IND vs NZ Live Score, 1st T20I : पंतचा विजयी चौकार, भारताचा 5 विकेट्सनी रोमहर्षक विजय
T20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर आता पुन्हा एकदा द्विपक्षीय क्रिकेट सुरु होत आहे आणि आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतीला सुरुवात झाली आहे.
T20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर आता पुन्हा एकदा द्विपक्षीय क्रिकेट सुरु होत आहे आणि आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतीला सुरुवात झाली. उभय संघांमधील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावलर आणलं. पण सूर्या बाद होताच श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर दोघेही बाद झाले. ज्यानंतर पंतने अखेरच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना चौकार लगावत विजय भारताच्या नावे केला.
LIVE Cricket Score & Updates
-
पंतचा विजयी चौकार
सामना अतिशय चुरशीच्या क्षणी असताना 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंतने दमदार चौकार लगावत सामना जिंकवला आहे.
-
भारताचा पाचवा गडीही बाद
सूर्यकुमारनंतर श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर दोघेही बाद झाले आहेत. आता भारताला 4 चेंडूत 5 धावांची गरज आहे.
-
-
सूर्यकुमार बाद
62 धावा करुन सूर्यकुमार बोल्टच्या चेंडूवर बाद झाला आहे. भारताला 20 चेंडूत 21 धावांची गरज आहे.
-
भारत विजयाच्या उंबरठ्यावर
भारताला अखेरच्या 24 चेंडूत 23 धावांची गरज आहे. सूर्यकुमार आणि पंत क्रिजवर आहेत.
-
रोहितचं अर्धशतक थोडक्यात हुकलं
रोहित शर्माने भारताची गाडी सावरण्याचा प्रयत्न केलां पण त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे. 36 चेंडूत 48 धावा करुन बाद झाला आहे.
-
-
भारताची गाडी रुळावर, रोहित-सूर्या जोमात
न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या 165 धावांच्या लक्ष्याकडे भारत वेगाने जात असून 11 ओव्हर्सचा खेळ झालेला आहे. भारताला 54 चेंडूत 76 धावांची गरज आहे.
-
भारताला पाचवं यश, टिम सायफर्ट 12 धावांवर बाद
भारताला पायवं यश मिळालं आहे. भुवनेश्वर कुमारने टिम सायफर्टला 12 धावांवर बाद केलं (न्यूझीलंड 153/5)
-
न्यूझीलंडला तिसरा धक्का, ग्लेन फिलिप्स शून्यावर बाद
भारताला तिसरं यश मिळालं आहे. रवीचंद्रन अश्विनने ग्लेन फिलिप्सला शून्यावर बाद केलं (न्यूझीलंड 110/3)
-
भारताला पहिलं यश, डॅरिल मिचेल शून्यावर बाद
भारताला पहिलं यश मिळालं आहे. भूवनेश्वर कुमारने डॅरिल मिचेल शून्यावर बाद केलं. (न्यूझीलंड 1/1)
-
अशी असेल भारताचा प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज
1st T20I. India XI: R Sharma, KL Rahul, S Yadav, S Iyer, R Pant, V Iyer, A Patel, R Ashwin, B Kumar, D Chahar, M Siraj https://t.co/5lDM58bjuP #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 17, 2021
-
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss Update from Jaipur:@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected bowl against New Zealand in the first T20I. @Paytm #INDvNZ
Follow the match ▶️ https://t.co/5lDM57TI6f pic.twitter.com/Z6rs2wZvHc
— BCCI (@BCCI) November 17, 2021
Published On - Nov 17,2021 6:40 PM