AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून हवामान खराब असल्यामुळे पूर्ण ओव्हर खेळवल्या गेलेल्या नाहीत.

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी
ind vs nz wtc final
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 2:34 PM
Share

साऊदम्पटन : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून हवामान खराब असल्यामुळे पूर्ण ओव्हर खेळवल्या गेलेल्या नाहीत. सामन्याचे 4 दिवस झाले असले तरी अजून केवळ 141.1 ओव्हरचाच खेळ पार पडला आहे. त्यामुळे महामुकाबल्याचा महाविजेता कसा काढणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. या प्रश्नाच उत्तर आहे 196 ओव्हर्स. हो सामन्यात उरलेले 196 ओव्हर्स ठरवतील की कोणता संघ जिंकणार. (ICC WTC Final Winner between India An New Zealand Will Decided By this 196 overs)

या 196 ओव्हरमध्ये राखीव दिवशी खेळवल्या जाणाऱ्या ओव्हर्सची संख्याही सामिल आहे. मात्र हवामानाची सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही दिवसांतही शिल्लक सर्व ओव्हर होतील असे वाटत नाही. WTC Final चा सामना 360 ओव्हरचा खेळवला जाणार होता. मात्र आतापर्यंत केवळ 141.1 ओव्हरचाच खेळ झाला आहे. त्यामुळे कोणता संघ विजयी होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकत नसल्याने पुढे खेळवले जाणारे 196 ओव्हर्सच सामन्याचं भवितव्य ठरवतील.

…नाहीतर ट्रॉफी शेअर केली जाणार

सामन्यात पाचवा दिवस आणि राखीव दिवस पकडून 2 दिवस अजून शिल्लक आहेत. मात्र दोन दिवसांतही कोणता ठोस निर्णयापर्यंत सामना न पोहोचल्यास दोन्ही संघाना विजेता घोषित करुन ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. तसेच विजयाची रक्कम ही वाटून दिली जाईल. सामना पूर्ण न होण्याची शक्यता अधिक असण्याचे कारण न्यूझीलंड संघाचा पहिला डावही अजून पूर्ण झालेला नाही. एकीकडे भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत  तर न्यूझीलंडचा संघ 101 धावांवर दोन बाद अशा स्थितीत आहे.

रिजर्व्ह डे बाबत आयसीसीकडून महत्त्वाची माहिती

सामन्यात कोणताही व्यत्यय आल्यास आयसीसीने सामना सुरु होण्याआधीच 23 जून हा दिवस राखीव ठेवला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता राखीव दिवशी खेळ खेळवावा लागणार असल्याने या दिवशीच्या तिकीट आणि प्रवेशांबाबत आयसीसीने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं की, ‘सहाव्या दिवशी खेळवल्या जाणाऱ्या खेळाच्या तिकीटांचे दर कमी केले जाणार आहेत. तसेच ब्रिटनमध्ये होणाऱ्या सामन्यांची ही स्टँडर्ड प्रैक्टिस असल्याने केवळ ब्रिटनच्या नागरिकांनाच सामन्याला येण्याची परवानगी दिली जाईल.’

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधून ताजी माहिती समोर

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

(ICC WTC Final Winner between India An New Zealand Will Decided By this 196 overs)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.