India vs Australia Full Score, World Cup Final | टीम इंडियाला पराभूत करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन

| Updated on: Nov 20, 2023 | 7:13 AM

India vs Australia 2023 Full Score and Highlights World Cup Final Winner in Marathi | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल सामना सुरू असून भारताची खराब सुरूवात झाली. वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ आपली संपूर्ण ताकद लावताना दिसतील.

India vs Australia Full Score, World Cup Final | टीम इंडियाला पराभूत करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन

अहमदाबाद | वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव केला आहे. टीम टीम इंडियाच्या 241 धावांचा पाठालाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 43 व्या ओव्हरमध्ये सामना जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं आहे. टीम इंडियाला परत एकदा कांगारूंनी फायनलमध्ये चारीमुंड्या चीत केलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू ट्राविस हेड याने शतक करत संपूर्ण सामना एकहाती फिरवला. नाबाद 137 धावा केलेल्या हेड याला लाबुशेन याने नाबाद 58 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

भारताच्या तोकड्या धावांचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांनी डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ यांना माघारी पाठवत दमदार सुरूवात केली होती. मात्र हेड आणि लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करत भारतीय संघाच्या आशाच संपवत सामनाही एकतर्फी केला. सामन्याचा विजयी शॉट मॅक्सवेल याच्या बॅटमधून आला.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 Nov 2023 10:11 PM (IST)

    World Cup 2023 Player of Tournament : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा

    यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

  • 19 Nov 2023 09:26 PM (IST)

    ind vs aus final live score : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन

    टीम इंडियाच्या 241 धावांचा पाठालाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने सहा विकेटने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या विजयासह वर्ल्ड कप ट्रॉफीवर सहाव्यांदा नाव कोरलं आहे. कांगारूंनी परत एकदा भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये पराभूत करत 2003 नंतर 2023 मध्येही पराभूत केलं आहे.

  • 19 Nov 2023 09:21 PM (IST)

    ind vs aus live score : शतकवीर ट्राविस हेड आऊट

    ट्राविस हेड 137 धावांवर आऊट झाला आहे, विजयी धावांचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो कॅचआऊट झाला. शुबमन गिल याने बाऊंड्रीवर एक कडक कॅच घेतला.

  • 19 Nov 2023 09:11 PM (IST)

    ind vs aus final score : लाबुशेनची बहादुर खेळी

    वर्ल्ड कप फायनलमध्ये ट्राविस हेडसोबत मार्नस लाबुशेन यानेही जिगरबाज अर्धशतकी खेळी केली. 100 बॉलमध्ये लाबुशेन याने चौकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यामध्ये त्याने तीन चौकार मारले.

  • 19 Nov 2023 09:00 PM (IST)

    ind vs aus live score : कांगारूंच्या 200 धावा पूर्ण

    भारताने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने २०० धावा पूर्ण केल्या आहेत. आता विजयापासूव अवघ्या काही धावा कांगारू दूर आहेत. सिक्स मारत हेडने हा संघाचं द्विशतक केलं.

  • 19 Nov 2023 08:44 PM (IST)

    Travis Head Hundread : ट्राविस हेडचं विक्रमी शतक

    ट्राविस हेड याने 95 बॉलमध्ये 100 धावा केल्या असून या खेळीमध्ये त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. शतक झाल्यावर जडेजाला पहिल्याच बॉलवर सिक्स मारला आहे.

  • 19 Nov 2023 08:30 PM (IST)

    ind vs aus world cup final Score : ट्राव्हिस हेडने ओढला एकतर्फी सामना

    या सामन्यात ट्राव्हिस हेडने एकतर्फी सामना ओढला आणि भारताला बॅकफूटवर ढकललं. भारताने दिलेल्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 19 ओव्हरमध्ये 71 धावांची गरज आहे. भारताला विजयासाठी 7 विकेट्स मिळवायच्या आहेत.

  • 19 Nov 2023 08:15 PM (IST)

    Ind vs Aus Final Score : हेड, लाबुशेनची शतकी भागीदारी

    ट्राविह हेड आणि लाबुशेन यांच्यात 101 धावांची नाबाद शतकी भागीदारी झाली आहे. एकंदरिक भारतीय संघाच्या हातातून सामना जायला लागल्याचं दिसत आहे. 28 ओव्हरमध्ये बुमराहलाही पहिल्या चेंडूवर हेडने चौकार मारला.

