India vs nz day 1 : पहिल्या कसोटीत श्रेयस अय्यरचा बोलबाला, तर राहणे दोन चेंडूवर दोनदा बाद
कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरनं अर्धशतक झळकावलं आहे. दरम्यान राहणेच्या इनिंगदरम्यान एक अजब घटना घडली. राहणे सलग चेंडूवर दोन चेंडूवर दोनदा बाद झाला आहे.
क्रिकेट : तीन ट्वि-20 सामन्यात भारतीय टीमने न्यूझीलंडला व्हाईटव्हॉश केल्यानंतर आता पहिल्या कसोटीतही पहिल्या दिवशी भारताने दमदार कामगिरी केलीय. पहिल्या कसोटीत भारताची मध्यम फळी फूल फॉर्म मध्ये आहे. तर कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरनं अर्धशतक झळकावलं आहे.
कानपूरच्या ‘बादशाह’कडून श्रेयसला कॅप
कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरला माजी क्रिकेटपट्टू सुनिल गावस्कर यांनी कॅप दिलीय. गावस्करांचं कानपुरात धावांचं दमदार रेकॉर्ड आहे. गावस्करांना कानपूरचा बादशाहही म्हटलं जातं. त्याच गावस्करांच्या हातून कॅप मिळाल्यानंतर श्रेयसनं दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर गावस्कर पुन्हा चर्चेत आलेत.
अजिंक्य राहणे दोन चेंडूवर दोनदा बाद
अजिंक्य राहणेच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वातच भारतीय संघ कानपूर कसोटी गाजवताना दिसतोय. राहणेला मात्र आज मोठी कामगिरी करता आली नाही. तो 35 धावांवर बाद झाला. दरम्यान राहणेच्या इनिंगदरम्यान एक अजब घटना घडली. राहणे सलग चेंडूवर दोन चेंडूवर दोनदा बाद झाला आहे. आधीच्या चेंडूवर अंपायरने आउट दिल्यावर राहणेने डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या अंपायने नॉट आउटचा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर राहणे क्लीन बोल्ड झाला.
रविंद्र जडेजा, शुभमन गिलचंही अर्धशतक
श्रेयस अय्यरबरोबरच सलामीवर शुभमन गिलनेही अर्धशक केलं, मात्र त्यानंतर तो लगेच आउट झाला. तर दुसरीकडे रविद्र जडेजानेही श्रेयश अय्यरसोबत खिंड लढवत अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे एकूणच भारताच्या मधल्या फळीने आज चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या जोरावरच भारतानं अडीचशे धावांचा टप्पाही पार केला आहे.
आजच्या चर्चेतल्या बातम्या