India vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावांपर्यंत मजल

| Updated on: Jun 21, 2021 | 12:07 AM

India vs New Zealand Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात

India vs New Zealand Live, WTC Final 2021 3rd Day : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावांपर्यंत मजल
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यावर (WTC Final 2021)  न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 44 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार काळ मैदानात टिकता आलं नाही. न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज काईल जेमिनसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत अर्धा भारतीय संघ (5 बळी) बाद केला. त्याला ट्रेंट बोल्ट आणि वॅगनरने प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ दिली. (India vs New Zealand live score WTC Final 2021 3rd Day Match Scorecard online Southampton in marathi)

त्यानंतर फलंदाजी करणाऱ्याने न्यूझीलंडच्या संघाने संयमी खेळ करत 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिला विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर टॉम लॅथम 30 धावांवर बाद झाली. पुढे कर्णधार केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यानी धावफलक हलता ठेवत संघाला शंभरी पार करुन दिली. कॉनवे याने संयमी अर्धशतक झळकावत संघाची सामन्यावरील पकड मजबूत करुन दिली. आजच्या दिवसातील अखेरच्या षटकात इशांत शर्माने कॉनवेचा काटा काढला, त्याने 153 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार विलियमसन 12 धावांवर नाबाद आहे. त्याच्या जोडीला रॉस टेलर मैदानात आला आहे. त्याने अद्याप खातं उघडलेलं नाही.

Key Events

विराट-रहाणे जोडीने सावरली भारताची नौका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारताला सुरुवात चांगली मिळाली तरी अवघ्या 18 धावांमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्याने भारतीय संघ बॅकफुटवर ढकलला गेला होता. अशावेळी कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळ करत डाव सावरला. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेने ही उत्तम साथ दिली. 67 व्या ओव्हरमध्ये जेमिसनने 44 धावांवर खेळणाऱ्या विराटला बाद केलं आणि संघाला उतरती कळा लागली. त्यानंतर पंतही लगेचच बाद झाला. त्यावेळी रहाणे संघाची नौका पार करेल असे वाटत असतानाच 49 धावांवर वॅगेनर याने रहाणेला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. ज्यानंतर कोणत्याही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही आणि भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपला. मात्र इतक्या धावा करण्यातही रहाणे आणि कोहली यांचाच सिंहाचा वाटा आहे.

काईल जेमिसन ठरला घातक

इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. भारताकडे असणारी तगडी बॅटिंग लाईन पाहता हा स्कोर बराच कमी आहे. पण यामागील कारण आहे न्यूझीलंडचा 6 फुट 8 इंचाचा बोलर काईल जॅमिसन. जॅमिसनने कर्णधार विराटसह (Virat Kohli) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट घेतली. सोबतच बुमराह आणि इशांत यांना एकात ओव्हरमध्ये बादही केलं. जेमिसनने एकाच डावात भारताचे 5 गडी बाद केले. त्यामुळे भारताचा जाव 217 धावांवर रोखण्यात जेमिसनचा ‘मोठा’ हात आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 20 Jun 2021 11:04 PM (IST)

    भारताला दुसरं यश, सलामीवीर कॉनवे 54 धावांवर बाद, न्यूझीलंड 101/2

    टीम इंडियाच्या गोलंदाजांना दिवसअखेर दुसरं यश मिळालं आहे. इशांत शर्माने सलामीवर डेवॉन कॉनवे याला 54 धावांवर बाद केलं आहे. (न्यूझीलंड 101/2)

  • 20 Jun 2021 10:43 PM (IST)

    एका विकेटच्या बदल्यात न्यूझीलंडचं शतक, कॉनवेची संयमी अर्धशतकी खेळी

    न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात धिम्या गतीने झाली असली तरी सघाने सामन्याव चांगलीच पकड मिळवली आहे. सलामीवीर डिवॉन कॉनवे याने 137 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक (54) झळकावलं आहे. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 45 षटकांमध्ये 1 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 20 Jun 2021 10:36 PM (IST)

    न्यूझीलंडचा सलामीवीर डिवॉन कॉनवेचं अर्धशतक

    सयंकमी फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डिवॉन कॉनवे याने 137 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक (52) झळकावलं आहे. दरम्यान न्यूझीलंडने 44 षटकात 1 बाद 99 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 20 Jun 2021 10:05 PM (IST)

    न्युझीलंडला पहिला झटका, टॉम लॅथम बाद

    न्युझीलंडला पहिला झटका, टॉम लॅथम बाद, लेथमने 104 चेंडूत 30 धावा केल्या, यामध्ये 3 चौकारांचा समावेश

  • 20 Jun 2021 09:17 PM (IST)

    न्यूझीलंडचं अर्धशतक, सलामीवीर लॅथम-कॉनवेची सावध सुरुवात

    न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी धिमी सुरुवात केली खरी, परंतु चहापानानंतर टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे या दोघांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोघांनी मिळून 25 षटकांमध्ये धावफलकावर अर्धशतक झळकावलं आहे.

