IND vs SA : सतत चुका करत राहिलो तर जिंकणार कसे? द. आफ्रिकेतील पराभव केएल राहुलच्या जिव्हारी

केएल राहुल असा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे, ज्याने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतले पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. हा लाजिरवाणा रेकॉर्ड बनवल्यानंतर राहुल शांत कसा बसेल. त्याने या पराभवाची वेगवेगळी कारणं मांडली आहेत.

IND vs SA : सतत चुका करत राहिलो तर जिंकणार कसे? द. आफ्रिकेतील पराभव केएल राहुलच्या जिव्हारी
KL Rahul
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 11:16 AM

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आज वनडे सीरीजमधील (one day series) शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताला पराभूत करत भारतावर क्लीन स्विप विजय मिळवला आहे. केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँडस मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने भारतावर 4 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिलं. होतं. हे आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. टीम इंडिया 49.2 षटकांमध्ये सर्वबाद 283 धावांपर्यंत मजल मारु शकली. या विजयासह द. आफ्रिकेने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. याआधी उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेली कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. दरम्यान, द. आफ्रिकेतील पराभव कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) जिव्हारी लागला आहे.

केएल राहुल असा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे, ज्याने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतले पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. हा लाजिरवाणा रेकॉर्ड बनवल्यानंतर राहुल शांत कसा बसेल. त्याने या पराभवाची वेगवेगळी कारणं मांडली आहेत. मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांवर त्याने पराभवाचं खापर फोडलं आहे.

सतत चुका करत राहिलो तर जिंकणार कसे?

असं म्हटलं जातं की, तुम्हाला यश हवं असेल तर तुम्ही तुमच्या चुकांची पुनरावृत्ती करणं टाळलं पाहिजे. भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विराट कोहलीला एकदा सांगितले होते की, तुला जर तुझ्या क्रिकेट कारकीर्दीत यशस्वी व्हायचं असेल तर तुझ्या दोन चुकांमध्ये किमान सहा महिन्यांचं अंतर असायला हवं. पण द. आफ्रिका दौऱ्यावर राहुल अनेक चुका पुन्हा पुन्हा करताना दिसला. तर दुसऱ्या बाजूला संघातील इतर सहकाऱ्यांनीदेखील सातत्याने चुका केल्या. त्यामुळे राहुल म्हणाला की, जर तुम्ही चुकांवर चुका करत असाल तर संघाला सतत पराभूतच व्हावं लागेल. केपटाऊनमधील क्लीन स्वीप पराभवानंतर संघाने केलेल्या चुकांचा राहुलने पाढा वाचला.

फलंदाजांच शॉट सिलेक्शन चुकलं

राहुल म्हणाला की, आमच्या फलंदाजांचं शॉट सिलेक्शन चुकलं. उदाहरण म्हणून तुम्ही श्रेयस अय्यरकडे पाहा. संपूर्ण मालिकेत तो शॉट बॉलविरुद्ध खेळताना चुका करत होता. आता जर शॉट बॉल ही त्याची कमजोरी असेल तर ते चेंडू खेळणं त्याने टाळायला हवं होतं. पण श्रेयसने तसं केलं नाही. तो पहिल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शॉट बॉलविरोधात खेळताना चुकला आणि बाद झाला.

गोलंदाजांची लाइन-लेंथ खराब

केएल राहुलने आपल्या गोलंदाजांनाही धारेवर धरलं. तो म्हणाला, आमच्या गोलंदाजांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आमच्या गोलंदाजांनी तीच चूक केली. आम्ही पॉवर प्लेमध्ये विकेट घेऊ शकलो नाही. तेच आमच्या पहिल्या सामन्यातील पराभवामागचं प्रमुख कारण होतं. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना खेळपट्टीचा अंदाज घेता आला, मैदानात सेट होता आलं.

विराट कोहली

IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’

स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.