Ind vs NZ, Live 1st Test, Day 1 Score : खराब प्रकाशामुळे वेळेच्या आधीच खेळ समाप्त, भारताच्या 258 धावा, चार गडी बाद

| Updated on: Nov 26, 2021 | 12:39 AM

खराब प्रकाशामुळे आजचा भारताचा खेळ संपला आहे. आजचा दिवस भारतासाठी चांगला राहीला. चार गडी गमवून भारताने एकूण  258 धावा केल्या. श्रेयश अय्यर आणि रविंद्र जाडेजा अजूनही नाबाद आहेत. श्रेयसने धामाकेदार खेळ करत अर्धशतक झळकावलं आहे.

Ind vs NZ, Live 1st Test, Day 1 Score : खराब प्रकाशामुळे वेळेच्या आधीच खेळ समाप्त, भारताच्या 258 धावा, चार गडी बाद
श्रेयस अय्यर

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज कसोटी मालिकेचा पहिला दिवस होता. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आराम  करण्याची संधी दिलीय. तर विराट कोहली दुसऱ्या  मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करेल. आजच्या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. खराब प्रकाशामुळे आजचा भारताचा खेळ संपला आहे. आजचा दिवस भारतासाठी चांगला राहीला. चार गडी गमवून भारताने एकूण 258 धावा केल्या. श्रेयश अय्यर आणि रविंद्र जाडेजा अजूनही नाबाद आहेत. श्रेयसने धामाकेदार खेळ करत अर्धशतक झळकावलं आहे. अय्यरने पहिल्या दिवशी 75 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे जाडेजानेदेखील 50 धावा केल्या असून तोही मैदानात पाय रोवून आहे.

Key Events

भारतात न्यूझीलंडचं खराब रेकॉर्ड

न्यूझीलंडच्या टीमचं भारतातील कसोटीमधील रेकॉर्ड निराशाजनक राहिलेलं आहे. कीवी टीमला भारतात एकही कसोटी मालिका विजय मिळवता आलेला नाही. 2016 मध्ये न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. मात्र ते एकही मॅच जिंकू शकले नव्हते.

भारत पहिल्या क्रमांकावर

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध केली होती. टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Nov 2021 04:57 PM (IST)

    खराब प्रकाशामुळे वेळेच्या आधीच खेळ समाप्त, भारताच्या 285 धावा, चार गडी बाद

    खराब प्रकाशामुळ आजचा खेळ संपला आहे. अय्यर आणि जाडेजा नाबाद असून खेळ संपल्यामुळे ते परतले आहेत. सध्या भरताने 258 धावा केल्या असून चार गडी गमावले आहेत. 84 षटकांत भारताने या धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर सध्या 75 धावांवर खेळत आहे. तर रविंद्र जाडेजाने अर्धशतक पूर्ण केले असून तो सध्या 50 धावांवर खेळत आहे

  • 25 Nov 2021 04:15 PM (IST)

    भारताच्या 241 धावा, चार गडी बाद

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारत फलंदाजी करत आहे. सध्या  80 षटकांत भारताने 241 धावा केल्या आहेत. भारताचे एकूण चार गडी बाद झाले आहेत.

  • 25 Nov 2021 03:20 PM (IST)

    श्रेयस अय्यरचं पदार्पणात अर्धशतक तर टीम इंडियाच्या 202 धावा पूर्ण

    श्रेयस अय्यरनं पदार्पणात अर्धशतक पूर्ण केलं आहे. टीम इंडियानं 68 व्या ओव्हरमध्ये 202 धावा पूर्ण केल्या आहेत. ग्राऊंडवर टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा मैदानाता आहेत. श्रेयस अय्यरनं रुचिन पटेलला शानदार चौकार लगावला.

  • 25 Nov 2021 03:13 PM (IST)

    श्रेयस अय्यरनं अजिंक्य रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला, पदार्पणातचं झळकावलं अर्धशतक

    श्रेयस अय्यरनं अजिंक्य रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.  त्यानं पदार्पणातचं  अर्धशतक झळकावलं आहे.  श्रेयस अय्यरनं कसोटी पदार्पणात सयंमी खेळी केलीय. आतापर्यंत त्यानं 50 धावा केल्या असून 67 ओव्हरपर्यंत टीम इंडियानं 199 धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2021 03:01 PM (IST)