  • 20 Jun 2021 08:43 PM (IST)

    चहापानापर्यंत न्यूझीलंडची बिनबाद 36 धावांपर्यंत मजल, 181 धावांनी पिछाडीवर

    न्यूझीलंडने पहिल्या डावाता धिम्या गतीने सुरुवात केली आहे. न्यूझीलंड संघाने चहापानापर्यंत 21 षटकात बिनबाद 36 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या जलदगती गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आहे. इशांत-शमी जोडीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आहे खरं, परंतु 21 षटकांच्या खेळानंतरही भारताला अद्याप यश मिळालेलं नाही.

  • 20 Jun 2021 08:06 PM (IST)

    इशांत-शमीचा टिच्चून मारा, अद्याप यश नाही

    न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाल्यापासून भारताच्या जलदगती गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आहे. इशांत-शमी आणि बुमराहने न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आहे खरं, परंतु 15 षटकांच्या खेळानंतरही भारताला अद्याप यश मिळालेलं नाही. न्यूझीलंडने 15 षटकात केवळ 22 धावा जमवल्या आहेत.

  • 20 Jun 2021 07:26 PM (IST)

    WTC Final 2021 : डेवन कॉन्वेचा सुंदर शॉट, न्यूझीलंडला चौकार

    बुमराह टाक असलेल्या 8 व्या ओव्हरमध्ये डेवन कॉन्वेने आणखी एक चौकार ठोकला आहे.

  • 20 Jun 2021 07:12 PM (IST)

    WTC Final 2021 : डेवन कॉन्वेची चौकाराने सुरुवात

    न्यूझीलंडचा नवनिर्वाचित सलामीवीर डेवन कॉन्वेने चौकाराने आपलं खातं खोललं असून त्याने पाचव्या ओव्हरमध्ये इशांतला चौकार ठोकला आहे.

  • 20 Jun 2021 07:08 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंड संघाला पहिला चौकार

    न्यूझीलंड संघाकडून टॉम लॅथमने चौथ्या ओव्हरमध्ये बुमराहच्या बॉलवर चौकार मारत न्यूझीलंडच्या संघाचे चौकारांचे खाते खोलले आहे.

  • 20 Jun 2021 07:06 PM (IST)

    WTC Final 2021 : कोहली संघाचा आत्मविश्वास वाढवताना

    भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या बॅटिंगची सुरुवात झाली असून कर्णधार विराट कोहली खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवताना दिसून येत आहे.

  • 20 Jun 2021 06:59 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात

    न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून टॉम लॅथम आणि डेवन कॉन्वे मैदानात उतरले आहेत.

  • 20 Jun 2021 06:39 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताचा पहिला डाव संपुष्टात, 217 धावांवर संघ सर्वबाद

    भारतीय संघाचा पहिला डाव संपला असून सर्व संघ मिळून 217 धावा करु शकला आहे. भारताकडून रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या.

  • 20 Jun 2021 06:38 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताचा 10 विकेट पडला, जाडेजा 15 धावा करुन बाद

    भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला आहे. 914 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बोल्टने जाडेजाला बाद करत भारतीय संघाला ऑलआऊट केलं आहे.

  • 20 Jun 2021 06:33 PM (IST)

    वारीवरून वारकऱ्यांमध्येच संभ्रम, शासन निर्णयावरून आळंदी आणि देहू संस्थानात वेगवेगळे निर्णय

    वारीच्या शासन निर्णयावरूनच आळंदी आणि देहू संस्थानात वेगवेगळे निर्णय

    शासनाचा निर्णय देहू संस्थानला मान्य, आमची कोणतीही मागणी शासनाकडे नसल्याचं देहू संस्थानचं म्हणणं,

    तर वारीला अश्वासाठी परवानगी द्या, आळंदी देवस्थानची मागणी,

    उद्याच्या राज्यपालांना भेटायला जाणाऱ्या वारकरी शिष्टमंडळात देहू संस्थांन सहभागी होणार नाही,

