‘खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं’, टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) टीम इंडियात निवड झाली आहे. हा डावखुरा खेळाडू मध्य प्रदेशकडून खेळतो आणि अनेकदा ओपनिंग करताना दिसतो. पण, टीम इंडियातील त्याची भूमिका त्याला चांगलीच ठाऊक आहे.

'खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं', टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य
Venkatesh Iyer - Rohit Sharma
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 10:49 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) टीम इंडियात निवड झाली आहे. हा डावखुरा खेळाडू मध्य प्रदेशकडून खेळतो आणि अनेकदा ओपनिंग करताना दिसतो. पण, टीम इंडियातील त्याची भूमिका त्याला चांगलीच ठाऊक आहे. त्याने मान्य केले आहे की, निळ्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी, त्याला गेम सुरू करण्याची नव्हे तर गेम फिनिश करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजेच येथे त्याची भूमिका ओपनरची नसून फिनिशरची असेल. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांने हे सत्य स्वीकारले आहे. (I Have Accepted That I will Be a Finisher in Team India : Venkatesh Iyer)

मात्र, या 27 वर्षीय फलंदाजाला आतापर्यंत फलंदाजीत जे काही यश मिळाले आहे ते केवळ सलामीला येऊनच मिळाले आहे. ओपनिंग करताना त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण, आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात खेळताना त्याने सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं. दुबईत खेळवल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना वेंकटेश रातोरात स्टार झाला. त्याने सलामीला येत आपल्या दमदार फलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम फेरीत नेले. व्यंकटेश अय्यरच्या याच यशामुळे त्याला टीम इंडियाचे तिकीट मिळाले.

टीम इंडियामध्ये माझी भूमिका फिनिशरची : व्यंकटेश

पण, आयपीएलमध्ये ओपनिंग करून धमाल उडवणाऱ्या वेंकटेशची भूमिका टीम इंडियामध्ये काहीशी वेगळी आहे. हार्दिक पांड्या जी भूमिका करत होता तीच भूमिका त्याला इथे करायची आहे. TOI शी संभाषण करताना, तो म्हणाला, “मी हे सत्य स्वीकारले आहे की, टीम इंडियामध्ये माझी भूमिका फिनिशरची आहे. त्यासाठी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहे. तो म्हणाला की, अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये मी मधल्या फळीत फलंदाजी केली. त्यामुळे जेव्हा मी टीम इंडियाकडून खेळायला मैदानात उतरेन तेव्हा माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नसेल.

बाउन्सी ट्रॅक टॅकल करण्याची योजना

वेंकटेशला जेव्हा विचारण्यात आले की, दक्षिण आफ्रिकेच्या बाऊन्सी ट्रॅकला सामोरे जाण्याची त्याची योजना काय आहे? यावर तो म्हणाला की मी अनेक बाऊन्सी ट्रॅकवर खेळलो आहे. भारतात अनेक बाऊन्सी विकेट्स आहेत, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा मला फायदा होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये केएल राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

इतर बातम्या

Ind vs Sa : टीम इंडियापुढे सिलेक्शनचा पेच, कुणाला संधी? कोण बाहेर?

Viral : सोशल डिस्टन्सिंगसह खेळू शकतो का क्रिकेट? यूझरच्या प्रश्नाला दिल्ली पोलिसांचं भन्नाट उत्तर

IND vs SA: निर्णायक केपटाऊन कसोटीआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, दुखापतग्रस्त सिराजच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम

(I Have Accepted That I will Be a Finisher in Team India : Venkatesh Iyer)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.