  • 19 Nov 2023 08:06 PM (IST)

    Ind vs Aus final Score : टीम इंडिया बॅकफूटवर

    24 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या 127 धावा झाल्या असून जिंकण्यासाठी कांगारूंना  ११४ धावांची गरज आहे. लाबुशेनसह हेड चिवट फलंदाजी करत आहे.

  • 19 Nov 2023 07:50 PM (IST)

    Ind vs Ais Live Score : ट्राविस हेड याचं दमदार अर्धशतक

    ट्राविस हेड याने 58 बॉलमध्ये 50 धावा करत टीम इंडियाला चांगलंच बॅकफूटवर ढकललं आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने आधी एक शतक केलं असून हे त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं आहे.

  • 19 Nov 2023 07:40 PM (IST)

    Ind vs Aus Final Match Update : ऑस्ट्रेलियाच्या शंभर धावा

    कांगारूंनी लक्ष्याचा पाठलाग करताना 100 धावा पूर्ण केल्या असून आता 141 धावांची गरज आहे. भारतासाठी विकेट मिळवणं महत्त्वाचं आहे  नाहीतर सामना हातातून जावू शकतो.

  • 19 Nov 2023 07:30 PM (IST)

    Ind vs AUS WC Final Live Score : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

    17 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या 93-3 धावा झाल्या आहेत. कांगारूंना अद्याप 148  धावांची गरज असून मैदानात आता लाबुशेन 10आणि ट्राविस हेड 40 धावांवर खेळत आहे. कोणत्या तरी एकाला गोलंदाजाला आता चमत्कार दाखवावाच लागणार असून ही जोडी लवकरात लवकर फोडावी लागणार आहे.

  • 19 Nov 2023 07:20 PM (IST)

    Ind vs Aus Final Live Score : भारताला चौथ्या विकेटची गरज

    टीम इंडियाला आता चौथ्या विकेटची गरज आहे, मैदानात ट्राविस हेड आणि लाबूशेन सेट  होतान दिसत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आता दोघांची भागीदारी तोडण्याची आवश्यकता आहे.

  • 19 Nov 2023 07:11 PM (IST)

    Ind vs Aus Live Score : भारताला 4 धावांचा फटका

    के. एल. राहुल याच्या खराब फिल्डिंगमुळे भारताला चार धावांचं नुकसान झालं आहे. जसप्रीत बुमराहच्या स्लो बॉलवर बॅट्समनसोबत के.ए ल. राहुलही फसला. कांगारूंना अतिरिक्त चार धावा मिळाल्या.

  • 19 Nov 2023 07:03 PM (IST)

    ind vs aus live score : बुमराहला तिसरी विकेट

    टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली असून आता सामन्यावर चांगली पकड मिळवली आहे. भारतासाठी कायम खतरनाक राहिलेल्या स्टीव्ह स्मिथला अवघ्या 4 धावांवर बुमराहने माघारी धाडलं आहे.

  • 19 Nov 2023 06:51 PM (IST)

    Ind vs Aus Final live score : बुमराहचा ‘जोर का झटका’

    ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याला आऊट करत दुसरी विकेट घेतली आहे. भारतासाठी आता मोठी संधी असून कांगारू पूर्णपणे बॅकफूटला गेले आहेत.

  • 19 Nov 2023 06:35 PM (IST)

    ind vs aus live score : टीम इंडियाला दुसऱ्या विकेटची अपेक्षा

    पहिली विकेट गेल्यावर कांगारूंच्या संघावर काहीसा दबाव तयार झाला आहे. शमी आणि बुमरहा घातक मारा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 19 Nov 2023 06:25 PM (IST)

    ind vs aus final score : मोहम्मद शमीने मिळवली पहिली विकेट

    टीम इंडियाने दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. डेव्हिड वॉर्नर याला शमीने आऊट 7 धावांवर आऊट केलं आहे.

  • 19 Nov 2023 06:18 PM (IST)

    ind vs aus live update : काय असणार टीम इंडियाचा ‘गेमप्लॅन’

    वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा ऑल आऊट झाला आहे. शेवटच्या चेंड़वर दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात कुलदीप रन आऊट झाला.  आता भारतीय संघाला 240 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे.

