Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : मुंबईमधून हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या बाहेर, हे दिग्गज खेळाडू रिटेन

मुंबईसाठी अनेक वर्षे चांगली कामगिरी केलेल्या खेळाडुंमध्ये हार्दिक पांड्या, कृणाल पांड्याचं नाव येते, त्यांना मुंबईने रिलीज केले आहे. तर दुसरीकडे मुंबईसाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी केलेल्या इशान किशानलाही मुंबईने रिलीज केलं आहे.

Mumbai Indians : मुंबईमधून हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या बाहेर, हे दिग्गज खेळाडू रिटेन
मुंबई इंडियन्स संघ
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 9:30 PM

मुंबई : आयपीएलमध्ये यंदा मुंबईकडून कोणत्या खेळाडुंना बाहेरचा रस्ता दाखवणार याचं कुतूहल होतं, मुंबईने काही बड्या खेळाडुंना रिलीज केलं आहे. त्यातली काही नावं अत्यंत धक्का बसणारी आहेत. कारण या खेळाडुंंनी मुंबई इंडियन्ससाठी वर्षानुवर्षे सतत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या खेळाडुंचं रिटेनशन होईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात उलटं झालं आहे. मुंबईने या खेळाडुंना रिटेन न करता बाहेरचा रस्ता दाखवण्यात जास्त स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे मुंबईचे फॅन्स चकीत झाले आहेत.

हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या बाहेर

मुंबईसाठी अनेक वर्षे चांगली कामगिरी केलेल्या खेळाडुंमध्ये हार्दिक पांड्या, कृणाल पांड्याचं नाव येते, त्यांना मुंबईने रिलीज केले आहे. तर दुसरीकडे मुंबईसाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी केलेल्या इशान किशानलाही मुंबईने रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा नवा संघ कसा असणार आहे? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हार्दिक पांड्यानं, कृणाल पांड्याने मुंबईकडून चांगली कामगिरी केल्यानंतरच टीम इंडियात त्यांचं पदार्पण झालं होतं.

रोहित शर्मा, पोलार्ड, बुमराह रिटेन

आयपीएलच्या इतिहासातील सर्वत यशस्वी कॅप्टन अशी ओळख असलेल्या आणि मुंबईला त्याच्या नेतृत्वात पाचवेळा विजेतेपद जिकून देणाऱ्या रोहित शर्मा (हिटमॅन) आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचं मुंबईच्या संघात रिटेंन्शन झालं आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत चांगली कामगिरी करणारा कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव मुंबईकडूनच खेळताना दिसणार आहे. मुंबई गेली कित्येक वर्षे या खेळाडुंवर विश्वास दाखवत आहे आणि त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवत मुंबईला पाचवेळे विजेतेपद जिंकून दिलं आहे.

मुंबईने रिलीज केलेले खेळाडू

अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, सौरभ तिवारी, क्विंटन डिकॉक, पीयूष चावला, इशान किशन, आदित्य तारे, अनुकूल रॉय, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, मार्को यानसन, जिम्मी नीशम, एडम मिल्न, युद्धवीर सिंह, धवल कुलकर्णी, नेथन कुल्टर-नाइल, अर्जुन तेंदुलकर, मोहसिन खान, जयंत यादव आणि राहुल चाहर हे खेळाडू मुंबईने सोडले आहेत.

IPL 2022 Retention, Live Updates : राशिद खान, युजवेंद्र चहल रिटेन होणार नाहीत

काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेणार, काय असेल नवीन राजकीय समीकरण?

सरकार म्हणते 26,697 कोटी रुपये बँकांमध्ये पडून, तुमचे पैसे तर नाहीत ना? असे तपासा

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.