India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?
इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.
मुंबई: सध्या भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) व्यस्त आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ निराश असला तरी आगामी सामने जिंकण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेल हे नक्की. भारताचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं फार अवघड असलं तरी तो पुढचा भाग आहे. पण विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा असणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून कोण असणार? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
याचे कारण विश्वचषकापूर्वीच विराट कोहलीने (Virat Kohli) स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधापद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आगामी मालिकेसाठी कोण कर्णधारपद सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हात पद सांभाळेल असे सर्वांना वाटत असताना आता नवेच नाव समोर येत आहे. हे नाव म्हणजे केएल राहुल (KL Rahul)
‘वरिष्ठांना विश्रांतीची गरज’
बीसीसीआयशी संबधित एका विश्वासू सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत केएल राहुल याच्याकडे न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा असणार असणार असल्चाचं सांगितलं आहे. टी20 विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीसाठी तसंच राहुल हा एक संघातील महत्त्वाचा आणि विश्वासून खेळाडू असल्यामुळे हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.
इतर बातम्या
(For Upcoming india vs new zealand T20 series KL Rahul may be captain of team india)