    श्रेयस अय्यरची पदार्पणात अर्धशतकाच्या दिशनं वाटचाल

    श्रेयस अय्यरनं कसोटी पदार्पणात सयंमी खेळी केलीय. आतापर्यंत त्यानं 44 धावा केल्या असून 64 ओव्हरपर्यंत टीम इंडियानं 192 धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2021 02:48 PM (IST)

    श्रेयस अय्यरची पदार्पणात सयंमी खेळी, टीम इंडियानं 170 धावांचा टप्पा ओलांडला

    श्रेयस अय्यरनं कसोटी पदार्पणात सयंमी खेळी केलीय. आतापर्यंत त्यानं 29 धावा केल्या असून 60 ओव्हरपर्यंत टीम इंडियानं 170 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

  • 25 Nov 2021 02:10 PM (IST)

    टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण

    टीम इंडियानं 150 धावा पूर्ण केल्या असून सध्या मैदानात रवींद्र जाडेजा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.  थोड्याच वेळात टी ब्रेक होण्याची शक्यता असल्यानं तोपर्यंत टीम इंडिया किती धावा करणार हे पाहावं लागणार आहे.

  • 25 Nov 2021 01:52 PM (IST)

    टीम इंडियाला चौथा धक्का, कर्णधार अजिंक्य रहाणे आऊट, श्रेयस अय्यर रवींद्र जाडेजा मैदानात

    टीम इंडियाला चौथा धक्का बसला असून  कर्णधार अजिंक्य रहाणे 35 धावा करुन आऊट झाला आहे., श्रेयस अय्यर रवींद्र जाडेजा मैदानात असून टीम इंडियाच्या  145 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडनं कमबॅक केलं आहे.

  • 25 Nov 2021 12:53 PM (IST)

    चेतेश्वर पुजारा तंबूत परतला, टीम इंडियाला तिसरा धक्का, 100 धावा पूर्ण

    टीम इंडियाला दुसऱ्या सत्रात मोठा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजारा देखील आऊट झाला असून  टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या  3 विकेटसवर 106 धावा झाल्या आहेत.

  • 25 Nov 2021 12:17 PM (IST)

    शुभमन गिल दुसऱ्या सत्राच्या पहिल्या ओव्हरमध्ये आऊट

    पहिल्या सत्रात शानदार फलंदाजी करणारा शुभमन गिल दुसऱ्या सत्रातील पहिल्या ओव्हरमध्येच आऊट झाला आहे. काईल जेमिनसन यानं शुभमग गिलला बोल्ड आऊट केलं.

  • 25 Nov 2021 12:15 PM (IST)

    दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु, शुभमन गिल चेतेश्वर पुजारा मैदानात

    लंच नंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला अशून शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या सत्रात विकेट न गमावता मोठी धावसंख्या उभारण्याचं दोन्ही खेळाडूंचं लक्ष असेल.

  • 25 Nov 2021 11:42 AM (IST)

    पहिल्या सत्राचा खेळ संपला, टीम इंडियाच्या 82 धावा, गिल- पुजारानं मैदानात तळ ठोकला

    कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळं संपला असून आतापर्यंत टीम इंडियानं 29 ओव्हरमध्ये एका विकेटवर 82 रन केल्या आहेत. सलामीवीर शुभमन गिल यानं 85 तर चेतेश्वर पुजारानं 15 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालनं 13 रन केल्या आहेत.

  • 25 Nov 2021 11:29 AM (IST)

    शुभमन गिलनं अर्धशतक झळकावलं

    शुभमन गिलनं अर्धशतक झळकावलं आहे. डावाच्या सुरुवातीपासून शुभमन गिल यानं चांगली खेळी केली. त्यानं 27 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एक रन घेत अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुध्द एक अर्धशतक झळकावलं आहे.

  • 25 Nov 2021 11:15 AM (IST)

    शुभमन गिलचा एजाज पटेलला जोरदार चौकार

    22 वी ओव्हर टाकणाऱ्या एजाज पटेल ओव्हरमध्ये शुभमन गिल यानं जोरदार चौकार लगावला आहे.यावेळी केन विलियमसनकडे यावेळी कॅच घेण्याची संधी होती पण तो यशस्वी झाला नाही.

  • 25 Nov 2021 10:55 AM (IST)

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

    टीम इंडियाच्या 50 धावा  17 व्या ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या आहेत. शुभमन गिल यानं चौकार ठोकत टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण केल्या.

