वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलने शानदार सुरुवात केली आहे. त्याने आज वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीला जोरदार तडाखा देताना वनडे करीयरमधील 100 विकेट पूर्ण केल्या. चहलने वेस्ट इंडिजचा कॅप्टन पोलार्ड आणि निकोलस पूरन सारख्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकण्याची संधीच दिली नाही. (Photo: PTI)
आज 6 फेब्रुवारीला पहिल्या वनडेमध्ये खेळताना चहलने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनला पायचीत पकडलं. या विकेटसोबतच त्याने 60 सामन्यात 100 विकेटचं शतक पूर्ण केलं. वेगवान 100 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली. (Photo: AFP)
वनडे 100 विकेटचा टप्पा पूर्ण करणारा चहल भारताचा 22 वा गोलंदाज आहे. तर फिरकी गोलंदाजांमध्ये नववा स्पिनर आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट काढण्याचा विक्रम आजही अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 269 वनडे सामन्यात 334 विकेट घेतल्या होत्या. (Photo: AFP)
100 वी विकेट मिळवल्यानंतर चहलने आपल्या गुगली आणि लेग ब्रेकने वेस्ट इंडिजला आणखी झटके दिले. (Photo: Twitter/ICC)
पूरनची विकेट घेतल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने वेस्ट इंडिजचा कॅप्टन पोलार्डला क्लीन बोल्ड केलं. दुसऱ्या षटकात त्याने शमाराह ब्रूक्सचा विकेट काढला.