  • 19 Nov 2023 06:06 PM (IST)

    ind vs aus live score : भारताचा संपूर्ण डाव

    भारताने आजच्या डावाला सुरूवात करताना कर्णधार रोहित शर्मा याने कडक सुरूवात केली होती. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही चार धावांवर बाद झाले. विराट आणि रोहितने हल्ला चढवला होता मात्र 47 धावांवर तो कॅच आऊट झाला. रोहित गेल्यावर विराट आणि राहुल यांनी भागीदारी केली होती  परंतु  विराट अर्धशतक झाल्यावर लगोलग आऊट झाला.

    विराटनंतर राहुलने आपल्या हाती कारभार घेतल मात्र त्याला कोणी साथ दिली नाही. रविंद्र जडेजासुद्धा 9 धावा करून माघारी परतला. त्यानंतर सूर्याकडून सर्वांना अपेक्षा होत्या, तोसुद्धा खास काही करू शकला नाही. शेवटल कुलदीप यादवने सिंगल-डबल घेत विकेटची गळती थांबवलीत. सूर्याच आऊट झाल्याने मोठ्या धावसंख्येच्या आशा मावळल्या. अखेर भारताचा डाव 240 धावांवर आटोपला.

  • 19 Nov 2023 05:57 PM (IST)

    ind vs aus live score : टीम इंडिया ऑल आऊट

    भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या असून वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कांगारूंना 241 धावांचं आव्हान असणार आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 200 चा टप्पा पार केला.

  • 19 Nov 2023 05:53 PM (IST)

    ind vs aus live score : सिराजचा कडक चौकार

    मोहम्मद सिराज याने शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार मारत चार धावांची भर टाकली आहे. हेजलवुड याला सिराजने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला.

  • 19 Nov 2023 05:44 PM (IST)

    ind vs aus live score : सुर्यकुमार यादव आऊट

    भारताच्या आता उर-सूर आशा ही संपुष्टात आल्या आहेत. शेवटची आशा असलेला सुर्यकुमार यादव 18 धावांवर आऊट झाला आहे. जोश हेजलवूड याने शॉट  बॉल टाकत आऊट केलं.

  • 19 Nov 2023 05:40 PM (IST)

    ind vs aus live score : टीम इंडियाकडे शेवटचे 18 बॉल

    47 ओव्हर झाल्या असून आता तीन ओव्हर बाकी आहेत. सूर्यावर मोठी जबाबदारी असणार आहे, कारण सूर्याच्या धावांवर अंकुश लावण्याचं काम कांगारू करत आहेत.

  • 19 Nov 2023 05:29 PM (IST)

    ind vs aus live update : टीम इंडियाला आठवा झटका

    टीम इंडियाला आठवा झटका बसला असून जसप्रीत बुमराह आऊट झाला आहे. भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाच ओव्हर बाकी असून दोन विकेट भारताच्या हातात आहेत.

  • 19 Nov 2023 05:24 PM (IST)

    ind vs aus final match live score : मोहम्मद शमी आऊट, मिचेल स्टार्कने घेतली विकेट

    भारताला सातवा झटका झटका बसला असून मोहम्मद शमी 6 धावांवर आऊट  झाला आहे.  मिचेल स्टार्क याने तीन विकेट घेत फलंदाजीला खिंडार पाडलं होतं.

  • 19 Nov 2023 05:13 PM (IST)

    ind vs aus live score : के.एल. राहुल आऊट

    टीम इंडियाला सहावा झटका बसला असून सेट के. एल. राहुल 66 धावांवर आऊट झाला आहे. मिचेल स्टार्क याने त्याला मोक्याच्या क्षणी विकेट घेतली आहे.

  • 19 Nov 2023 05:08 PM (IST)

    ind vs aus final score : टीम इंडियाकडे शेवटचे 60 बॉल

    भारताच्या 40 ओव्हरमध्ये 197-5 धावा झाल्या असून आता  शेवटच्या 60 बॉलमध्ये किती धावा होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मैदानात आता राहुल नाबाद 65 धावा तर सूर्या नाबाद 9 धावांवर खेळत आहेत.

  • 19 Nov 2023 04:59 PM (IST)

    ind vs aus final match score : सूर्यकुमार यादव मैदानात

    भारताचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव आता मैदानात आला असून त्याच्या बॅटींगकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. जडेजाने आजही निराशा केली असून अवघ्या 9 धावा करून आऊट झाला आहे.

