विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंगची छबी, WTC पराभवानंतरही कौतुक

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 8 विकेट्सने गमावला. न्यूझीलंड विरोधात सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराटवर बऱ्याच टीका झाल्या. मात्र एका माजी दिग्गज खेळाडूंना विराटचे कौतुक केले आहे.

विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंगची छबी, WTC पराभवानंतरही कौतुक
विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 2:09 PM

मुंबई : भारतीय संघ ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC WTC) अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. सामन्यात भारतीय फलंदाजानी सर्वात जास्त निराशा केली. त्यात गोलंदाजाच्या निवडीतही चूक झाल्याची टीका अनेकांनी केली. त्यामुळे पराभवाचे सर्वात जास्त खापर हे कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडण्यात आले. सर्व स्तरातून विराटवर टीका होत असताना एका माजी भारतीय क्रिकेटपटूने मात्र विराटचे कौतुक केले असून संपूर्ण स्पर्धेत विराटचे रेकॉर्ड्स चांगले होते असं म्हटलं आहे. इतक्यावर न थांबता या खेळाडूने विराटची तुलना विव रिचर्ड्स (Viv Richards) आणि रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांच्याशी करत विराटमध्ये या दोघांची छबी दिसत असल्याचं म्हटलं आहे.(In Virat Kohli I see viv Richards and Ricky Ponting Says Formar Indian Cricketer Mohinder Amarnath)

हे विधान करणारे खेळाडू आहेत, भारताला 1983 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणारे मोहिंदर अमरनाथ (Mohindar Amarnath). मोहिंदर ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले “विराट कोहली एक महान खेळाडू आहे. तसेच तो एक उत्तम कर्णधारही आहे. आपण भावनेच्या भरात त्याच्याकडून जास्त अपेक्षा लावून बसलो आणि त्या पूर्ण न झाल्याने त्याच्यावर टीकांची झुंबड उडवतो आहे. पण चाहत्यांचेही चूकीचे नसून ते आपल्य आवडत्या खेळाडूकडूनच आस लावतात.”

विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंगची छबी-अमरनाथ

पुढे बोलताना मोहिंदर म्हणाले ”विराटने त्याच काम उत्तमरित्या केलं. त्याच्यासारखा खेळाडू शेकडो वर्षांत एखादा होतो. मलातर विराटमध्ये विव रिचर्ड्स आणि रिकी पाँटिंग या दोघांची छबी दिसते. त्यावरुन विराट किती भारी फलंदाज आहे याचे तुम्ही अनुमान लावू शकता. त्याला भारतीय संघाचा कर्णधार राहायलाच हवे. ”

हे ही वाचा :

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(In Virat Kohli I see viv Richards and Ricky Ponting Says Formar Indian Cricketer Mohinder Amarnath)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.