IND vs NZ, 2nd Test, Day 2, Live Score : अग्रवाल-पुजाराची फटकेबाजी, दिवसअखेर भारताची बिनबाद 69 धावांपर्यंत मजल
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाज पटेलचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं. दरम्यान, भारताचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. मयंक आणि अक्षरव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. काल सलामीवीर शुभमन गिलने 44 धावांचं योगदान दिलं होतं. दरम्यान, भारताचे 3 फलंदाज भोपळ्यावर परतले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या तिघांचा समावेश आहे. एजाज पटेलने एकट्याने भारताचे सर्व फलंदाज बाद केले.
दरम्यान, भारताला 325 धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था खूपच वाईट झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमिनसनने सर्वाधिक 17 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला 10 धावा जोडता आल्या. या दोघांपैकी कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडचे 3 फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. दरम्यान, भारताकडून रवीचंद्नन अश्विनने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 8 धावा देत 4 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला 2 आणि जयंत यादवला एक विकेट मिळवता आली.
LIVE Cricket Score & Updates
-
दिवसअखेर भारताची बिनबाद 69 धावांपर्यंत मजल
दिवसअखेर भारतीय सलामीवीरांनी बिनबाद 69 धावांपर्यंत मजल मारली आहे. मयंक अग्रवाल 38 आणि चेतेश्वर पुजारा 29 धावांवर खेळत आहेत.
-
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, सलामीवीर अग्रवाल-पुजारा मैदानात
न्यूझीलंडला पहिल्या डावात 62 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर किवी संघाला फॉलो ऑन न देता भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचे सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात दाखल झाले आहेत.
-
-
न्यूझीलंडचा अखेरचा फलंदाज माघारी, काईल जेमिसन 17 धावांवर बाद
न्यूझीलंडचा अखेरचा फलंदाज माघारी परतला आहे, अक्षर पटेलने काईल जेमिसन याला 17 धावांवर असताना श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 62/10)
-
न्यूझीलंडचा 9 वा फलंदाज माघारी, विल सोमरविले शून्यावर बाद
न्यूझीलंडने 9 वी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने विल सोमरविले याला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 62/9)
-
न्यूझीलंडचा 8 वा फलंदाज बाद, ब्लंडेल पाठोपाठ टिम साऊथी माघारी
रवीचंद्रन अश्विने भारताला आठवी विकेट मिळवून दिली आहे. त्याने टिम साऊथीला (0) सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 53/8)
-
-
न्यूझीलंडचा 7 वा फलंदाज माघारी, टॉम ब्लंडेल 8 धावांवर बाद
न्यूझीलंडने 7 वी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने टॉम ब्लंडेल याला 8 धावांवर असताना चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 53/7)
-
न्यूझीलंडचा 6 वा गडी माघारी, रचिन रवींद्र 4 धावांवर बाद
भारताने न्यूझीलंडला 6 वा धक्का दिला आहे, जयंत यादवने रचिन रवींद्र याला 4 धावांवर असताना विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 38/6)
-
न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत, हेन्री नकोलस 6 धावांवर बाद
रवीचंद्रन अश्विने भारताला पाचवं यश मिळवून दिलं आहे. त्याने हेन्री नकोलसला 6 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 31/5)
-
न्यूझीलंडला चौथा धक्का, डॅरेल मिचेल 8 धावांवर बाद
भारताने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला आहे, अक्षर पटेलने डॅरेल मिचेलला 8 धावांवर असताना पायचित पकडलं (न्यूझीलंड 27/4)
-
भारताला तिसरं यश, टॉम लॅथमपाठोपाठ रॉस टेलर माघारी
मोहम्मद सिराजने भारताला तिसरं यश मिळवून दिलं आहे. त्याने रॉस टेलरला (1) त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 17/3)
-
न्यूझीलंडला दुसरा धक्का, टॉम लॅथम 10 धावांवर बाद
भारताने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे, मोहम्मद सिराजने टॉम लॅथमला 10 धावांवर असताना श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 15/2)
-
भारताला पहिलं यश, विल यंग 4 धावांवर बाद
मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. त्याने विल यंगला (4) विराट कोहलीकरवी झेलकेलं. (न्यूझीलंड 10/1)
-
न्यूझीलंडचे सलामीवीर मैदानात
पहिल्या डावात भारताला 325 धावांत रोखल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. त्यांचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग मैदानात दाखल झाले आहेत.
-
भारताचा 10 वा फलंदाज माघारी
एजाज पटेलने भारताचा 10 वा फलंदाज माघारी धाडला आहे. त्याने मोहम्मद सिराजला (4) रचिन रवींद्रकरवी झेलबाद केलं. (भारत 325/10)
-
भारताला 9 वा धक्का, जयंत यादव 12 धावांवर बाद
एजाज पटेलने 9 वी विकेट घेतली आहे. त्याने जयंत यादवला (12) रचिन रवींद्रकरवी झेलबाद केलं. (भारत 321/9)
-
भारताचा 8 गडी माघारी, अक्षर पटेल 52 धावांवर बाद
भारताने 8 वी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने अक्षर पटेलला (52) पायचित पकडलं. सर्वच्या सर्व 8 विकेट एकट्या एजाजने घेतल्या आहेत. (भारत 316/8)
-
अक्षर पटेलचं अर्धशतक
मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र अक्षर पटेलने आपल्या हाती घेतली आहेत. दरम्यान, त्याने 113 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. (भारत 310/10)
-
भारताचा 7 वा गडी माघारी, मयंक अग्रवाल 150 धावांवर बाद
एजाज पटेलने भारताचा सातवा गडी बाद केला आहे. त्याने मयंक अग्रवालला टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केलं. (भारत 191/7)
2nd Test. 99.5: WICKET! M Agarwal (150) is out, c Tom Blundell b Ajaz Patel, 291/7 https://t.co/CmrJV3PZnh #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) December 4, 2021
-
भारताला सहावा झटका, अश्विन शून्यावर बाद
एजाज पटेलने भारताला सहावा धक्का दिला आहे. त्याने रवीचंद्रन अश्विनला त्रिफळाचित केलं. अश्विन भोपळादेखील फोडू शकला नाही. (भारत 224/6)
2nd Test. 71.5: WICKET! R Ashwin (0) is out, b Ajaz Patel, 224/6 https://t.co/CmrJV3PZnh #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) December 4, 2021
-
भारताचा पाचवा गडी माघारी, ऋद्धीमान साहा बाद
एकट्या एजाज पटेलने भारताला अर्धा संघ बाद केला आहे. त्याने काल दिवसभरात 4 बळी घेतलेले. आज सकाळीच त्याने ऋद्धीमान साहाला (27) पायचित पकडत पाचवी विकेट घेतली. (भारत 224/5)
2nd Test. 71.4: WICKET! W Saha (27) is out, lbw Ajaz Patel, 224/5 https://t.co/CmrJV3PZnh #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) December 4, 2021
Published On - Dec 04,2021 10:42 AM