  • 19 Nov 2023 04:46 PM (IST)

    ind vs aus final update : रविंद्र जडेजा आऊट

    भारतीय संघ आणखी अडचणीत आला असून रविंद्र जडेजासुद्धा आऊट झाला आहे. जडेजाला 36 व्या ओव्हरमध्ये हेजलवूडने त्याला 9 धावांवर आऊट केलं.

  • 19 Nov 2023 04:40 PM (IST)

    ind vs aus world cup final score : के. एल. राहुलचं अर्धशतक

    के.एल राहुल याने 85 बॉलमध्ये 50 धावा केल्या असून एकटा मैदानात पाय घट्ट रोवून उभा आहे. आता त्याच्याकडून शतकाची अपेक्षा सर्व चाहत्यांना आहे.

  • 19 Nov 2023 04:15 PM (IST)

    ind vs aus aus live update : जड्डूवर मोठी जबाबदारी

    विराट कोहली आऊट झाल्यावर रविंद्र जडेजा मैदानात आला आहे. आता राहुल आणि जडेजा यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर दोघांना मोठी भागीदारी  करावी लागणार आहे.

  • 19 Nov 2023 04:08 PM (IST)

    ind vs aus final live score : टीम इंडिया संकटात, विराट कोहली बोल्ड

    टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला 29 व्या ओव्हरमध्ये बोल्ड केलं असून टीम इंडियाची चौथी विकेट गेली आहे. आता मैदानात रविंद्र जडेजा आला आहे.

  • 19 Nov 2023 03:55 PM (IST)

    ind vs aus final score : विराट कोहलीचं अर्धशतक

    विराट कोहली याने 56 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण करत आणखी एक अर्धशतक केलं आहे. यामध्ये त्याने 4 चौकार मारले आहेत. सलग पाच सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त विराट कोहलीने केल्या असून त्याने याआधीही 2019 सालीसुद्धा हा कामगिरी केली आहे. विराट कोहलीने 3 शतकं, 5 अर्धशतकं केली आहेत.

  • 19 Nov 2023 03:45 PM (IST)

    ind vs aus final live score : भारताच्या धावगतीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून ब्रेक

    भारताच्या धावगतीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ब्रेक लावला असून गेल्या 5 ते 6 ओव्हरमध्ये एकही बाऊंड्री आलेली नाही. विराट आणि राहलला बांधून ठेवलं असून कमिन्स गोलंदाजीमध्ये अनेक बदल करताना दिसत आहे.

  • 19 Nov 2023 03:25 PM (IST)

    ind vs aus live score : विराट-राहुलने सावरला भारताचा डाव

    20 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 115-3 असून विराट नाबाद 39 आणि राहुल 19 धावांवर खेळत आहे. दोघांकडून मोठ्या भागीदाराची अपेक्षा आहे.

  • 19 Nov 2023 03:12 PM (IST)

    IND vs AUS Live Score : विराट-राहुलकडून पार्टनरशीपला सुरूवात

    15 ओव्हरमध्ये भारताच्या 97 -3 धावा झाल्या असून विराट नाबाद 32 आणि के. एल. राहुल 9 धावांवर खेळत आहे.

  • 19 Nov 2023 03:06 PM (IST)

    ind vs aus wc Final live upadate : तो आला अन् सामना थांबवला

    14 व्या ओव्हरमध्ये मैदानात एका फॅन घुसला आणि थेट विराटला जाऊन भेटला. त्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला होता.

  • 19 Nov 2023 03:02 PM (IST)

    ind vs aus live score : दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा

    श्रेयस आऊट झाल्यावर मैदानात के. एल. राहुल आला असून विराट आणि राहुल दोघांमध्ये भागीदारीला  सुरूवात झालेली आहे. सर्वांना दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.

  • 19 Nov 2023 02:52 PM (IST)

    ind vs aus live score : श्रेयस अय्यरही आऊट

    भारतीय संघाला दोन मोठे झटके बसले असून रोहित पाठोपाठ श्रेयसही आऊट झाला आहे. पॅट कमिन्सने त्याला 4 धावांवर माघारी पाठवलं.

