IND vs WI: स्मृती मानधना-हरमनप्रीत कौर यांनी शतक ठोकले, विश्वचषकातील विक्रम मोडले, एकाच सामन्यात दोन शतके
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार फलंदाजी केली. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या शतकांमुळे टीम इंडियानं 317 धावा केल्या. विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. स्मृती आणि हरमनप्रीतनेही आपल्या खेळीने काही आश्चर्यकारक विक्रम केले. यांनी तीन विकेट्सवर 78 धावा करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
आयसीसी महिला क्रिकेट (Women’s World Cup) विश्वचषक 2022मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध (IND vs WI) शानदार फलंदाजी केली. स्मृती मानधना (123) आणि हरमनप्रीत कौर (109) यांच्या शतकांमुळे टीम इंडियानं 317 धावा केल्या. विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. स्मृती आणि हरमनप्रीतनेही आपल्या खेळीने काही आश्चर्यकारक विक्रम केले. यांनी तीन विकेट्सवर 78 धावा करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर (harmanprit kaur) यांनी चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. विश्वचषकाच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली. त्याने 2017 च्या वर्ल्डमध्ये इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉंट आणि नॅट सायव्हर यांच्यातील 170 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. स्मृती मानधनाने 119 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह शतक झळकावले. तिचे हे वनडेतील पाचवे शतक ठरले. त्याचवेळी, हरमनप्रीत कौरने तिच्या डावात 107 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहे. हरमननं एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे आणि विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. 2017 च्या विश्वचषक स्पर्धेत नाबाद 171 धावांनंतर हे तिचे पहिले शतक होते.
M. O. O. D! ☺️ ☺️#TeamIndia | #CWC22 | #WIvIND | @mandhana_smriti | @ImHarmanpreet
Follow the match ▶️ https://t.co/ZOIa3KL56d pic.twitter.com/PnjydrmuLr
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
Innings Break!
A brilliant batting display by #TeamIndia to post 317/8 on the board against the West Indies! ? ?
1⃣2⃣3⃣ for @mandhana_smriti 1⃣0⃣9⃣ for @ImHarmanpreet
Over to our bowlers now! ? ? #CWC22 | #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/ZOIa3KL56d pic.twitter.com/BTwRiDkuB9
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
एकाच सामन्यात दोन शतके
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शतकांचा विक्रमही मोडला. 1982 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये केवळ एकच शतक झळकावले होते. पण आता एकाच सामन्यात दोन शतके झाली आहेत. त्याचवेळी स्मृती मानधनाने वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले. 2017 च्या विश्वचषकातही त्याने याच संघाविरुद्ध शतक झळकावले होते.
इतर बातम्या