hardik pandya net worth: हार्दिक पंड्याची संपत्ती कोट्यवधीत, लॅम्‍बर्गिनी, मर्सिडीज कारचा मालक, जगतो लग्झरी जीवन

Hardik Pandya And Natasha Stankovic: हार्दिक पंड्या एका आलिशान घराचा मालक आहे. त्याला महागड्या घड्याळे आणि कारची आवड आहे. त्यांचे वडोदरा येथील 6 हजार चौरस फुटांचे घर सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

hardik pandya net worth: हार्दिक पंड्याची संपत्ती कोट्यवधीत, लॅम्‍बर्गिनी, मर्सिडीज कारचा मालक, जगतो लग्झरी जीवन
Hardik Pandya And Natasha Stankovic
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 9:38 AM

Hardik Pandya And Natasha Stankovic Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी दोघांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांचा मुलगा अगस्त्य यांचा सांभाळ दोघे मिळूनच करणार आहेत. आता घटस्फोटानंतर हार्दिक याला नताशाला किती रक्कम द्यावी लागणार, हार्दिक पंड्या याची संपत्ती किती? यावर चर्चा सुरु झाली आहे. हार्दिकने क्रिकेटमधील आपल्या कामगिरीच्या जोरावर चांगली संपत्ती जमवली आहे. करियर ग्रोथप्रमाणे हार्दिकची संपत्ती वाढली आहे.

हार्दिक पंड्या याला लहाणपणापासून क्रिकेटची आवड होती. आज हार्दिक भारतीय क्रिकेट संघाचा मोठे नाव झाले आहे. हर्दिकच्या यशाला 2015 पासून सुरुवात झाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आयपीएलमध्ये हार्दिकचा कामगिरी जबरदस्त राहिली. त्याने वर्षभरात टीम इंडियात आपले स्थान निर्माण केले. जानेवारी 2016 मध्ये हार्दिकने टी 20 आणि एकदिवशी सामन्यातून भारतीय संघात प्रवेश केला.

आयपीएलच्या एका सीझनसाठी 15 कोटी

हार्दिक पंड्याने आज जे काही मिळवले आहे, हे त्याचे वैयक्तीक यश आहे. 2024 मध्ये त्याची नेट वर्थ ₹92 कोटी रुपये होती. मागील पाच वर्षात त्याच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याच्या उत्पन्नाचे मुख्य सोस्त्र IPL आणि BCCI कडून मिळणारी रक्कम आहे. तसेच अनेक कंपन्यांच्या ब्रॅण्डचे तो प्रमोशन करतो. आपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना संघाचा कर्णधारही राहिला आहे. त्यामुळे आयपीएलच्या एका सीझनसाठी त्याला 15 कोटी मिळतात. हार्दिक पांड्याने फक्त नववी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याने क्रिकेटसाठी अभ्यास सोडण्याचा मोठा धोका पत्करला होता.

हे सुद्धा वाचा

किती आहे हार्दिकची संपत्ती

हार्दिक पंड्या एका आलिशान घराचा मालक आहे. त्याला महागड्या घड्याळे आणि कारची आवड आहे. त्यांचे वडोदरा येथील 6 हजार चौरस फुटांचे घर सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. हार्दिकच्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini, Mercedes G-wagon, Audi A6, Range Rover, Rolls Royce, Porsche Canyon, Toyota Etios सारख्या कारचा समावेश आहे. हार्दिकची बहुतांशी संपत्ती त्याच्या आईच्या नावावर आहे. यामुळे घटस्फोटानंतर नताशाला फारशी संतप्ती मिळणार नसल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा… घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला नताशाला किती रक्कम द्यावी लागणार?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.