AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Bawa : राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं

इंग्लंडला जोरदार धक्के भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडची 6 विकेटवर 61 धावा अशी खराब परिस्थिती निर्माण झाली होती बावा यांना पहिल्या सहा पैकी चार जणांना आऊट केलं होतं

Raj Bawa :  राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं
राज बावा
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 8:51 AM
Share

U19 World Cup Raj Bawa नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडला. टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यांमध्ये भारताच्या दोन गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून आली. अंतिम सामन्यात राज बावा (Raj Bawa) याच्या कामगिरीचा जलवा पाहायला मिळाला. राज बावा यानं 31 धावा देत पाच विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडला 189 धावांपर्यंत मजल मारता आली. राज बावानं पाच विकेट घेतल्यानं तो फायनलमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानचा गोलंदाज अनवर अली याच्या नावावर होता. अनवर अली यानं 2006 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध 35 धावा देऊन पाच विकेट घेतल्या होत्या. याशिवाय राज बावा हा अंडर 19 वर्ल्ड कप फायनल मध्ये पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

इंग्लंडचं कंबरडं मोडलं

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला धक्के दिले. रवी कुमारने प्रारंभीच्या षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रवीच्या धक्क्यांमधून इंग्लंडचा संघ सावरलेला नसतानाच, ऑलराऊंडर राज बावाने इंग्लंडचा कबंरड मोडलं. सुरुवातीला इंग्लंडची स्थिती 6 बाद 61 अशी झाली होती. यापैकी चार विकेट राज बावा यानं घेतल्या होत्या. जॉर्ज थॉमस, विल लक्सटन, जार्ज बेस, रेहान अहमद यांना राज बावा यानं आऊट केलं होतं. जोशुआ बॉयडेन याला आऊट करत त्यानं पाचवी विकेट घेतली.

घरी खेळाचं वातावरण

राज बावा याला खेळाचा कौटुंबिक समृद्ध वारसा लाभला आहे. त्याचे आजोबा त्रलोचन बावा हे 1948 मध्ये ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या संघाचे सदस्य होते. त्याचे वडिल सुखविंदर बावा हे हॉकी आणि क्रिकेट खेळायचे. त्यांनी क्रिकेट कोच म्हणून करिअर निवडलं.

युवराज सिंह रोल मॉडेल

राज बावा याचे वडिल सुखविंदर यांनी युवराज सिहं याला देखील प्रशिक्षण दिलं आहे. युवराज सिंहच्या ऑलराऊंड खेळीच्या प्रभावामुळं राज बावा यानं त्याला रोल मॉडेल मानलं आहे. राज बावा युवराज सिंह वापरायचा तशाच नंबरची जर्सी वापरतो.

इतर बातम्या:

Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला

U19 World Cup Final…आणि पुणेकर कौशलने सुटलेली कॅच पुन्हा घेतली, पाहा ‘त्या’ अप्रतिम झेलचा VIDEO

icc u19 world cup raj bawa breaks record for best bowling figure in final know about him

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.