T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनरला संधी नाही, दिग्गज सिलेक्टरने सांगितली प्लेइंग XI

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनरला संधी नाही, दिग्गज सिलेक्टरने सांगितली प्लेइंग XI
Team India
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 12:53 PM

मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. भारताचे दिग्गज निवडकर्ते (सिलेक्टर) सबा करीम यांनी TV9 हिंदीशी खास संभाषणात या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. (IND vs PAK, T20 World Cup 2021: Saba Karim picks his Team India PLAYING XI against Pakistan, Varun Chakraborty not in team)

सबा करीमने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत काही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. भारताच्या माजी निवडकर्त्याने वरुण चक्रवर्तीला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. त्याने आपल्या निर्णयाचे कारणही दिले आहे. हे कारण सराव सामन्यात टीम इंडियाने तयार केलेल्या गेम प्लॅनशी संबंधित आहे.

हार्दिक पंड्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी देण्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या गौतम गंभीरपासून ते पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरपर्यंत सर्वांनी असे म्हटले आहे की, जर त्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकणार नाही. पण सबा करीमच्या मते हार्दिक पंड्याचे संघात स्थान निश्चित आहे. हार्दिक पंड्याला त्याच्या पॉवर हिटिंग कौशल्यामुळे संघात स्थान मिळेल, असे सबा करीमने म्हटले आहे. हार्दिक पंड्याचा संघात समावेश झाल्याने संघात तो आणि ऋषभ पंत असे दोन पॉवर हिटर असतील.

6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह भारत मैदानात उतरणार

साबा करीमने सांगितले की, टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांच्या साथीने मैदानात उतरणार आहे. त्याच्या मते केएल राहुल आणि रोहित शर्मा भारतासाठी सलामी देतील. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरेल. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव संघात असेल. तर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे 5 आणि 6 व्या क्रमांकाचे खेळाडू असतील.

टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कॉम्बिनेशन कसं असेल? यावर सबा करीम म्हणाला की, भारत या सामन्यात 5 स्पेशालिस्ट गोलंदाजांसह मैदानात उतरेल. पण ज्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे त्याचा उल्लेख करीमने केला नाही. ते नाव म्हणजे वरुण चक्रवर्ती. सबा करीम म्हणाला की, “जडेजा आणि अश्विन हे भारताचे दोन मुख्य फिरकीपटू असतील. याशिवाय वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्याकडे असेल. वरुण चक्रवर्तीला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल, असे वाटत नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

इतर बातम्या

T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री

(IND vs PAK, T20 World Cup 2021: Saba Karim picks his Team India PLAYING XI against Pakistan, Varun Chakraborty not in team)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.