U19 World Cup 2022 Final, Ind vs Eng : भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन, यश धुलच्या संघाने रचला इतिहास, फायनलमध्ये इंग्लंडला हरवलं

ICC Under 19 World Cup 2022 Final India vs England LIVE Score and Updates in marathi: भारताचा संघ सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.

U19 World Cup 2022 Final, Ind vs Eng : भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन, यश धुलच्या संघाने रचला इतिहास, फायनलमध्ये इंग्लंडला हरवलं
India Under 19 Team (Photo BCCI)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:14 AM

अँटिग्वा – भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये (ICC under 19 world cup) वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधु (Nishant sindhu) आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या. आजच्या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.

या चार कर्णधारांनी भारताला जिंकून दिला अंडर 19 वर्ल्डकप

भारताने आतापर्यंत आठ वेळा अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. 2000 साली मोहम्मद कैफ त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली 2012 मध्ये उनमुक्त चांद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2020 मध्येही भारताने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव झाला होता. आज भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी करुन पुन्हा एकदा जेतेपद पटकावले. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारता इतका दुसरा कुठलाही यशस्वी संघ नाहीय.

त्या समयी डाव गडगडतो की, काय अशी शंका निर्माण झाली होती

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ बोयडनने इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं. अंगकृष रघुवंशीला शून्यावर बाद केलं. पण त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने सावध, सयमी फलंदाजी करुन इंग्लंडला यश मिळणार नाही याची काळची घेतली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. थॉमस एसपिनवॉल गोलंदाजीवर 21 धावांवर खेळणाऱ्या हरनूरचा विकेटकिपरने सूर मारुन अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुलने डाव सावरला. रशीद अर्धशतक झळकावल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात सेल्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ यश धुलही सेल्सच्या गोलंदाजीवर 17 धावांवर आऊट झाला. त्या समयी डाव गडगडतो की, काय अशी शंका निर्माण झाली होती. पण निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. राज बावा आणि कौशल तांबे बाद झाल्यानंतर दिनेश बाना आणि निशांत सिंधुने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रवी कुमार-राज बावाची भेदक गोलंदाजी

ICC अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या टीमचा निभाव लागला नाही. राज अंगद बावा आणि रवी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांवर रोखलं. अँटिंगामध्ये सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडची टॉप आणि मीडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. जेम्स रियूने 95 धावांची शानदार खेळी केली. 34 धावांवर नाबाद असलेल्या जेम्स सेल्सने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच इंग्लंडचा संघ 189 धावसंख्येपर्यंत पोहोचला. अन्यथा इंग्लंडचा डाव खूप आधीच आटोपला असता.

भारताची प्लेइंग इलेवन – अंगकृष रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, यश धुल, निशांत सिंधु, राज्यवर्धन हानगरगेकर, दिनेश बाना, कौशल तांबे, राज बावा, विक्की ओस्तवाल आणि रवि कुमार

इंग्लंडचा संघ– जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रेस्ट, जेम्स रियू, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, एलेक्स होरटोन, जेम्स सेल्स, थॉमस एसपिनवॉल आणि जोशुआ बॉयडन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.