मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चादेखील सुरु आहेत.

मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी
राहुल द्रविड
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 4:50 PM

मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडने अधिकृतरित्या या पदासाठी अर्ज केला आहे.

द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणीने जोर धरला होता. पण राहुल द्रविड हा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (National Cricket Academy) प्रमुख या पदावर असल्याने तो ही संधी घेत नव्हता. त्याला ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी काम करायचं असल्याने तो या पदावर होता. पण आता राहुलने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्जस दिल्याने नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणून व्हिव्हिएस लक्ष्मण (VVS Laxman) याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

बोलिंग कोच म्हणून पारस म्हाम्ब्रेचं नाव

शास्त्रींसह कोचिंग स्टाफमधील बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun)हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरु आहे.  या जागेसाठी माजी क्रिकेटपटू असणारे वेगवान गोलंदाज पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) यांनी अर्ज केला आहे.  सोमवारी त्यांनी बीसीसीआयला (BCCI) अर्ज दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. म्हाम्ब्रे हे मागील 20 वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत जोडलेले असून राहुल द्रविड़च्या (Rahul Dravid) निकववर्तीयांपैकी एक आहेत.याबाबत बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पारस यांनी बोलिंग कोचच्या पदासाठी अर्ज दिला आहे. अर्ज देण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर असून पार हे खूप अनुभवी कोच असून त्यांनी अंडर 19 संघासाठी काम केल्याने त्याचं सिलेक्शन होऊ शकतं.’

फिल्डिंग कोचही बदलणार

कोचिंग स्टाफमधील आणखी एक महत्त्वाचं पद म्हणजे फिल्डिंग कोच. सध्या फिल्डिंग कोच असणारे आर श्रीधरहेही पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी अर्ज स्वीकारले गेले आहेत. याजागी माजी क्रिकेटपटू अभय शर्मा (Abhay Sharma) यांनी अप्लाय केलं असून ते श्रीधर यांची जागा घेण्याची शक्यता आहे. शर्मा यांनी भारत ए, भारत अंडर-19 आणि राष्ट्रीय महिला संघासोबत काम केलं आहे. दरम्यान श्रीधर यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार असून त्यावेळी 52 वर्षीय अभय यांना भारतीय क्रिकेट संघासोबत फील्डिंग कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

इतर बातम्या

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(Former cricketer Rahul dravid has Officially applied for the post of team india head coach)

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.