ICC Rankings: केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीची रँकिंग सुधारली
राहुलने मागच्या कसोटीच्या पहिल्या डावात 123 धावांची शानदार खेळी केली होती. याच खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला होता.
जोहान्सबर्ग: आयसीसीने कसोटीमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. मागच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलच्या क्रमवारीत 18 स्थानांची सुधारणा झाली असून तो 31 व्या स्थानावर पोहोचला आहे. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या बळावरच सेंच्युरियन कसोटीत भारताला 113 धावांनी विजय मिळवता आला होता. दुसऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहली दुखापतग्रस्त असल्यामुळे राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. (ICC Rankings KL Rahul, Jasprit Bumrah, Mohammed Shami Enjoy Gains In Latest ICC Mens Test Rankings)
राहुलने मागच्या कसोटीच्या पहिल्या डावात 123 धावांची शानदार खेळी केली होती. याच खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला होता. राहुलशिवाय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. बुमराहच्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली असून तो 9 व्या स्थानावर पोहोचला आहे.
? Jasprit Bumrah into the top 10 ? Kagiso Rabada surges up
The pace duo make gains in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings for bowling ?
Details ? https://t.co/VkBay1CqRn pic.twitter.com/uw0uOgRDQP
— ICC (@ICC) January 5, 2022
शामीच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. तो 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीत पाच विकेट घेऊन बुमराहने जबरदस्त कामगिरी केली होती. सेंच्युरियनवर शामीने सुद्धा जबरदस्त स्पेल टाकला होता. त्याने दोन्ही डावात मिळून आठ विकेट घेतल्या होत्या. मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीत सुद्धा सुधारणा झाली आहे.
संबंधित बातम्या:
IND vs SA: ‘अर्धवट माहिती असेल, तर तुझं…’, भर मैदानात ऋषभ पंतचा रेसी वान डर डुसें बरोबर राडा IND vs SA: बुमराह-जॅनसेन मैदानावरच भिडले, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, काय आहे प्रकरण? IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत
(ICC Rankings KL Rahul, Jasprit Bumrah, Mohammed Shami Enjoy Gains In Latest ICC Mens Test Rankings)