T20 World Cup 2021 : यूएईत रंगणार विश्वचषकाचा थरार, कसं आहे संपूर्ण वेळापत्रक, भारतासमोर कधी कोणाचं आव्हान, सर्व माहिती एका क्लिकवर
कोरोनाच्या संकटामुळे भारतातून य़ुएईमध्ये हलवण्यात आलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाला अखेर सुरुवात होत आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशा जवळपास महिनाभर चालणाऱ्या या भव्य स्पर्धेबद्दल सारी माहिती तुम्ही या बातमीत वाचू शकता.
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाला (ICC T20 World Cup 2021) उद्यापासून (17 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. नुकतीच आयपीएल 2021 ही भव्य स्पर्धा संपली असून आता लगेचच आणखी एक मानाची आणि भव्य स्पर्धा क्रिकेट रसिकांसाठी सुरु होत आहे. या विश्वचषकासाठी जगभरातील संघ सज्ज झाले आहेत. आधी भारतात खेळवण्यात येणारा हा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जात आहे. ठिकाण बदललं असलं तरी स्पर्धेची उत्सुकता मात्र तिळभरही कमी झालेली नाही.
विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमन देशात घेण्यात येणार असल्याचे माहिती याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी पहिला सामना पार पडणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या भव्य स्पर्धेचे सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे.
टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-20 विश्व चषकाचे सामने नेमके कसे होणार याबद्दलही याआधीच सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 12 संघामध्ये हा विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या सुपर 12 स्टेजमध्ये ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. तर या ग्रुप स्टेजसच्या सामन्यात ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत. दरम्यान उद्यापासून याच ग्रुप स्टेजसचे सामने सुरु होणार आहेत.
View this post on Instagram
यानंतर 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशाच्या सामन्यांनी सुपर 12 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघ असणार आहेत. तर ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान न्यूझीलंड आणि अफगानिस्तानसह ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही असतील. भारतीय संघाचा विचार करता 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने भारताच्या विश्वचषकाच्या यात्रेची सुरुवात होणार आहे.
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला भारत विरुद्ध पाकिस्तान या 24 ऑक्टोबर रोजीच्या सामन्याने सुरुवात होईल. भारताचे ग्रुप स्टेजमधील सामने पुढीलप्रमाणे-
- भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
सामन्यानंतर खालीलप्रमाणे पॉईंट्स दिले जातील-
विजयी संघाला – 2 गुण बरोबरी, अनिर्णित किंवा रद्द झाल्यास – दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण पराभूत संघाला – 0 गुण
टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन
राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल
विजेत्यांची होणार चांदी
या भव्य स्पर्धेत विजयी रक्कमही तितकीच भव्य आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार विश्वचषक विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12.2 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 6.1 कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी भारतीय रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर (भारतीय चलणानुसार 42 कोटी) इतकी बक्षीसी रक्कम सहभागी संघांमध्ये वाटप केली जाणार आहे.
आतापर्यंतचे विजेते
टी20 विश्वचषक या स्पर्धेला 2007 साली सुरुवात झाली. त्यावर्षी पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्त्वाखाली विजय मिळवत भारताने या विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2009 साली पाकिस्तानने, 2010 साली इंग्लंडने तर 2012 साली वेस्ट इंडिजने जेतेपत मिळवलं. ज्यानंतर 2014 मध्ये श्रीलंकने ट्रॉफी जिंकत 2016 मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजने विजय मिळवत दोन वेळा ही ट्रॉफी पटकावण्याचा मान मिळवला.
Who will lift the ICC Men’s #T20WorldCup in 2021? pic.twitter.com/BabF6X7FEv
— T20 World Cup (@T20WorldCup) October 16, 2021
हे ही वाचा
T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका
(ICC Men T 20 World Cup Starts from 17 October at UAE Know Full Schedule and when indias matches are in World cup on one click)