Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

पाचव्या दिवशीच्या सामन्या भारताला पहिला विकेट मिळवण्याची अत्यंत गरज असताना मोहम्मद शमीने पहिले यश मिळवून दिले. मात्र या यशात शुभमन गिलचा सिंहाचा वाटा होता.

WTC Final : 'सुपरमॅन' शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस
सामन्यात शुभमनने घेतलेला उत्कृष्ट झेल
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 6:36 PM

साऊदम्पटन : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) अत्यंत चुरशीत सुरु आहे. दरम्यान 217 वर पहिला डाव संपवलेल्या भारताला न्यूझीलंडच्या 101 धावा झाल्यानंतरही दोनच विकेट मिळल्याने भारत पिछाडीवर पडला असल्याचं दिसत होतं. त्यावेळीच भारताचा स्वींग किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या रॉस टेलरला बाद करत भारताला तिसरं यश मिळवून दिलं. मात्र या विकेट घेण्यामध्ये शुभमन गिलने टिपलेल्या झेलाचा सिंहाचा वाटा आहे. शुभमनने अप्रतिम झेप टाकत टेलरचा कॅच पकडला. त्याच्या या कॅचची सोशल मीडियावर चर्चा असून त्याच्यावर कौतुकाचा पाऊस नेटकरी पाडत आहेत. (ICC WTC Final Shubman Gill Awsome diving catch Gives india Break through and Ross Taylors Wicket)

…म्हणून झेल महत्त्वाचा

भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारत 217 धावांचे लक्ष ठेवून गोलंदाजी करत होते. मात्र न्यूझीलंडचा संघ 101 धावांवर केवळ 2 बाद अशा मजबूत स्थितीत होता. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाचव्या दिवशी खेळ सुरु करतानाही तिसऱ्या दिवशी अखेरचीच स्थिती होती. 101 धावांवर केवळ दोन विकेट्स असताना बराच काळ भारताला यश मिळत नव्हते. त्यावेळी शमीच्या 64 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रॉस टेलरला बाद केले. यावेळी शुभमनने टाकलेली झेप अप्रतिम होती आणि याच विकेटनंतर अवघ्या 6 ते 7 ओव्हर्समध्येच न्यूझीलंडचे आणखी दोन महत्त्वाचे गडी बाद झाले. दरम्यान याच विकेटमुळे भारताला ब्रेक थ्रू मिळाल्याने शमी आणि शुभमन दोघांचे कौतुक होत आहे.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

शुभमनच्या या अप्रतिम कॅचवर नेटकरी भलतेच फिदा झाले आहेत. ते शुभमनच्या नावाचा जयजयकार करत असून त्यामुले शुभमन गिल ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. गिलच्या कॅचचा फोटो, व्हिडीओ सोबतच त्याचे जुने व्हिडीओही नेटकरी पोस्ट करुन त्याचे कौतुक करत आहेत.

हे ही वाचा :

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

(ICC WTC Final Shubman Gill Awsome diving catch Gives india Break through and Ross Taylors Wicket)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.