  • 25 Nov 2021 10:39 AM (IST)

    ड्रिंक्स ब्रेक

    भारताची 14 षटके पूर्ण झाली असून संघाच्या खात्यात 36 धावा आल्या आहेत. तर एक विकेट गमावला आहे. यावेळी एक ड्रिंक्स ब्रेक आहे. शुभमन गिल 16 धावांवर नाबाद खेळत आहे, तर पुजारा पाच धावांवर खेळत आहे.

  • 25 Nov 2021 10:37 AM (IST)

    गोलंदाजीत बदल, साऊदीचे पुनरागमन

    केन विल्यमसनने गोलंदाजीत बदल केला आहे. सतत गोलंदाजी करणाऱ्या काईल जेम्सनला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी टीम साऊदीला गोलंदाजी सोपवण्यात आली आहे.

  • 25 Nov 2021 10:26 AM (IST)

    दहा षटकानंतर भारताच्या एक बाद 24 धावा

    भारत आणि न्यूझिलंड यांच्यामध्ये पहिला कसोट सामना सुरू आहे. भारताने आपल्या पहिल्या दहा षटकांमध्ये एक गड्याच्या मोबदल्यात 24 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल 13 धावांवर बाद झाला. सध्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत.

  • 25 Nov 2021 10:16 AM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का, मयंक अग्रवाल आऊट

    टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. मयंक अग्रवाल आऊट  झाला आहे. त्यानं 13 धावा केल्या.

  • 25 Nov 2021 09:58 AM (IST)

    मयंकनं मारला डावातील पहिला चौकार

    टीम इंडियाकडून मयंक अग्रवाल यानं डावातील पहिला चौकार पाचव्या ओव्हरमध्ये मारला आहे.

  • 25 Nov 2021 09:55 AM (IST)

    5 व्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाच्या बिनबाद 15 धावा

    टीम इंडियाच्या सलामीवीरांनी पाचव्या ओव्हरपर्यंत पडझड न होऊ देता  15 धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2021 09:53 AM (IST)

    शुभमन गिलला Review नं तारलं

    टीम साऊदीने टाकलेला बॉल शुभमन गिलच्या पॅडवर येऊन आदळला. न्यूझीलंड संघाने एलबीडब्ल्यूचं अपील केल्यानंतर अंपायरने गिलला आऊट दिले. पण गिलने रिव्ह्यू घेतला त्यामध्ये पॅडवर बॉल आदळण्यापूर्वी तो बॅटला लागला होता आणि त्यामुळे गिलला नॉट आऊट देण्यात आलं.

  • 25 Nov 2021 09:40 AM (IST)

    मयंक अग्रवालनं खातं उघडलं

    मयंक अग्रवालनं टीम इंडियाकडून खात उघडलं आहे. टीम इंडियानं आतापर्यंत तीन धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2021 09:32 AM (IST)

    टीम इंडियाचे सलामीवीर मैदानात, गिल मयंक जोडीकडून भक्कम सलामीची आशा

    टीम इंडियाकडून पहिल्या डावाची सुरुवात शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी केली आहे. दोघांकडून टीम इंडियाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 25 Nov 2021 09:24 AM (IST)

    शुभमन गिल मयंक अग्रवाल टीम इंडियाच्या डावाची ओपनिंग करणार

    टीम इंडियाकडून पहिल्या डावाची सुरुवात शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्यावर आहे. दोघांकडून टीम इंडियाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 25 Nov 2021 09:18 AM (IST)

    श्रेयस अय्यरला सुनील गावस्कर यांच्या हस्ते टीम इंडियाची कॅप

    टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर यानं कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी श्रेयसला टीम इंडियाची कॅप देत त्याचं स्वागत केलं.

  • 25 Nov 2021 09:16 AM (IST)

    न्यूझीलंडच्या संघात रचिन रवींद्रचं पदार्पण

    न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, विल यंग, ​​रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काइल जेम्सन, टिम साउथी, एजाज पटेल, विल सोमरविले.

  • 25 Nov 2021 09:14 AM (IST)

    टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

    भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव आणि इशांत शर्मा.

  • 25 Nov 2021 09:11 AM (IST)

    अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकला, टीम इंडियाचा बॅटिंगचा निर्णय

    विराट कोहलीच्या अनुपस्थित टीम इंडियाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आलेली आहे.  अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Nov 25,2021 9:08 AM

Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.