India vs Namibia T20 world cup 2021: भारताचा नामिबीयावर दमदार विजय, 9 विकेट्सनी दिली मात
India vs Namibia T20 world cup: भारतीय क्रिकेट संघाचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास संपला आहे. न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्याने भारताच्या पुढील फेरीच्या आशा संपल्या आहेत. तरी देखील स्पर्धेतील शेवटचा सामना भारताने जिंकला आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी (India Cricket team) यंदाच्या विश्वचषकातील सेमीफायनलचे दरवाजे बंद झाले आहेत. कारण भारत असलेल्या गटातून आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडचा संघ पुढील फेरीत गेल्याने भारत स्पर्धेबाहेर झाला आहे. पण भारताने विश्वचषकातील शेवटचा सामना जिंकत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. नामिबीया संघाविरुद्धचा सामना भारत दुबईच्या मैदानात खेळवला गेला. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला . भारताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नामिबीयाला 132 धावांवर रोखलं. यावेळी फिरकीपटू आश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी 3 तर बुमराहने 2 विकेट घेतले. ज्यानंतर रोहित आणि राहुल या दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 9 विकेट्सने सामना जिंकला.
टी20 विश्वचषकातील सामन्यांचा स्कोर आणि गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
Key Events
भारत असणाऱ्या ग्रुप 2 मधून पाकिस्तान 4 पैकी 4 विजयांसह सर्वात आधी सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्यापाठी न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे होता. अशावेळी न्यूझीलंडचा संघ जर अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला असता तर तोही केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिला असता. ज्यानंतर भारताने नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवले असते. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत पोहोचला असता. पण न्यूझीलंडने सामना जिंकल्यामुळे भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे.
भारत असलेल्या गटातून आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडचा संघ पुढील फेरीत गेल्याने भारत स्पर्धेबाहेर झाला आहे. पण भारताचा विश्वचषकातील आजचा नामिबीयाविरुद्धचा सामना शेवटचा सामना आहे. हा सामना विराट कोहलीचा टी20 संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असू शकल्याने हा जिंकून भारत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs NAM: भारत 9 विकेट्सनी विजयी
रोहित आणि राहुल या दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने नामिबीयावर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे.
-
IND vs NAM: राहुलचंही अर्धशतक पूर्ण
रोहितप्रमाणे सलामीवीर राहुलने देखील अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 35 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.
-
-
IND vs NAM: रोहित शर्मा तंबूत परत
अर्धशतक पूर्ण होताच काही वेळात रोहित शर्मा बाद झाला आहे. जॅन फ्रिलँकने त्याला बाद केलं आहे. रोहितने 37 चेंडूत 56 धावा केल्या असून 10 षटकानंतर भारताचा स्कोर 87 झाला आहे.
Match 42. 9.5: WICKET! R Sharma (56) is out, c Zane Green b Jan Frylinck, 86/1 https://t.co/mYADVv04NF #INDvNAM #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 8, 2021
-
IND vs NAM: रोहितचं अप्रतिम अर्धशतक
रोहितनं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 31 चेंडूत 50 धावा केल्या आहेत.
-
IND vs NAM: भारताची उत्तम सुरुवात
133 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच जबरदस्त केली आहे. सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी फटकेबाजी करण्यात सुरुवात केली आहे.5 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 44 वर शून्य बाद आहे.
-
-
IND vs NAM: भारतीय सलामीवीर मैदानात
भारताचा संघ 133 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा सध्या मैदानात आहेत.
-
IND vs NAM: नामिबीयाचा डाव 132 धावांवर आटोपला
नामिबियाच्या संघाने अखेरपर्यंत झुंज देत 8 विकेट्स गमावत 20 ओव्हरमध्ये 132 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी 133 धावांची गरज आहे.
-
IND vs NAM: बुमराहने टिपली डेविडची विकेट
बुमराहने त्याचा सामन्यातील दुसरा विकेट मिळवला आहे. त्याने डेविड विसला रोहितच्या हाती झेलबाद करवलं आहे.
-
IND vs NAM: फिरकीपटूंची जादू सुरुच
भारताच्या फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी सुर ठेवली आहे. आश्विनने आणखी 2 तर जाडेजाने 1 विकेट घेतली आहे. 95 धावांवर नामिबीयाचे 7 गडी बाद झाले आहेत.
-
IND vs NAM: आश्विनला यश, स्कॉटलंडा चौथा गडी बाद
स्कॉटलंडचा चौथा गडी जॅनच्या रुपात तंबूत परतला आहे. आर आश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने त्याचा झेल घेतला आहे.
-
IND vs NAM: जाडेजाच्या खात्यात दोन विकेट्स
भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजाने दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवल्या आहेत. आधी क्रेग विल्यम्सची विकेट घेतल्यानंतर जाडेजाने सलामीवीर स्टीफनला पायचीत केलं आहे.
-
IND vs NAM: स्कॉटलंडचा सलामीवीर बाद
स्कॉटलंडचा सलामीवीर मायकल लिंगेन बाद झाला आहे. बुमराहच्या चेंडूवर शमीने त्याची कॅच घेतली आहे.
-
IND vs NAM: स्कॉटलंडची दमदार सुरुवात
स्कॉटलंडच्या सलामीवीरांनी उत्तम सुरुवात करत 3 ओव्हरमध्येन एकही विकेट न गमावता 25 धावा केल्या आहेत.
-
IND vs NAM: भारतीय संघात एक बदल
भारताने आजच्या सामन्यासाठी केवळ एक बदल केला आहे. मागील सामन्यात संधी देण्यात आलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती देत आज राहुल चाहरला संधी दिली आहे.
A look at #TeamIndia‘s Playing XI for the game against Namibia. ?#T20WorldCup #INDvNAM
Follow the match ▶️ https://t.co/kTHtj7LdAF pic.twitter.com/rtKRt0AVJR
— BCCI (@BCCI) November 8, 2021
-
India vs Namibia Toss result: भारताने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
विश्वचषकाच्या अखेरच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
? Toss Update ?#TeamIndia have elected to bowl against Namibia. #T20WorldCup #INDvNAM
Follow the match ▶️ https://t.co/kTHtj7LdAF pic.twitter.com/1ARCim5756
— BCCI (@BCCI) November 8, 2021
-
IND vs NAM: अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज
Hello from Dubai for #TeamIndia‘s clash against Namibia ?
Huddle time before the toss ✅#T20WorldCup #INDvNAM pic.twitter.com/T58HM7CqC4
— BCCI (@BCCI) November 8, 2021
-
IND vs NAM: अखेरच्या सामन्यासाठी भारत सज्ज
भारत असलेल्या गटातून आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडचा संघ पुढील फेरीत गेल्याने भारत स्पर्धेबाहेर झाला आहे. पण भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे. आज शेवटचा सामना भारत नामिबीयाविरुद्ध खेळणार आहे.
Published On - Nov 08,2021 6:20 PM