घेतल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार डेविड गॉवर यांच्यासह अनेक जण इंग्लिश खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार ठरवत आहेत. “स्टोक्स यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 10 टीम्स खेळणार आहेत” असे लंडनच्या इव्हिनिंग स्टँडर्डने म्हटले आहे.

कोविडमुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती.

2021 च्या मोसमात बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सचा भाग होता. कोविडमुळे स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पुन्हा स्पर्धा सुरु झाली, त्यावेळी स्टोक्स खेळण्यासाठी परतलाच नाही. कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती घेणारा मोइन अली आणि जोस बटलर यांना त्यांच्या फ्रेंचायजीने रिटेन केले आहे. म्हणजे ते त्यांच्या फ्रेंचायजीकडून खेळतील. मोइन अली आणि बटरला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने दोघांना रिटेन केलं आहे.

संबंधित बातम्या:

Jasprit Bumrah: कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवण्याबद्दल जसप्रीत बुमराहचं मोठ विधान Rohit Sharma: रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची UPDATE, जाणून घ्या कधी परतणार मैदानावर Rahul Dravid: राहुल द्रविड कोच झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या? जसप्रीत बुमराह म्हणाला…

(Ben Stokes opts out of IPL auctions to stay fresh for English home summer Reports)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.