WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करण्यात सर्व भारतीय खेळाडू व्यस्त आहेत.

WTC Final : 'हे' दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
Team India
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 5:54 PM

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रॅंकिगमध्ये (ICC Test Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघानी कंबर कसली आहे. दरम्यान या सामन्यात भारताचे दोन खेळाडू न्यूझीलंडवर भारी पडू शकतात, अशी भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने (Parthiv Patel) केली आहे. हे खेळाडू म्हणजे फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami). (In WTC Final Cheteshwar Pujara and Mohammed Shami will Play Importan Role says Parthiv Patel)

सध्या दोन्ही संघ इंग्लंडमध्ये आहेत. सर्व खेळाडू आपआपली रणनीती तयार करण्यात व्यस्त असून पूर्ण जोशात सराव करताना दिसत आहेत. इकडे पार्थिव स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात म्हणाला, ”भारताला जर या सामन्यात विजय मिळवायचा आहे, तर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळवायला हवे. जर पुजारा सामन्यात 3-4 तासही क्रिजवर राहतो तर भारत उत्तम स्थितीत पोहचू शकतो आणि पुजाराचया टेस्टमध्ये सर्वाधिक रन बनवेल असाही मला विश्वास आहे.”

शमीची भूमिका महत्त्वाची

भारतासाठी 25 कसोटी आणि 38 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या पार्थिवला भारतीय गोलंदाजावरही विश्वास आहे. त्याच्या मते दमदार फलंदाजीसह उत्कृष्ट गोलंदाजी कोहलीच्या संघाला जिकंवून देईल. तसेच भारतीय गोलंदाजाच्या ताफ्यात मोहम्मद शमीची भूमिका महत्त्वाची असेल.”

दोन भारतीय माजी खेळाडूंना न्यूझीलंडवर विश्वास

याच कार्यक्रमात उपस्थित अन्य माजी भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडचे समर्थन केले. इरफान पठाणच्या (Irfan Pathan) मते न्यूझीलंडचा संघ 55—45 धावांच्या फरकाने पुढे असेल. तसेच केन विल्यमसन (Ken Williamson) सर्वाधिक धावा करेल आणि शमी किंवा ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) सर्वाधिक विकेट्स मिळवतील. तर माजी क्रिकेटर अजित आगरकर म्हणाला, ”सध्यातरी कोण जिंकेल हे सांगणे अवघड आहे. पण न्यूझीलंड या सामन्याच विजयाचा प्रबळ दावेदार आहे. पण सर्वाधिक धावा विराट करेल.”

हे ही वाचा :

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

(In WTC Final Cheteshwar Pujara and Mohammed Shami will Play Importan Role says Parthiv Patel)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.