    शासनाचा निर्णय मान्य, देहू संस्थानची वारीची तयारी सुरू,

    मात्र आळंदी देवस्थानची भूमिका अजूनही ठरेना,

    वारीवरून वारकऱ्यांमध्येच संभ्रम

  • 20 Jun 2021 06:30 PM (IST)

    WTC Final 2021 : जेमिसनकडून लागोपाठ दोन विकेट्स, शर्मा नंतर बुमराही बाद

    न्यूझीलंडच्या कायिल जॅमिसनने लागोपाठ दोन विकेट घेत भारताची अवस्था 217 वर 9 बाद केली आहे.

  • 20 Jun 2021 06:26 PM (IST)

    WTC Final 2021 : जेमिसनला आणखी एक विकेट, इशांत शर्मालाही धाडलं तंबूत

    लंच ब्रेकनंतर काही वेळातच कायिल जॅमिसनने आणखी एक विकेट घेतला आहे. इशांत शर्माला बाद करत भारताची स्थिती 213 वर 8 बाद केली आहे.

  • 20 Jun 2021 06:16 PM (IST)

    WTC Final 2021 : खेळाला पुन्हा सुरुवात, जेमिसनच्या हातात चेंडू

    लंच ब्रेकनंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली आहे. 90 वी ओव्हर कायल जेमिसन टाकत असून जाडेजा आणि इशांत क्रिजवर आहे.

  • 20 Jun 2021 05:33 PM (IST)

    WTC Final 2021 : दिवसाचे पहिले सेशन संपले, भारत 211 वर 7 बाद

    तिसऱ्या दिवशीचे पहिले सेशन संपले असून भारत 7 बाद 211 या स्थितीत आहे. जाडेजा आणि इशांत फलंदाजी करत आहे.

     

  • 20 Jun 2021 05:24 PM (IST)

    WTC Final 2021 : आश्विनही तंबूत परत, साऊदीने घेतला विकेट

    एक चौकार खेचल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर साऊदीने आश्विनची शिकार केली. स्लीपमध्ये उभा असलेल्या लॅथमने आणखी एक झेल पकडत भारताला सातवा झटका दिला आहे.

  • 20 Jun 2021 05:18 PM (IST)

    WTC Final 2021 : आश्विनच्या चौकारात भर

    आश्विनच्या चौकारात आणखी एका चौकाराची भर पडली आहे. साऊदीच्या बॉलवर आणखी एक चौकार आश्विनने खेचला आहे.

  • 20 Jun 2021 05:10 PM (IST)

    WTC Final 2021 : भारतीय संघाचं द्विशतक पूर्ण, आश्विन आणि जाडेजा मैदानावर

    टीम साऊदीला 84 व्या ओव्हरमध्ये आश्विनने एक कडक चौकार मारला आहे. 84 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 198 वर 6 बाद आहे.

  • 20 Jun 2021 05:05 PM (IST)

    WTC Final 2021 : आश्विनच्या बॅटमधून पहिला चौकार

    आश्विनने 83 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बोल्टला एक उत्कृष्ट चौकार खेचला आहे. 83 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 190 वर 6 बाद झाला आहे.

  • 20 Jun 2021 04:49 PM (IST)

    WTC Final 2021 : दोन्ही फिरकीपटू फलंदाजीला

    अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रवीचंद्रन आश्विन फलंदाजीसाठी आला आहे. त्यामुळे सध्या जाडेजा आणि आश्विन हे दोन्ही फिरकीपटू फलंदाजी करत आहेत.

  • 20 Jun 2021 04:44 PM (IST)

    WTC Final 2021 : अजिंक्य रहाणे बाद, नील वॅगनरच्या चेंडूवर विकेट

    अजिंक्य रहाणे बाद, नील वॅगनरच्या चेंडूवर लॅथमने टीपला उत्कृष्ट झेल

  • 20 Jun 2021 04:39 PM (IST)

    WTC Final 2021 : जाडेजाकडून सुंदर शॉट खेळत चौकार

    रवींद्र जाडेजाने 78 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर उत्कृष्ट शॉट खेळत चौकार मिळवला आहे.

  • 20 Jun 2021 04:36 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडकडून बोलिंगमध्ये बदल, रहाणेचा चौकार

    तिसऱ्या दिवशी सुरुवातीपासून कायिल जॅमिन्सन आणि बोल्टकडून गोलंदाजी सुरु होती. 78 व्या ओव्हरला न्यूझीलंडने कॉलीन डी-ग्रँडहोमला गोलंदाजी दिली असून पहिल्याच चेंडूवर रहाणेने चौकार ठोकला आहे.