  • 19 Nov 2023 02:49 PM (IST)

    ind vs aus live score : रोहित शर्मा आऊट, मॅक्सवेलला विकेट

    ग्लेने मॅक्सवेल याने टीमला मोठा धक्का दिला असून त्याने रोहित शर्माला 47  धावांवर माघारी पाठवलं. रोहित माघारी गेला असून  आता मैदानात श्रेयस अय्यर आला आहे. रोहितने 3 षटकार आणि 4 चौकार मारले होते.

  • 19 Nov 2023 02:36 PM (IST)

    IND vs AUS World cup Live Update : विराटने मोडला रिकी पॉन्टिंगचा विक्रम

    विराट कोहलीने मिचेल स्टार्क याला सातव्या ओव्हरमध्ये सलग तीन चौकार मारत आपल्या इनिंगची झकास सुरूवात केलीये. त्यासोबतच विराटन  वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं. विराटने वर्ल्डकपमध्ये 1755 धावा  केल्या असून तो आता मैदानात नाबाद आहे. पॉन्टिंगच्या वर्ल्ड कपमध्ये 1743 धावा केल्या आहेत. या यादीत  टॉपला सचिन तेंडुलकर असून त्याने 2278 धावा केल्या आहेत.

  • 19 Nov 2023 02:24 PM (IST)

    IND vs AUS Final Score : शुबमन गिल आऊट

    ओपनर शुबमन गिल मोठा फटका मारायच्या नादात कॅच आऊट झाला आहे. मिचेल स्टार्क याने 4 धावांवर त्याला आऊट केलं आहे. विराट कोहली मैदानात आला असून आता रोहित आणि विराट मैदानात आहेत.

  • 19 Nov 2023 02:19 PM (IST)

    IND vs AUS Final Score : रोहितची धडाकेबाज सुरूवात

    चौथ्या ओव्हरमध्ये रोहितने हेजलवूडला सिक्स आणि चौकार मारत कांगारूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारताच्या 4 ओव्हरमध्ये 30 धावा झाल्या आहेत.

  • 19 Nov 2023 02:10 PM (IST)

    ind vs aus live score : रोहितचा दांडपट्टा सुरू

    रोहित शर्मा याने दुसऱ्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करायला सुरूवात केली आहे. रोहितने हेजलवूडला याला दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन चौकार मारत दमदार सुरुवात केली आहे.

  • 19 Nov 2023 02:04 PM (IST)

    IND vs AUS Live Update : फायनल सामन्याला सुरूवात, रोहितसमोर स्टार्कचं आव्हान

    रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले असून ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क पहिली ओव्हर  टाकत आहे. रोहित त्याला कसा फेस करतो हे पाहावं लागणार आहे. कारण साखळी सामन्यात त्याला शून्यावर माघारी पाठवलं होतं.

  • 19 Nov 2023 01:55 PM (IST)

    ins vs aus wc final 2023 : दोन्ही संघाचे खेळाडू राष्ट्रगीतसाठी मैदानात दाखल

    दोन्ही संघाचे खेळाडू राष्ट्रगीतसाठी मैदानात दाखल झाले असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. त्यासोबतच गृहमंत्री अमित शहासुद्धा हा सामना पाहण्यासाठी आले आहेत.

  • 19 Nov 2023 01:52 PM (IST)

    IND vs AUS World Cup Live Score : वायुसेनेचा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एअर शो

    टॉस झाल्यावर वायुसेनेने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एअर शो केला, सर्व क्रिकेट चाहत्यांंचंही मनोरंजन झालं.

  • 19 Nov 2023 01:40 PM (IST)

    Australia Players List World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा फायनलसाठी संघ

    ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), अॅडम झम्पा, जोश हेझलवूड

  • 19 Nov 2023 01:39 PM (IST)

    Team India Players List World Cup Final : भारतीय संघ

    भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • 19 Nov 2023 01:35 PM (IST)

    india vs australia toss winner : कांगारूंच्या पारड्यात टॉस, भारताची पहिली बॅटींग

    फायनल सामन्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे. भारतीय सं किती धावा करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • 19 Nov 2023 01:24 PM (IST)

    IND vs AUS Final Live Score : या मैदानावर भारत-पाक आलेले सामने

    साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघाचा सामना याच मैदानावर झालेला. या सामन्यात भारताने पाकस्तानचा पराभा केला होता.

  • 19 Nov 2023 01:19 PM (IST)

    india vs australia toss winner : रोहित शर्मा टॉस जिंकत कोणता निर्णय घेणार?

