IND vs SA, 1st ODI,: पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिका विजयी, भारताचा 31 धावांनी पराभव
टीम इंडिया कसोटीतील पराभवाची भरपाई वनडेमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटीतील विजयापासून प्रेरणा घेऊन वनडे मालिकेत आज मैदानात उतरेल.
India vs South Africa, 1st ODI: कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (oneday series) भारताचं निराशाजनक प्रदर्शन सुरु आहे. आज पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवन (79) (Shikhar dhawan) विराट कोहलीचा (51) (Virat kohli) आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या.
भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी सहा सामन्यांची वनडे मालिका 5-1 अशी जिंकली होती. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन होता. पण आता विराट या संघात फक्त एक फलंदाज म्हणून खेळला. केएल राहुल (KL Rahul) या मालिकेत भारताचा कर्णधार आहे.
असा आहे भारतीय संघ भारत : केएल राहुल ( कॅप्टन ), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रीका : टेंबा बावुमा ( कॅप्टन ), केशव महाराज, क्विंटन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को जॅनसेन, यान्नेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी निगीडी, वेन परनेल, आंदिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेज शम्सी, रासी वान डेर डुसे, काइल वेरेन्ने.