AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘तुम्ही जोहान्सबर्ग कसोटी जिंका हेच त्याच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट’, गावस्करांची टीम इंडियाला विनंती

भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं इतकं सोप नाहीय. कारण भारताकडे आजच्या घडीचे बेस्ट वर्ल्ड क्लास बॉलर्स आहेत. ते दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान निर्माण करु शकतात.

IND vs SA: 'तुम्ही जोहान्सबर्ग कसोटी जिंका हेच त्याच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट', गावस्करांची टीम इंडियाला विनंती
सुनिल गावस्कर
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 3:19 PM
Share

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे. आज हा सामना निकाली निघेल. पण सध्या पावसाने खेळामध्ये व्यत्यय आणला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 118 धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी 122 धावांची आवश्यकता आहे. सध्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकला, तर मालिकेत 2-0 विजयी आघाडी होईल. (Gavaskar urges Team India to win Johannesburg Test for ‘India’s greatest cricketer’)

भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं इतकं सोप नाहीय. कारण भारताकडे आजच्या घडीचे बेस्ट वर्ल्ड क्लास बॉलर्स आहेत. ते दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान निर्माण करु शकतात. सध्या सामन्याच पारडं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देशाच्या आणखी महान क्रिकेटपटूसाठी जोहान्सबर्ग कसोटी जिंका अशी विनंती केली आहे.

कधीही मालिका विजय मिळवलेला नाही “भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका विजय मिळवलेला नाही. फार कमी कसोटी सामने जिंकले आहेत. 2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने वनडे मालिका जिंकली पण कसोटी मालिका 2-1 ने गमावली होती. त्यामुळे आजचा विजय भारतासाठी खूप मोठा असेल” असे गावस्कर म्हणाले.

हे कपिलसाठी सुंदर गिफ्ट असेल “आज कपिल देव यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे या भारतीय संघाने मिळवलेला विजय हे कपिलसाठी सुंदर गिफ्ट असेल. या संघात कपिलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कपिलसाठी हे मोठे गिफ्ट असेल” असे गावस्कर म्हणाले. कपिल देव हे भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार आहेत. आज त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण केलं.

संबंधित बातम्या:

IND vs SA 2nd Test: अखेरच्या दिवशी टीम इंडिया जिंकणार, चेतेश्वर पुजाराने सांगितली रणनीती IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा? ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी भारताची कॅप्टन मिताली राजबद्दल काही खास गोष्टी

(Gavaskar urges Team India to win Johannesburg Test for ‘India’s greatest cricketer’)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.