India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

Ind vs Pak | या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांनी टीम इंडिया जिंकणारच या विश्वासाने सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी या सामन्यात टीम इंडियाचा पराभवही होऊ शकतो, अशी शक्यता बोलून दाखवली आहे.

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, 'या' नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 10:07 AM

कोलकाता: यंदाच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांनी टीम इंडिया जिंकणारच या विश्वासाने सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी या सामन्यात टीम इंडियाचा पराभवही होऊ शकतो, अशी शक्यता बोलून दाखवली आहे.

भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. आपली फलंदाजी मजबूत आहे, जसप्रीत बुमराहच्या समावेशामुळे गोलंदाजीलाही धार आली आहे. मात्र, मला आतून असं वाटतंय की, यावेळी पाकिस्तानचा संघ अधिक तगडा आहे, त्यांचं पारडं जड वाटतंय. पण भारतीय संघ जिंकेल, अशी आशाही मला वाटत असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले. आता त्यांचा हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहावे लागेल.

विराट कोहली काय म्हणाला?

आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.

भारत आणि पाकिस्तानचा संभाव्य संघ

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानी संघ: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

T20 World Cup 2021 IndvsPak live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

T20 World Cup 2021: ग्रुप स्टेजमधून 4 संघ पुढील फेरीत, जाणून घ्या सुपर 12 मध्ये कुठला संघ कोणत्या गटात?

(T20 World Cup 2021 India vs Pakistan)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.