Kidambi Srikanth BWF : श्रीकांतनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर गोपीचंद यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद (Pullela Gopichand) यांनी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक (Silver Medal) जिंकल्याबद्दल किदाम्बी श्रीकांत(Kidambi Srikanth)चं अभिनंदन केलंय. आशियाई खेळ (Asian Games) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) यात उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षाही त्यांनी केलीय.

Kidambi Srikanth BWF : श्रीकांतनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर गोपीचंद यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
किदाम्बी श्रीकांत
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 2:45 PM

भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand) यांनी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक (Silver Medal) जिंकल्याबद्दल किदाम्बी श्रीकांत(Kidambi Srikanth)चं अभिनंदन केलंय. 2022च्या व्यस्त वेळापत्रकात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी श्रीकांतला त्याच्यातील उणिवांवर मात करावी लागेल, असं म्हटलंय. माजी जागतिक नंबर वन श्रीकांत हा BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. अंतिम सामन्यात सिंगापूरच्या लोह कीनचा 21-15, 22-20 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं.

ऑलिम्पिक पात्रतेत अपयशी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवल्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर मजल दरमजल करत प्रवास करणाऱ्या किदाम्बी श्रीकांतनं चार वर्षांत सर्व प्रकारचे चढ-उतार पाहिलेत. यामुळेच जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकूनही या दिग्गज बॅडमिंटनपटूनं फारसं सेलिब्रेशन केलं नाही. फिटनेस आणि फॉर्ममध्ये संघर्ष करत असतानाही त्यानं ही कामगिरी केली.

‘आत्मविश्वास वाढला’ गोपीचंद याविषयी म्हणाले, की स्पर्धा जसजशी पुढे जातेय तसतसा श्रीकांतचा खेळ चांगला होत गेला. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा त्यानं खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, परंतु दिग्गज खेळाडूंना पराभूत केल्यानंतर त्याच्यातला आत्मविश्वास वाढला. त्यानं योग्य वेळी वेग पकडला, पण त्याला त्याच्या उणिवांवर मात करण्याची गरज आहे. पुढच्या वर्षी आशियाई खेळ (Asian Games 2022) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (2022 Commonwealth Games) यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. त्यात त्यानं उत्कृष्ट कामगिरी करणं गरजेचं आहे.

‘दुखापतीतून परत येणं आव्हानात्मक’ श्रीकांत गेल्या काही वर्षांपासून दुखापतींशी झुंजतोय. यावर ते म्हणाले, की सलग सामने असताना दुखापतीतून पुनरागमन करणं कठीण असतं. या दुखापतींमुळे तो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकला नाही. पण त्याचं पुनरागमन पाहून बरं वाटतंय. तो चांगला खेळत आहे आणि हे चांगलं लक्षण आहे.

‘लक्ष्य आणि प्रणॉयचीही चांगली कामगिरी’ भारताच्या श्रीकांतशिवाय लक्ष्य सेन आणि प्रणॉय यांनीही बीडब्ल्यूएफ चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली. गोपीचंद म्हणाले, की महत्त्वाच्या सत्रापूर्वी अशा स्थितीत असणं आनंददायी आहे.

R Ashwin : आर. आश्विननं केला मोठा खुलासा..; म्हणाला, ‘या’ कारणासाठी आला होता निवृत्तीचा विचार

Fab 4 Cricket : सचिन तेंडुलकरच्या ‘तुझे फॅब 4 कोण?’, या प्रश्नावर विनोद कांबळीचं भन्नाट उत्तर!

Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.