IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

या सामन्यात खेळणाऱ्या दीपक चहरने (Deepak Chahar) मिळालेल्या संधीच सोन केलं. त्याने ऑलराऊंडर प्रदर्शन करत बॉल बरोबर बॅटनेही कमाल केली. त्याने 34 चेंडूत 54 धावांची खेळी करुन सामन्याचा नूर पालटला.

IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 9:30 AM

केपटाऊन: कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेतही (One day Series) भारताचा दारुण पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप करत 3-0 असा विजय मिळवला. शेवटच्या वनडे मध्ये भारताचा अवघ्या चार धावांनी पराभव झाला. या सामन्यात खेळणाऱ्या दीपक चहरने (Deepak Chahar) मिळालेल्या संधीच सोन केलं. त्याने ऑलराऊंडर प्रदर्शन करत बॉल बरोबर बॅटनेही कमाल केली. त्याने 34 चेंडूत 54 धावांची खेळी करुन सामन्याचा नूर पालटला. सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. पण 48 व्या लुंगी निगीडीच्या षटकात चहर बाद झाला आणि भारताने हा सामना चार धावांनी गमावला.

या पराभवामुळे दीपक चहर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले होते. चहर बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह (12) आणि युजवेंद्र चहल (2) पाठोपाठ बाद झाले आणि भारताचा डाव संपला.

चहरने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली दौऱ्यातील पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक चहरने करीयरमधील दुसरे अर्धशतक झळकावलं. त्याने या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. सामना संपल्यानंतर दीपक चहर निराश झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दुश्य कॅमेऱ्याने टिपलं. कदाचित दीपक चहर टिकला असता, तर सामना भारताच्या बाजूने झुकला असता. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध दीपक चहरने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता. त्याने मागच्यावर्षी कोलंबोमध्ये 82 चेंडूत 69 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.

“केएल राहुलने सुद्धा दीपक चहरचं कौतुक केलं. दीपकने आम्हाला सामना जिंकण्याची संधी दिली होती. खूप उत्सुक्ता निर्माण झाली होती. आम्ही सामना हरलो, त्यामुळे निराश आहोत. आम्ही यातून काही तरी शिकू आणि अजून सुधारणा करु” असे भारतीय कर्णधाराने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित बातम्या:

Shoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’ स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.