IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO

तिसरा कसोटी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत आहे. कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाज अतिशय खराब प्रदर्शन करत अवघ्या 78 धावांवर सर्वबाद झाले. ज्यानंतर गोलंदाजही खास कामगिरी करत नसून इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागिदारी केली. ज्यानंतर आलेल्या खेळाडूंनीही उत्तम फलंदाजी केली आहे.

IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO
रोहित शर्मा आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:29 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स मैदानात मिळवलेल्या अप्रतिम विजयानंतर तिसऱ्या कसोटीतही भारत इंग्लंड संघावर वर्चस्व मिळवेल असे सर्वांना वाटत होते. पण असे काहीच झाले नाही उलट भारतीय संघाची अवस्था फारच बिकट झाली आहे. आधी भारताचा सर्व संघ पहिल्या डावात 78 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर गोलंदाजीतही खास कामगिरी करु शकला नाही. त्यात क्षेत्ररक्षणा दरम्यान दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही एक चूक केली ज्याचं भारताला चांगलच नुकसान झालं.

पहिला डाव 78 धावांचं क्षुल्लक टार्गेट दिल्यानंतर भारतीय खेळाडू गोलंदाजी करण्यास आले. पण इंग्लंडप्रमाणे भारतीय गोलंदाजाना पटापट विकेट घेता आल्या नाहीत. पहिल्या दिवशीच्या अखेरीस तर एकही विकेट गेला नव्हता. उलट दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली. दरम्यान यातील हमीदचं अर्धशतक पूर्ण होताना त्याच्या बॅटला कट लागून बॉल उडाला होता, जो झेल रोहितच्या हाताजवळून गेला मात्र तो झेल रोहित पकडू न शकल्याने हमीदचं अर्धशतक पूर्ण झालं. ज्यामुळे इंग्लंडलं मोठं जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवशीपर्यंत हमीदला भारताला बाद करता आलं नाही. त्याने उत्कृष्ट 68 धावा ठोकल्या. त्यामुळे रोहितने सोडलेल्या एका झेलामुळे इंग्लंडचं मनोबल वाढलं आणि त्यांनी पहिल्या दिवशी नाबाद राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उत्तम फलंदाजी केली.

तिसऱ्या कसोटीचा आतापर्यंतचा लेखाजोखा

भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने सलामीवीर रॉरी बन्र्स आणि हसीब हमीद यांच्या संयमी सुरुवातीने एक चांगली आघाडी घेतली आहे. दोघांनी अर्धशतक केलं असून रॉरीने 125 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर हमीदने नाबाद 60 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताकडून शमी आणि जाडेजाने अनुक्रमे बर्न्स आणि हमीदची विकेट घेतली. पण कर्णधार रुटने मलानच्या मदतीने पुन्हा एकदा तुफान फलंदाजी सुरु ठेवली.

हे ही वाचा

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

 (India vs England third test Rohit Sharma drops haseeb hameeds catch harms india alot)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.