  • 20 Jun 2021 04:35 PM (IST)

    WTC Final 2021 : मैदानात ऊन पडल्याने दोन्ही संघाना दिलासा

    पहिले दोन्ही दिवस हवामान खराब असल्यामुळे चांगला खेळ होऊ शकला नाही. आता तिसऱ्या दिवशी मैदानात थोडं ऊन पडल्याने आज संपूर्ण ओव्हर्सचा सामना होण्याची आशा आहे.

  • 20 Jun 2021 04:22 PM (IST)

    WTC Final 2021 : चौकाराने जाडेजाने खोललं खातं

    रवींद्र जाडेजाने चौकार मारत धावा करण्यास सुरुवात केली आहे. 75 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 161 वर 5 बाद आहे.

  • 20 Jun 2021 04:17 PM (IST)

    WTC Final 2021 : भारतीय संघाला आणखी एक धक्का, ऋषभ पंत बाद

    जेमिन्सने आणखी एक महत्त्वाचा विकेट घेत ऋषभ पंतला बाद केले आहे. स्लीपमध्ये लॅथमने पंतचा झेल पकडला. आता फलंदाजसाठी रवींद्र जाडेजा आला आहे.

  • 20 Jun 2021 04:15 PM (IST)

    WTC Final 2021 : भल्या मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताच्या खात्यात चौकार

    बऱ्याच प्रतिक्षेनंतर भारतीय संघाच्या खात्यात चौकार पडला आहे. ऋषभ पंतने जेमिन्सनला चौकार ठोकला आहे.

  • 20 Jun 2021 04:01 PM (IST)

    WTC Final 2021 : भारत 150 पार, पंत आणि रहाणे मैदानावर

    भारतीय संघाने अखेर 150 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. चार विकेट्सच्या बदल्यात भारताने 150 धावा पूर्ण केल्या आहेत 71 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 150 असून रहाणे आणि पंत क्रिजवर आहेत.

  • 20 Jun 2021 03:46 PM (IST)

    WTC Final 2021 : भारतीय संघाचा चौथा गडी बाद, कर्णधार विराट कोहली बाद

    भारतीय संघाचा कर्णधा विराट कोहली बाद, 68 व्या ओव्हरमध्ये कायिल जॅमिन्सनच्या चेंडूवर कोहली पायचीत

  • 20 Jun 2021 03:28 PM (IST)

    WTC Final 2021 : तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु, विराट आणि अजिंक्य मैदानात

    अर्धा तास उशिराने सामना सुरु झाला असून विराट आणि अजिंक्य मैदानात उतरले आहेत.

  • 20 Jun 2021 03:21 PM (IST)

    WTC Final 2021 : आज हवामान ठिक राहिल्यास रात्री 11 पर्यंत चालणार सामना

    आज हवामान चांगले रहिल्यास तीन सेशनमध्ये सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हे सेशन असे असती.

    पहिले सेशनः 3.30pm-5.30pm

    दूसरे सेशनः 6.10pm-8.25pm

    तीसरे सेशनः 8.45pm-11pm

  • 20 Jun 2021 03:04 PM (IST)

    WTC final 2021 : तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकरच सुरु, भारतीय वेळेनुसार 3.30 ला सामन्याला सुरुवात

    मैदानाची तपासणी पूर्ण झाली असून लवकरच तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु करण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3.30 ला सामन्याला सुरुवात होणार आहे.

  • 20 Jun 2021 02:48 PM (IST)

    WTC final 2021 : तिसऱ्या दिवशीच्या खेळाला विलंब, मैदानाची तपासणी सुरु

    खराब वातावरणामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळाला विलंब होणार असल्याचे नुकतेच आयसीसीने स्पष्ट केले. सध्या मैदानाची तपासणी सुरु असून लवकरच खेळ सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 20 Jun 2021 02:40 PM (IST)

    WTC final 2021 : सामना सुरु होण्यापूर्वी मैदानाची तपासणी सुरु

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी मैदानाची आणि हवामानाची स्थिती पाहिली जात आहे. तज्ज्ञमंडळी मैदानात उतरले असून पुढील तपासणी भारतीय वेळेनुसार दुपारी 2.50 मिनिटांनी होईल.

Published On - Jun 20,2021 2:38 PM

Follow us
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.