Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane: ठरलं! निवड समिती रहाणे, पुजाराला करणार Thank You, हे दोन फलंदाज घेणार जागा

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत (South Africa test Series) झालेल्या 2-1 अशा पराभवानंतर निवड समिती काही मोठे निर्णय घेऊ शकते. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) या दोघांना संघातून डच्चू मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. अनुभवाने कमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा पराभव केला. रहाणे आणि पुजारा हे दोघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्याला […]

Ajinkya Rahane: ठरलं! निवड समिती रहाणे, पुजाराला करणार Thank You, हे दोन फलंदाज घेणार जागा
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याडावात फेल गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. 'पुराने' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. रहाणेने चालू दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 22.66 च्या सरासरीने फक्त 136 धावा केल्या. पुजाराने 20.66 च्या सरासरीने 124 धावा केल्या. भारतीय क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर इतकी संधी कोणाला मिळालेली नाही. या दोघांमुळे काही प्रतिभावान युवा खेळाडू बेंचवर बसले आहेत आणि त्यांच्या हातातून वेळ आणि संधी दोन्ही निसटत चाललीय.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 7:04 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत (South Africa test Series) झालेल्या 2-1 अशा पराभवानंतर निवड समिती काही मोठे निर्णय घेऊ शकते. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) या दोघांना संघातून डच्चू मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. अनुभवाने कमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा पराभव केला. रहाणे आणि पुजारा हे दोघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासूनच रडारवर होते. दोघांनी एक अर्धशतक वगळता दक्षिण आफ्रिकेत विशेष कामगिरी केलेली नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार मायदेशात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंजाबचा शुभमन गिल आणि हनुमा विहारीला निवड समिती संधी देऊ शकते. निवड समितीच्या मनात काय असेल? विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटन रहाणे आणि पुजाराचा शेवटपर्यंत बचाव केला. पण काल केपटाऊनमधल्या पराभवानंतर विराट कोहलीला पत्रकार परिषदेत दोघांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याच्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते. “इथे बसून मी ठरवू शकत नाही. ते निवड समितीचे काम आहे. आम्ही पुजारा आणि रहाणेचं समर्थन केलं. पण निवड समितीच्या मनात काय असेल? त्याबद्दल मी बोलू शकत नाही” असं विराट म्हणाला.

रिपोर्टसनुसार निवड समिती कसोटी क्रिकेटमध्ये मोठे बदल करु शकते. 25 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध मायदेशात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी मिळणार नाही. पीटीआयने हे वृत्त दिल्याचं स्पोटर्स टायगर वेबसाइटने म्हटलं आहे.

कधीपासून खेळतायत कसोटी संघात? शुभमन गिल मधल्या फळीत खेळणार आहे. दुसऱ्याजागेवर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल. रोहित शर्मा सुद्धा या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. तो सलामीवीर मयंक अग्रवालची जागा घेईल. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला वगळलं, तर कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होईल. अजिंक्य रहाणे आणि पुजारा मागच्या दहावर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचा भाग आहेत.

(Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane set to be dropped for Test series against Sri Lanka Shubman Gill will bat in middle order)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.