    रोहित शर्मा टॉस जिंकत कोणता निर्णय घेणार? पहिली गोलंदाजी की फलंदाजी घेणार याकडे  अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.

  • 19 Nov 2023 12:52 PM (IST)

    IND vs AUS Live Score : टीम इंडिया स्टेडियममध्ये दाखल

    टीम इंडिया स्टेडियममध्ये दाखल झाली असून चाहत्यांनी हे स्टेडियम खचाखच भरलेलंं आहे. सर्व खेळाडू चाहते मैदानात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतील.

  • 19 Nov 2023 12:38 PM (IST)

    Narendra Modi Twit for Team India

    नरेंद्र मोदींचं ट्विट-:

    ऑल द बेस्ट, 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा. असं नरेंद्र मोदी यांनी सामन्याआधी ट्विट करत म्हटलं आहे.

  • 19 Nov 2023 12:34 PM (IST)

    ind vs aus world cup final : फायनल सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सिनेतारकांनी उपस्थिती

    टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया फायनल सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सिनेतारकांनी उपस्थिती लावली आहे

  • 19 Nov 2023 12:23 PM (IST)

    IND vs AUS WC Final Update : वायुसेनेकडून 1.30 ते 1.50 पर्यंत एअर शोचं आयोजन

    वायुसेनेकडून 1.30 ते 1.50 पर्यंत  एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. टॉस झाल्यावर हा शो होणार असून सर्व जग हा शो पाहणार आहे.

  • 19 Nov 2023 12:15 PM (IST)

    IND vs AUS live Update : भारतीय संघ स्डेडियमच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज

    भारतीय संघ स्डेडियमच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आता काही वेळात सर्व खेळाडू स्टेडियमध्ये पोहोचतील.

  • 19 Nov 2023 12:05 PM (IST)

    Australia Players List World Cup

    पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क

  • 19 Nov 2023 11:55 AM (IST)

    Team India Players List World Cup

    रोहित शर्मा (C),  शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • 19 Nov 2023 11:33 AM (IST)

    Ind vs Aus Live Update : टीम इंडियाला फायनलमध्ये या खेळाडूकडून धोका

    टीम इंडियाला ऑसींच्या एका खेळाडूकडून सर्वाधिक धोका आहे. हा खेळाडू म्हणजे स्टीव्ह स्मिथ असून त्याची विकेट लवकर मिळवणं भारतासाठी फायद्याचं आहे.

  • 19 Nov 2023 10:56 AM (IST)

    today match time india vs australia : फायनल सामन्याला किती वाजता होणार सुरूवात

    टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील वर्ल्ड कप फायनल सामना दुपारी दोन वाजता सुरू आहे. त्याआधी दीड वाजता टॉस होणार आहे.

  • 19 Nov 2023 01:00 AM (IST)

    india vs australia toss winner : टॉसचा बॉस कोण होणार?

    फायनल सामन्याला काही मिनिटांंचा अवधी बाकी आहे,  टॉस का बॉस कोण होतो? रोहित शर्मा टॉस जिंकतो की पॅट कमिन्स हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 18 Nov 2023 11:55 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत रोहित आणि कोहलीचा रेकॉर्ड

    ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया उद्या 2023 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. कोहली आणि रोहित शर्मा उद्या सातवा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहेत.

  • 18 Nov 2023 11:00 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात असं असेल हवामान

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 ची अंतिम लढत, रविवारी निर्धारित, स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. सध्याच्या हवामानाचा अंदाज पावसाचा अंदाज नाही. AccuWeather नुसार मुबलक सूर्यप्रकाश आणि स्वच्छ आकाश असेल. दिवसाचे तापमान 33°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे, हळूहळू संध्याकाळी अंदाजे 25°C पर्यंत थंड होईल. आर्द्रता पातळी 38-60 टक्के दरम्यान असण्याची शक्यता आहे.

  • 18 Nov 2023 10:10 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | नरेंद्र मोदी स्टेडियमधल्या खेळपट्टीवरील मागचा रेकॉर्ड

    स्पर्धेतील चार सामने या ठिकाणी खेळले गेले आहेत. मोठी धावसंख्या या खेळपट्टीवर उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाने 286 ही सर्वोच्च धावसंख्या केली होती. इंग्लंडचा संघ पाठलाग करण्यात अयशस्वी ठरला आणि 253 धावांवर बाद झाला. उद्याचा खेळ कोणत्या विकेटवर खेळला जाईल हे अद्याप स्पष्ट नाही.

