IND vs ENG 3rd Test Day 3 Live : दिवसअखेर भारताची 2 बाद 215 धावांपर्यंत मजल, इंग्लंडकडे अद्याप 139 धावांची आघाडी

| Updated on: Aug 28, 2021 | 12:28 AM

India vs England 3rd Test Day 3 Live Score: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. इंग्लंड अत्यंत मजबूत स्थितीत आहे. भारताला सामन्यात पुनरागमनासाठी आज अप्रतिम खेळ दाखवण्याची गरज आहे.

IND vs ENG 3rd Test Day 3 Live : दिवसअखेर भारताची 2 बाद 215 धावांपर्यंत मजल, इंग्लंडकडे अद्याप 139 धावांची आघाडी
भारत विरुद्ध इंग्लंड

तिसऱ्या कसोटीमध्ये प्रथम भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी त्यात 9 धावांचं योगदान दिलं आणि इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावे केला आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत आहेत.

Key Events

इंग्लंडकडे अद्याप 139 धावांची आघाडी

तिसरी कसोटी सुरु असेलेलं मैदान फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातंही उघडता आलं नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे इंग्लंडला भारतावर 354 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारत अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 Aug 2021 10:49 PM (IST)

    अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ 4 षटकं अगोदर थांबवण्याचा निर्णय

    अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ 4 षटकं अगोदर थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 27 Aug 2021 10:37 PM (IST)

    पुजारा-विराटची चिवट फलंदाजी, भारताचं द्विशतक

    77 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने एकेरी धाव घेत धावफलकावर भारताचं दिवशतक पूर्ण केलं आहे. पुजारा 84 आणि विराट 39 धावांवर नाबाद खेळत आहेत. (भारत 200/2)

  • 27 Aug 2021 10:05 PM (IST)

    पुजारा-विराटची अर्धशतकी भागीदारी

    रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराला चांगली साथ दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. भागीदारीमुळे 65 षटकांमध्ये भारताने 2 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली आहे. पुजारा 74 आणि विराट 22 धावांवर खेळत आहेत.

  • 27 Aug 2021 08:56 PM (IST)

    चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक

    मोठ्या कालावधीनंतर चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये परतला आहे. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावत सामन्यातील भारताच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. (भारत 123/2)

  • 27 Aug 2021 08:55 PM (IST)

    भारताला मोठा झटका, रोहित शर्मा 59 धावांवर बाद

    इंग्लंडच्या गोलंदाजांना मोठं यश मिळालं आहे. ऑली रॉबिन्सनने सलामीवीर रोहित शर्माला 59 धावांवर असताना पायचित करत भारताला दुसरा झटका दिला आहे. (भारत 116/2)

  • 27 Aug 2021 08:29 PM (IST)

    रोहित-पुजाराची संयमी फलंदाजी, चहापानापर्यंत भारताची 1 बाद 121 धावांपर्यंत मजल

    दुसऱ्या डावात सलामीवीर के. एल. राहुल लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा (59) आणि चेतेश्वर पुजारा (40) या दोघांनी संयमी फलंदाजी करत भारताचं शतक पूर्ण केलं आहे. या दोघांच्या 87 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चहापानापर्यंत 1 बाद 121 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 27 Aug 2021 07:54 PM (IST)

    रोहित शर्माचं अर्धशतक, टीम इंडियाची शतकी मजल

    सलामीवीर रोहित शर्माने 38 व्या षटकात सॅम करनला दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार फटकावले. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव घेत रोहितने अर्धशतक फटकावलं आहे. त्याने 125 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. त्यासोबतच भारतानेदेखील धावफलकावर शतक पूर्ण केलं आहे. (भारत 100/1)

  • 27 Aug 2021 07:37 PM (IST)

    IND vs ENG: भारताकडून संयमी खेळीचे दर्शन

    सध्या मैदानात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे दिग्गज खेळत आहेत. दोघेही संयमी फलंदाजी करत भारताला एका चांगल्या स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • 27 Aug 2021 06:13 PM (IST)

    IND vs ENG: दुसऱ्या सेशनला सुरुवात, पुजारा मैदानात

    दिवसातील दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा रोहितच्या जोडीला फलंदाजीला आला आहे.

  • 27 Aug 2021 05:44 PM (IST)

    IND vs ENG: पहिलं सेशन समाप्त

    तिसऱ्या दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून सामन्यात लंचब्रेक झाला आहे.  इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. पण काही वेळ संयमी फलंदाजी केल्यानंतर सलामीवीर राहुल बाद झाला आहे. त्यामुळे 19 ओव्हरनंतर भारताची अवस्था 34 वर एक बाद झाली आहे.

  • 27 Aug 2021 05:32 PM (IST)

    IND vs ENG : केएल राहुल बाद

    क्रेग ओवरटन टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये भारताला सलामीवीर केएल राहुल झेलबाद झाला आहे. बेअरस्टोवने राहुलचा झेल पकडला आहे.

  • 27 Aug 2021 05:03 PM (IST)

    IND vs ENG : भारताची बचावात्मक सुरुवात

    भारताने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा दोघेबी अगदी संयमी खेळी करताना दिसत आहेत.

  • 27 Aug 2021 04:11 PM (IST)

    IND vs ENG : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर केएल राहुल आण रोहित शर्मा फलंदाजीला आले आहेत.

  • 27 Aug 2021 03:49 PM (IST)

    IND vs ENG : इंग्लंडचा डाव 432 धावांवर समाप्त

    इंग्लंडचा शेवटचा विकेट रॉबिनसनच्या रुपात बुमराहने घेत इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर संपवला आहे. आता भारतीय फलंदाज दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात येतील.

  • 27 Aug 2021 03:43 PM (IST)

    IND vs ENG : इंग्लंडचा ओवरटन बाद

    इंग्लंडचा नववा गडी क्रेग ओवरटनला मोहम्मद शमीने पायचीत केलं आहे. यासोबतच इंग्लंडचा शेवटचा गडी जेम्स अँडरसन मैदानात उतरला आहे.

  • 27 Aug 2021 03:35 PM (IST)

    IND vs ENG : सलग दोन चौकार

    पहिल्याच षटकात इंग्लंडच्या ओवरटनने दोन चौैकार लगावले आहेत. शमीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला नुकसान सहन करावं लागलं आहे.

  • 27 Aug 2021 03:30 PM (IST)

    IND vs ENG : तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु

    तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंडच्या हातात दोन विकेट शिल्लक आहेत. त्यांच्याकडून रॉबिनसन आणि ओवरटन फलंदाजीला आले आहेत.

Published On - Aug 27,2021 3:30 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.