CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारत आणि इंग्लंड यांच्या 4 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी सराव म्हणून भारतीय संघ इंग्लंडच्या काउंटी संघासोबत डरहम येथे सराव सामना खेळणार आहे.

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 12:44 PM

डरहम : एकीकडे शिखर धवनची टोळी (Shikhar Dhawan) श्रीलंका संघाला मात देण्यासाठी सज्ज झाली आहे. आज दुपारी 3 वाजता श्रीलंक आणि भारत यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. पण इंग्लंडमध्ये दिग्गज खेळाडू असलेली विराट सेनाही इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून डरहम येथे काउंटी सिलेक्ट 11 यांच्यासोबत सराव सामना खेळणार आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत मात देण्यासाठी भारत हा सराव सामना खेळत आहे. हा एक कसोटी सामना असल्याने आजपासून (20 जुलै) सुरु होऊन पुढील तीन दिवस (23 जुलै पर्यंत) चालणार आहे.

भारताचे दोन्ही विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) कोरोनाच्या संकटामुळे या सामन्याला मुकणार आहेत. त्यामुळे नव्या दमाच्या के. एल. राहुलला (KL Rahul) या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.

सामन्यासंबधी सर्व माहिती

आता हा टीम इंडिया आणि काउंटी XI यांच्यातील सामना नेमका कधी सुरु होणार आणि कुठे पाहता येणार? असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण चिंता नका करु आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहोत…

1. टीम इंडिया विरुद्ध काउंटी XI सराव सामना कधी खेळवला जाईल?

टीम इंडिया आणि काउंटी XI यांच्यातील पहिला सराव सामना 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान खेळवला जाईल.  भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवाक होईल.

2.टीम इंडिया विरुद्ध काउंटी XI सामना कुठे खेळवला जाईल?

हा सामना इंग्लंडच्या डरहम येथील चेस्टर- ली- स्ट्रीट च्या रीवरसाइड मैदानावर खेळवला जाईल.

3. टीम इंडिया विरुद्ध काउंटी XI सामन्याचं LIVE टेलीकास्ट कोणत्या चॅनेलवर होईल आणि LIVE Streaming कुठे पाहता येईल?

या सामन्याचं LIVE टेलीकास्ट भारतात होणार नाही. पण डरहम काउंटी यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर या सामन्याच LIVE Streaming भारतीयांना पाहता येणार आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

(Ind vs Csxi Practice test live Streaming when and where to watch County 11 vs India Live Match)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.