India U19 vs South Africa U19 Live Streaming: भारत विरुद्ध द. आफ्रिका सामना कधी, कुठे पाहता येईल?

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे. यश धुल कर्णधार तर एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.

India U19 vs South Africa U19 Live Streaming: भारत विरुद्ध द. आफ्रिका सामना कधी, कुठे पाहता येईल?
U19 Team India
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 1:40 PM

मुंबई : 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक (Under 19 Cricket World Cup) स्पर्धेत, भारत (India U19) आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हे सर्वात मोठे आणि कठीण आव्हान आहे. भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरी गाठणे जवळपास निश्चित होईल. कारण त्यानंतर पुढील दोन सामन्यांमधील भारतासमोरील आव्हान सोपे होईल. मात्र, विरोधी संघ कसाही असेल त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही आणि दक्षिण आफ्रिकेबाबत तर असा विचार अजिबात करु नये. भारताच्या अंडर-19 संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा परफॉर्मन्सही कायम ठेवायचा आहे.

भारतीय संघाने आपले दोन्ही सराव सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. अंडर-19 टीम इंडियाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजच्या अंडर-19 संघाचा पराभव केला. तर दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचा पराभव केला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघही सराव सामना जिंकून भारताचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेला सराव सामना 7 विकेटने जिंकला होता. म्हणजेच आजचा सामना आव्हानात्मक असणार आहे.

U-19 World Cup 2022 साठी भारताचा संघ

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे. यश धुल कर्णधार तर एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर. एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.

स्टँडबाय खेळाडू – ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंग राठोड

भारतीय संघ ब गटात

16 संघांच्या या स्पर्धेत चार गट असून भारताला ब गटात ठेवण्यात आले आहे. भारताशिवाय या गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगच्या टप्प्यात पोहोचतील आणि विजेतेपदासाठी दावा करतील. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. संघाचा दुसरा सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी आणि शेवटचा ग्रुप सामना 22 जानेवारीला युगांडासोबत आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी सुरू होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कुठे होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहायला मिळेल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

मी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकतो?

तुम्ही हॉटस्टारवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासोबतच, तुम्ही आमची वेबसाइट https://www.tv9marathi.com/sports/cricket-news लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करू शकता.

जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक

  • 15 जानेवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना
  • 19 जानेवारी: भारत विरुद्ध आयर्लंड, ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद
  • 22 जानेवारी: भारत विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद

इतर बातम्या

IND vs SA: ‘बाहेरच्या लोकांना माहित नसतं, मैदानात काय…’, विराटचं DRS वादावर मोठ विधान

IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड

(India U19 vs South Africa U19 Live Streaming : where to watch all matches)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.