ICC Hall of Fame मध्ये 10 खेळाडूंचा समावेश, भारताच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला मिळालं स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हॉल ऑफ फेमची यादी जाहिर केली. यामघ्ये प्रत्येक दशकातील काही महान खेळाडूंना जागा देण्यात आली आहे.

ICC Hall of Fame मध्ये 10 खेळाडूंचा समावेश, भारताच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूला मिळालं स्थान
icc hall of fame
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:21 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) रविवार 13 जून रोजी क्रिकेट इतिहासातील काही महान खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall Of Fame) सामिल करुन घेतलं. एकूण 10 क्रिकेटपटूंना या यादीत स्थान देण्यात आलं. भारताचे महान अष्टपैलू वीनू मंकड़ (Vinoo Mankad) यांनाही या यादीत स्थान मिळालं असून यंदा स्थान मिळालेले ते एकमेव भारतीय आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होऊ घातलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यापूर्वी ही मानाची यादी जाहिर करण्यात आली आहे. (In ICC Hall of Fame List Sunil gavaskar coach Vinoo Mankad Inducted Along with Kumar sangkara)

या यादीबाबत आयसीसीतर्फे सांगण्यात आले की,‘यामध्ये ज्या 10 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, त्यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. या नव्या खेळाडूंच्या सामिल होण्याने या यादीतील एकूण खेळाडूंची संख्या 103 झाली आहे.’

स्थान मिळालेले खेळाडू

सर्वांत पहिलं नाव 1918 च्या आधीच्या सुमारास दक्षिण आफ्रीका संघाकडून खेळणारे ऑब्रे फॉल्कनर आणि ऑस्ट्रेलियाकडू खेळणारे मोंटी नोबल यांच आहे. त्यानंतरच्या काळात (1918 ते 1946) खेळणारे वेस्ट इंडीजचे सर लीरी कॉन्सटेंटाइन आणि ऑस्ट्रेलियाचे स्टेन मॅककेबे यांच नाव येतं. नंतर (1946 ते 1970) च्या सुमारास खेळणाऱ्यांच्या यादीत भारताचे वीनू मंकड आणि इंग्लंडचे टेड डेक्सटर यांच नाव येत. नंतर (1971 ते 1995) च्या सुमारास खेळणारे वेस्ट इंडीजचे डेसमंड हेन्स आणि इंग्लंडचे बॉब विलिस यांच नाव या यादीत आहे. अखेर (1996 ते 2016) च्या काळातील झिम्बाब्वेचे एंडी फ्लावर आणि श्रीलंकाच्या कुमार संगकारा यांचा समावेश या यादीत होतो.

कोण होते वीनू मंकड

भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून वीनू मंकड़ यांच नाव घेतलं जात. एक सलामीवीरासह संघातील सर्वात महत्त्वाचा फिरकीपटू अशी दुहेरी भूमिका वीनू यांनी पार पाडली. त्यांनी 44 कसोटी सामन्यांत 31.47 च्या सरासरीने 2 हजार 109 रन्स बनवले. तसेच 162 विकेट्सही पटकावल्या आहेत. त्यांची सर्वात यादगार खेळी म्हणजे 1952 ची लॉर्ड्सच्या मैदानावरील आहे. यात त्यांनी दोन डावांत 72 आणि 184 धावांची खेळी केली होती. तसंच तब्बल 97 ओव्हर गोलंदाजी देखील केली होती. त्यांनी सर्व फळ्यांमध्ये फलंदाजी केली होती. तसंच महान फलंदाज सुनील गावस्कर यांना वीनू यांनीच कोचिंग दिली होती.

गावस्करांना आनंद

हॉल ऑफ फेममध्ये वीनू यांचा समावेश करण्यात आल्यानंतर गावस्कर म्हणाले,‘‘ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मते वीनू मंकड़ यांचा वारसा जपायचा असल्यास भारतातील क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक खेळाडूने स्वच:वर विश्वास ठेवायला हवा.’’

हे ही वाचा :

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की

10 सामन्यांत घेतले 67 विकेट्स तरीही भारतीय संघात जागा नाही, ‘या’ गोलंदाजाने मांडली व्यथा

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

(In ICC Hall of Fame List Sunil gavaskar coach Vinoo Mankad Inducted Along with Kumar sangkara)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.