IND vs NZ, 2nd T20I, Live Score : रोहित-राहुलची अर्धशतकं, भारताची न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज T-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रांची : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 सामना भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 153 धावा केल्या होता. भारताने हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. सलामीवीर रोहित शर्मा (55) आणि के. एल. राहुल (65) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात भारताला 154 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सहज पार केलं. सलामीवीर के. एल. राहुलने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. राहुलने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 49 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा सुरुवातीला सावधपणे खेळत होता. मात्र मधल्या षटकांमध्ये त्याने गियर बदलला. रोहितने 36 चेंडूत 1 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने 55 धावा फटकावल्या. रोहित-राहुल बाद झाल्यानंतर संघ अडचणीत येईल असे वाटत होते. मात्र 18 व्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना ऋषभ पंतने सुरुवातीच्या दोन चेंडूंवर सलग षटकार ठोकत सामना जिंकला आहे. दरम्यान, न्यूझीलंडकडून या सामन्यात एकट्या टिम साऊथीने चांगली गोलंदाजी केली. त्याने निर्धारित 4 षटकांमध्ये 16 धावांच्या बदल्यात 3 बळी घेतले. न्यूझीलंडच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही.
LIVE Cricket Score & Updates
-
ऋषभ पंतचे सलग दोन षटकार, भारताचा विजय
न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून पूर्ण केलं आहे. 18 व्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना ऋषभ पंतने सुरुवातीच्या दोन चेंडूंवर सलग षटकार ठोकत सामना जिंकला आहे.
-
राहुलचं अर्धशतक
लोकेश राहुलने अॅडम मिल्नच्या गोलंदाजीवर शानदा षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 40 चेंडूत 51 धावांची खेली केली आहे.
-
-
राहुलची फटकेबाजी, 7 षटकात भारताचं अर्धशतक
7 षटकात भारताचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. यादरम्यान, सलामीवीर लोकेश राहुलने 34 आणि रोहित शर्माने 12 धावा जमवल्या आहेत.
-
भारताचे सलामीवीर रोहित-राहुल मैदानात, राहुलचा पहिल्याच चेंडूवर चौकार
टिम साऊदीचा पहिलाच चेंडू के. एल. राहुलच्या बॅटच्या कडेला स्पर्शून थेड सीमापार गेला
-
न्यूझीलंडचा सहावा गडी माघारी, जिमी निशम 3 धावांवर बाद
न्यूझीलंडने सहावी विकेट गमावली आहे. भुवनेश्वर कुमारने जिमी निशमला 3 धावांवर असताना ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 140/6)
-
-
भारताला पाचवं यश, ग्लेन फिलिप्स 34 धावांवर बाद
भारताला पाचवं यश मिळालं आहे. हर्षल पटेलने ग्लेन फिलिप्सला 34 धावांवर असताना ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केलं (न्यूझीलंड 137/5)
-
न्यूझीलंडला चौथा धक्का, टिम सायफर्ट 13 धावांवर बाद
न्यूझीलंडने चौथी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने टिम सायफर्टला 13 धावांवर असताना भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 125/4)
-
न्यूझीलंडला तिसरा धक्का, डॅरेल मिचेल 31 धावांवर बाद
न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली आहे. हर्षल पटेलने त्याला 31 धावांवर असताना सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 89/3)
-
न्यूझीलंडला दुसरा धक्का, मार्क चॅपमन 21 धावांवर बाद
न्यूझीलंडने दुसरी विकेट गमावली आहे. अक्सर पटेलने मार्क चॅपमनला 21 धावांवर असताना के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 79/2)
-
भारताला पहिलं यश, मार्टिन गप्टील 31 धावांवर बाद
भारताला पहिलं यश, दीपन चाहरने मार्टिन गप्टीलला 31 धावांवर असताना ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 48/1)
-
पहिल्याच षटकात तीन खणखणीत चौकार, गप्टीलची शानदार सुरुवात
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना सुरु झाला आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल मैदानात आले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू भुवनेश्वर कुमारच्या हाती सोपवला. पहिल्याच चेंडूवर गप्टिलने शानदार चौकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर आणखी दोन चौकार वसूल करत गप्टिलने पहिल्या षटकात 14 धावा लुटल्या.
-
भारताची प्लेइंग इलेव्हन
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी आज हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन – केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल
-
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन
मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम स्टायफर्ट, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट
-
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss Update from Ranchi:@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl in the 2nd #INDvNZ T20I. @Paytm
Follow the match ▶️ https://t.co/9m3WflcL1Y pic.twitter.com/JaZuMejYzU
— BCCI (@BCCI) November 19, 2021
Published On - Nov 19,2021 6:47 PM