ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?
कोरोनाच्या संकटामुळे भारतातून य़ुएईमध्ये हलवण्यात आलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या तारखा आयसीसीने जाहिर केल्या आहेत. दरम्यान सामने सुरु होण्याची तारीख आणि अंतिम सामना खेळवला जाण्याची तारीख आयसीसीने जाहिर केली आहे.
मुंबई : भारताच्या भूमित यंदा आयसीसी टी-20 विश्वचषकाचे (2021 ICC Men’s T20 World Cup) आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ही स्पर्धा भारतातून हालवून य़ुएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचे सर्व अधिकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) राहणार आहेत. दरम्यान आयसीसीने नुकतीछ विश्वचषकाच्या तारखा जाहिर करत सामने सुरु होण्याची तारीख आणि अंतिम सामना खेळवला जाण्याची तारीख ही जाहिर केली आहे. (ICC Men T 20 World Cup Shifted From India to UAE on 17 October matches Will Start And World cup Final will held on 14 November)
विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमन देशात घेण्यात येणार असल्याचे काही दिवासंपूर्वी आयसीसीने सांगितले होते. त्यानंतर आता स्पर्धा सुरु होण्याची नेमकी तारीख आय़सीसीने सांगितली असून 17 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. संपूर्ण सामने केवळ चार मैदाना खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे.
? ANNOUNCEMENT ?
Details ? https://t.co/FzfXTKb94M pic.twitter.com/8xEzsmhWWN
— ICC (@ICC) June 29, 2021
शेड्यूल कसं असणार?
पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)
यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!
हे ही वाचा :
यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल….
(ICC Men T 20 World Cup Shifted From India to UAE on 17 October matches Will Start And World cup Final will held on 14 November)