  • 18 Nov 2023 09:10 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | रोहित शर्माने प्रत्येक फलंदाजाला भूमिका समजावली

    रोहित शर्माने स्पष्ट केले की संघाची योजना मागील टूर्नामेंटपेक्षा वेगळी आहे. कारण प्रत्येक फलंदाजाला वेगळी भूमिका देण्यात आली आहे. सातही फलंदाज बाहेर जाऊन स्फोटक खेळू शकत नाहीत म्हणून त्यांनी प्रत्येकाला वेगळी भूमिका दिली आहे.

  • 18 Nov 2023 08:10 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | विश्वकप जेतेपदापासून एक विजय दूर

    दोन्ही संघ विश्वचषक 2023 चे विजेतेपद मिळवण्यापासून एक विजय दूर आहेत. अंतिम सामना जिंकत स्पर्धेत भारत अपराजित राहण्याच्या इराद्याने उतरेल. उद्या मायदेशात जेतेपद पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागेल.

  • 18 Nov 2023 06:56 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | राहुल द्रविड यांची मोठी भूमिका आहे : रोहित शर्मा

    अहमदाबाद | “राहुल द्रविड यांची मोठी भूमिका आहे. प्रत्येक खेळाडूची भूमिका स्पष्ट आहे. राहुल द्रविड यांनी प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्य दिलं आहे. राहुल द्रविड खेळाडूंच्या मागे ठामपणे उभे राहिले. वर्ल्ड कप 2022 नंतर त्यांनी खेळाडूंना साथ दिली”, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा याने राहुल द्रविड यांच्याबाबत वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

  • 18 Nov 2023 04:57 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | वर्ल्ड कप फायनलचं काउंटडाऊन स्टार्ट

    अहमदाबाद | वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचं काउंटडाऊन सुरु झालंय. महाअंतिम साम्न्याला 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलंय.

    दोन्ही कर्णधार सज्ज

  • 18 Nov 2023 03:45 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाची एकमेकांसमोरची आकडेवारी

    अहमदाबाद | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकूण 13 एकदिवसीय सामन्यात  आमनेसामने भिडले आहेत. या दोन्ही संघांची आकडेवारी कशी राहिली आहे, जाणून घ्या

  • 18 Nov 2023 02:27 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये येण्याची आठवी वेळ

    अहमदाबाद | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये पोहचण्याची ही आठवी वेळ आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाने 7 पैकी 5 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने अखेरचा वर्ल्ड कप 2015 मध्ये जिंकला होता.

  • 18 Nov 2023 12:58 PM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात सरस कोण?

    अहमदाबाद | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आतापर्यंत एकूण 150 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया सरस राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 83 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. तर 10 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

  • 18 Nov 2023 11:52 AM (IST)

    IND vs AUS | चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला फायनलमध्ये किती धावा कराव्या लागतील?

    पीच क्युरेटरने काय सांगितलं?. अहमदाबादच्या या पीचवर विजयासाठी किती धावा पुरेशा ठरतील? वाचा सविस्तर….

  • 18 Nov 2023 11:50 AM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये

    अहमदाबाद | टीम इंडियाची  यंदाची आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ आहे. टीम इंडियाने याआधी 3 वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यापैकी 2 वेळा विजय तर एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • 18 Nov 2023 11:50 AM (IST)

    World Cup 2023 Final | फायनलमध्ये न्यूझीलंडचा ‘हा’ प्लेयर बिघडवू शकतो टीम इंडियाचा खेळ

     20 वर्षानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आहेत. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवल्य. तरीही या देशाचा एक खेळाडू टीम इंडियाच्या अडचणी फायनलमध्ये वाढवू शकतो. वाचा सविस्तर…

  • 18 Nov 2023 10:58 AM (IST)

    Ind vs Aus WC Final 2023 LIVE Updates | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया 20 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये

    अहमदाबाद | 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात महाअंतिम सामना होणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत 9 आणि ऑस्ट्रेलियाने 7 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलंय. त्यानंतर आता या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी झुंज पाहायला मिळणार आहे.

Published On - Nov 19,2023 7:00 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.