IND vs SA: ‘आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी रहाणे तुला शुभेच्छा’, खवळलेल्या फॅन्सनी म्हटलं Thank you
अजिंक्य रहाणेचा अनुभव लक्षात घेऊन त्याला संघात स्थान दिलं. पण त्याचा संघाला काही उपयोग झाला नाही. यापुढे अजिंक्य रहाणे भारतीय संघात दिसेल की, नाही, या बद्दल साशंकताच आहे.
केपटाऊन: भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आज पुन्हा एकदा निराश केलं. तिसऱ्या निर्णायक केपटाऊन कसोटीत (Capetown test) संघाला गरज असताना रहाणे अत्यंत स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. अवघ्या एका धावेवर खेळत असताना कागिसो राबाडाने (Kagiso Rabada) त्याला एल्गरकरवी झेलबाद केले. खरंतर आज रहाणेने टिकून फलंदाजी करणं गरजेचं होतं. त्याला संघात स्थान देऊ नये, त्याच्याजागी जोहान्सबर्ग कसोटीत चांगली फलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीला खेळवा असं अनेक क्रिकेट पंडितांच म्हणणं होतं.
पण अजिंक्य रहाणेचा अनुभव लक्षात घेऊन त्याला संघात स्थान दिलं. पण त्याचा संघाला काही उपयोग झाला नाही. यापुढे अजिंक्य रहाणे भारतीय संघात दिसेल की, नाही, या बद्दल साशंकताच आहे. कारण अनेकदा संधी देऊनही त्याला संघासाठी योगदान देता आलेले नाही. खराब फॉर्ममुळेच त्याला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणेवर सातत्याने टीका सुरु होती.
It’s time to say #ThankyouRahane#INDvsSA pic.twitter.com/OLuS5KrKpu
— ?ʙɪɴᴇs? (@abineshdfc) January 13, 2022
Best wishes to Rahane for second innings of his life.
Happy Retirement #thankyourahane #rahane #INDvsSA pic.twitter.com/MVi3flt8w7
— Priyanshu Khandelwal (@cricket_loon) January 13, 2022
Congratulations Rahane & Pujara on a wonderful Test career ….. Will miss you in Whites Again.#Thankyoupujara #ThankyouRahane pic.twitter.com/MxmHLy8TUF
— Jayprakash MSDian?? (@ms_dhoni_077) January 13, 2022
पण या कठीण काळात कॅप्टन कोहली, हेड कोच राहुल द्रविड त्याच्या पाठिशी उभे राहिले. पण रहाणेला त्यांचा विश्वास सार्थ ठरवता आला नाही. सकाळच्या सत्रात अजिंक्य रहाणे बाद होताच टि्वटरवर #ThankYouRahane ट्रेंड होत आहे. अनेकदा संधी देऊनही रहाणेला काही करता आलं नाही, त्यामुळे फॅन्सनी रहाणेला ट्रोल केलं. कसोटी क्रिकेटमधील रहाणे त्याची शेवटची इनिंग खेळला असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे.
Last Time when #PURANE was trending I backed these two players but it’s time to move on. Give them some rest or break and bring in S Iyer/Vihari/ Gill. Anyways, result of this match tells how management takes those bold decisions. #SAvIND #SAvsIND #ThankyouRahane #Pujara
— Siddhartha Sharma Nimmaturi (@imsiddharth21) January 13, 2022
अजिंक्य रहाणे त्याच्या करीयरच्या अत्यंत वाईट काळातून जात आहे. 2020 आणि 2021 मध्ये त्याची सरासरी 38.85 आणि 19.57 आहे. ऑक्टोबर 2019 नंतर अजिंक्य रहाणेने फक्त एक शतक झळकावलं आहे.