India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: पाकिस्तानचा दमदार विजय, 10 विकेट्सनी सामना जिंकत भारताला केलं पराभूत
India vs Pakistan T20 World Cup 2021 Live Score and Updates in Marathi: बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सध्या दुबईच्या मैदानात पार पडला. यात पाकने भारताचा दारुण पराभव केला.
भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडला. भारतीय संघाची खराब फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमुळे सामना भारताने गमावला. अत्यंत खराब सुरुवात झाल्यानंतर भारताने केवळ 151 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या. यामध्ये कर्णधार कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा केल्या. यावेळी पाकिस्तानच्या शाहीनने सर्व महत्त्वाचे विकेट घेतले. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार आणि विराट यांचा समावेश आहे. पाकिस्तानसमोर असलेल्या 152 धावांच टार्गेट त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी अर्धशतकं ठोकत सामना पूर्णत्वास नेला.
Key Events
सामन्यात भारत पराभूत झाला असला तरी विराटने या सामन्यात अर्धशतक झळकावत टी20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं लगावण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 9 अर्धशतकं लगावली होती. विराटनेही 9 अर्धशतकं लगावली असून आजच्या अर्धशतकासह त्याची टी20 विश्वचषकात 10 अर्धशतकं झाली आहेत.
भारताच्या सुमार फलंदाजीमागचं कारण म्हणजे पाकिस्तानची अप्रतिम गोलंदाजी. यामध्ये पाकिस्तानच्या शाहीनने सर्व महत्त्वाचे विकेट घेतले. यात त्याने सर्वात आधी रोहित शर्माला पायचीत केलं. त्यानंतर सूर्यकुमारला झेलबाद केलं. तर अखेरच्या षटकात विराटलाही झेलबाद करत तंबूत धाडलं.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs PAK: 10 विकेट्सनी पाकिस्तान विजयी
भारताच्या 152 धावाचं आव्हान पाकने एकही विकेट न गमावता जिंकला आहे. बाबरने 68 आणि रिजवानने 79 धावा करत सामना जिकून दिला.
-
IND vs PAK: बाबर पाठोपाठ रिजवानचंही अर्धशतक
बाबर आजमनंतर आता दुसरा ओपनर रिजवाननेही अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
-
IND vs PAK: 14 षटकानंतर पाकिस्ताच्या 112 धावा
पाकिस्तानचे 14 षटकानंतर 112 रन झाले आहेत. अजूनही एकही विकेट पडली नसून दोन्ही सलामीवीर मैदानात टिकून आहेत.
-
IND vs PAK: पाकिस्तानच्या कर्णधाराचं अर्धशतक
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने षटकार ठोकत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
IND vs PAK: पाकिस्तानची दमदार फलंदाजी सुरुच
13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिजवानने आणि चौथ्या चेंडूवर बाबर आजम षटकार ठोकला आहे.
-
-
IND vs PAK: अखेरचे 10 ओव्हर शिल्लक
पाकिस्तान संघाचे 10 ओव्हरची फलंदाजी झाली असून त्यांनी 71 धावा केल्या आहेत. आता उर्वरीत 10 षटकात त्यांना 81 धावा करायच्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा एकही फलंदाज बाद झालेला नाही.
-
IND vs PAK: पावरप्ले पाकिस्तानच्या पारड्यात
पावरप्लेमध्ये पाकिस्तान संघाने दमदार फऱलंदाजी करत 43 धावा एकही विकेट न गमावता केल्या आहेत.
-
IND vs PAK: पाचव्या षटकात पाक संघाचे 2 चौकार
मोहम्मद शमी फेकत असलेल्या पाचव्या षटकात पाकिस्तानने दोन चौकार लगावले आहेत.
-
IND vs PAK: दुसऱ्या षटकातही बाबरने लगावला चौकार
दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवरही बाबरने चौकार लगावला आहे. 2 ओव्हरनंतर पाकिस्तानचा स्कोर 18 झाला आहे.
-
IND vs PAK: पाकिस्तानची दमदार सुरुवात
पाकिस्तानच्या बाबरने दमदार सुरुवात करत दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि षटकार लगावला आहे.
-
IND vs PAK: पाकिस्तानचे सलामीवीर मैदानात
152 धावा करण्यासाठी पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिजवान आणि बाबर आजम फलंदाजीला आले आहेत.
-
IND vs PAK: पाकिस्तानसमोर 152 धावांचे आव्हान
त्यंत खराब सुरुवात होऊनही भारताने कमबॅक करत 151 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या आहेत. यामध्ये कर्णधार कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा करत थो़डा डाव सावरला. ज्यामुळे पाकसमोर 152 धावांचे आव्हान आहे.
-
विराटचा नवा रेकॉर्ड
विराटने सामन्यात अर्धशतक झळकावत टी20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं लगावण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 9 अर्धशतकं लगावली होती. विराटनेही 9 अर्धशतकं लगावली असून आजच्या अर्धशतकासह त्याची टी20 विश्वचषकात 10 अर्धशतकं झाली आहेत.
