WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजाना पहिले यश लवकर मिळाले नाही. मात्र तिन्ही वेगवान गोलंदाजानी भेदक गोलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ आय़सीसीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला 'हा' व्हिडीओ पाहाच
icc posted wtc final video
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 7:12 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) हे दोन्ही संघ आमने-सामने भिडत आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यात अद्यापही कोणता ठोस निर्णय मिळाला नसला, तरी आतापर्यंत झालेल्या खेळांत दोन्ही संघानी अप्रतिम क्रिकेटचे दर्शन घडवले आहे. भारताचा पहिला डाव 217 धावांत आटोपल्यानंतर भारतीय गोलंदाजानी सामना वाचवण्यासाठी भेदक गोलंदाजी करायला सुरुवात केली भारतीय गोलंदाजाना पहिले यश लवकर मिळाले नसले तरी तिन्ही वेगवान गोलंदाजानी भेदक गोलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ आय़सीसीने (ICC) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये भारताचे वेगवान गोलंदाजाचे त्रिकुट ज्यात मोहम्मद शमी (Mohammad Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma) हे न्यूझीलंडच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करत आहेत. यात काही सुटलेले झेल देखील दिसत आहेत. तसेच काही डिलेव्हरीज अगदी स्टंपच्या जवळून गेल्याचेही दिसून येत आहे. या व्हिडीओला आयसीसीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत कसोटी सामन्यात यापेक्षा काही थरारक काय असेल? असे भन्नाट कॅप्शनही दिले आहे.

सामन्यावर किंवींची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्या तरी न्यूझीलंड सरसआहे.

संबंधित बातम्या

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

(ICC Shares Indias Fast Bowlers Some fastest deliverys in WTC Final match Against New Zealand)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.