रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर. अश्विनने वैयक्तिक पहिल्याच षटकात डेव्हिड मिलरला 7 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी यष्टीचित केलं.

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 6:33 PM

अबू धाबी : आयपीएल 2021 मध्ये आज सुपर शनिवार आहे. म्हणजे आज दोन सामन्यांची मेजवानी आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला टी-20 सामना अबू धाबीच्या मैदानात खेळवला जात आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि दिल्लीच्या फलंदाजांना अखेपर्यंत जखडून ठेवलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने राजस्थानच्या गोलंदाजांसमोर केवळ 154 धावा केल्या. त्यानंतर 155 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनांही अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी जोरदार हल्ला चढवत राजस्थानच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या आहेत. दरम्यान, दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजीत मोठा विक्रम केला आहे. (DC vs RR : Ravichandran Ashwin Completed 250 T20 Wickets after David Miller Dismissal)

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर. अश्विनने वैयक्तिक पहिल्याच षटकात डेव्हिड मिलरला 7 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी यष्टीचित केलं. ही विकेट घेत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या विकेटसह अश्विनने त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतल्या 250 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. टी – 20 क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारा ते तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी अमित मिश्रा आणि पियूष चावला यांनी केली आहे.

राजस्थानची भेदकी गोलंदाजी

दरम्यान, आजच्या सामन्यात राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि अवघ्या 21 धावांत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर आलेल्या कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने काही वेळ किल्ला लढवला खरा परंतु दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. आधी रिषभ पंत 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिमरन हेटमायरने काही वेळ फटकेबाजी करुन दिल्लीला शतक पूर्ण करुन दिलं. मात्र त्यालाही फार वेळ मैदानात तग धरता आला नाही.

ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. दिल्लीने कसाबसा दिडशे धावांचा टप्पा पार केला. राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकरियाने 4 षटकांमध्ये अनुक्रमे 22 आणि 33 धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अखेर निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

राजस्थानसमोर दिल्लीचं अवघड आव्हान

दिल्लीने राजस्थानला 20 षटकात 155 धावांचे माफक लक्ष्य दिले आहे. हे लक्ष्य राजस्थानची टीम सहज पूर्ण करु शकणार नाही. कारण दिल्लीकडेही एकापेक्षा एक उत्तम गोलंदाज आहेत. दिल्लीचा युवा गोलंदाज आवेश खानने आतापर्यंत या स्पर्धेत अनेक मोठ्या फलंदाजांना बाद सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यासोबत आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज नॉखिया हा देखील दिल्लीच्या संघात आहे. सोबत मागच्या वर्षीचा पर्पल कॅप विजेता कगिसो रबाडाचा तोफखाना देखील आहेच. भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल या दोघांच्या फिरकीसमोर राजस्थानच्या फलंदाजांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

संजू सॅमसनला हवा केवळ 1 षटकार

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर 99 षटकार आहेत. त्याने आजच्या सामन्यात एक षटकार मारताच आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होईल. जर सॅमसनने आज दिल्लीविरुद्ध षटकार ठोकला तर तो राजस्थानसाठी 100 षटकार ठोकणारा शेन वॉटसन नंतरचा दुसरा खेळाडू असेल.

इतर बातम्या

DC vs RR : राजस्थानसमोर दिल्लीचं 155 धावांचं माफक लक्ष्य, सॅमसनची टीम टॉप 4 मध्ये स्थान मिळवणार?

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(DC vs RR : Ravichandran Ashwin Completed 250 T20 Wickets after David Miller Dismissal)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.