भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीकडून जखमेवर मीठ

Afridi reaction : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून फायनल सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर एकीकडे संपूर्ण देश भारताच्या पाठिशी उभा असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीने मात्र जखमेवर मीठ चोळणारी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीकडून जखमेवर मीठ
afridi
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 7:50 PM

World cup 2023 : टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीतही संपूर्ण देश टीम इंडियाच्या पाठीशी उभा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही खेळाडूंची सामन्यानंतर भेट घेत त्यांना धीर दिला. भारतीय संघाने ज्या प्रकारे सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यासाठी सर्वच स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सरस ठरला. यावर मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया देताना भारताला उकसवण्याचा प्रयत्न केला आहे.

शाहीद आफ्रिदीचा टोला

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने थेट भारतीय संघाला टोला लगावला आहे. एका खासगी पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, आता जेव्हा आपण सतत सामने जिंकतो तेव्हा अतिआत्मविश्वासही वाढतो. यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला की ती गोष्ट (अति आत्मविश्वास) तुम्हाला मारून टाकते. शाहिद आफ्रिदीचे हे वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक जण टीकाही करत आहेत.

भारतील संघाला सपोर्ट

शाहिद आफ्रिदीच नाही तर अनेक पाकिस्तानी लोकांनी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर कमेंट केल्या आहेत. सध्या भारतीय संघाने विश्वचषक गमावला असला तरी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. सोशल मीडियावर लोक विविध पोस्ट करून भारतीय संघाचे समर्थन करत आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव

विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारतीय संघ चमकदार कामगिरी करु शकला नाही. भारतीय संघाने १० सामने जिंकल्याने भारतीयांच्या आशा नक्कीच वाढल्या होत्या. पण भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल अशी अपेक्षा असताना मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि अनेकांचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करत ट्रॉफी जिंकली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.