-
IND vs PAK: जाडेजा तंबूत परत
रवींद्र जाडेजाने विराट पाठोपाठ एक चौैकार लगावला आहे. पण पुढच्याच चेंडूवर मोहम्मद नवाजने त्याचा झेल पकडला आहे.
-
IND vs PAK: विराटचा आणखी एक चौकार
अर्धशतक पूर्ण होताच विराटने हात खोलण्यास सुरुवात केली असून त्याने एक तडफदार चौकार लगावला आहे.
-
IND vs PAK: विराटचं दमदार अर्धशतक
अत्यंत तणावाखाली खेळत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार अर्धशतक ठोकत संघाचा डाव सांभाळला आहे.
-
IND vs PAK: विराटचे लागोपाठ चौकार
विराटने दोन चौैकार लगावत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. 16 व्या षटकात त्याने हसन अलीला चौकार लगावले आहेत.
-
IND vs PAK: भारतीय संघाचं शतक पूर्ण
भारतीय संघाचं अखेर शतक पूर्ण झालं असून 15 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 100 धावा आहे. सध्या विराट आणि रवींद्र जाडेजा फलंदाजी करत आहेत.
-
IND vs PAK: विराटने खेचला चौकार
विराट कोहलीने 14 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मागच्या बाजूस चौकार लगावला आहे.
-
IND vs PAK: ऋषभ पंत झेलबाद
चांगल्या लयीत असलेला ऋषभ पंत 39 धावा करुन 13 व्या षटकात झेलबाद झाला आहे.शादाब खानच्या ओव्हरमध्ये त्यानेच पंतचा झेलही घेतला आहे.
-
IND vs PAK: ऋषभ पंतकडून लागोपाठ दुसरा षटकार
ऋषभने 12 व्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन षटकार लगावले आहेत.
-
IND vs PAK: ऋषभ पंतचा उत्तुंग षटकार
पंतने दमदार असा 80 मीटरचा षटकार तेही एका हाताच्या जोरावर लगावला आहे.
-
IND vs PAK: भारताच्या फलंदाजीचा अर्धा डाव समाप्त
भारतीय फलंदाजानी 10 ओव्हर खेळून झाल्या आहेत. भारताचे 3 गडी बाद झाले असून 60 धावा झाल्या आहेत.
-
IND vs PAK: पंतचा आणखी एक चौकार
10 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऋषभ पंतने एक उत्तम गॅपमध्ये चेंडू मारत चौकार लगावला आहे.
-
IND vs PAK: पंतने लगावला चौकार
9 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पंतने स्वीप शॉट लगावत मागच्या बाजूस चौकार खेचला आहे.
-
IND vs PAK: पंत थोडक्यात वाचला
ऋषभ पंत थोडक्यात बाद होता होता वाचला आहे. 8 व्या ओव्हरमध्ये हाफीजच्या चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला पाककडून अपील करण्यात आली पण पंचानी नाबाद दिले. तरी पाकने रिव्ह्यूय घेतला. पण तिसऱ्या पंचानीही नाबाद दिल्यानंतर पंत वाचला आणि पाकचा एक रिव्ह्यूयही वाया गेला आहे.
-
IND vs PAK: विराटचा शानदार स्केवर कट
विराट कोहलीने शानदार स्केवर कट मारत चौैकार लगावला आहे.
-
IND vs PAK: सूर्यकुमार यादव तंबूत परत
थोड्या चांगल्या लयीत दिसणारा सूर्यकुमार यादवही यष्टीरक्षकाच्या हाती हसन अलीच्या चेंडूवर झेलबाद झाला आहे.
-
IND vs PAK: कर्णधार कोहलीचा षटकार
सूर्यापाठोपाठ कोहलीही आता हात खोलायला बघत असून त्याने शाहीन आफ्रिदीला षटकार लगावला आहे.
-
IND vs PAK: सूर्याचा चौकार
षटकार लगावल्यानंतर सूर्यकुमारने चौथ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर चौैकार लगावला आहे.
-
IND vs PAK: सूर्याने लगावला पहिला षटकार
दोन विकेट पटापट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिला वहिला षटकार लगावला आहे.
-
IND vs PAK: शाहीनला दुसरं यश, राहुल तंबूत परत
केएल राहुलही त्रिफळाचीत होत तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे शाहीन आफ्रिदीनेच त्याचीही विकेट घेतली आहे.
-
IND vs PAK: रोहित शर्मा बाद
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला आहे.
-
IND vs PAK: भारताचे सलामीवीर मैदानात
प्रथम फलंदाजी आली असल्याने भारताचे फलंदाज मैदानात आले आहेत. सध्या केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात आहेत.
-
पाकिस्तानचे अंतिम 11
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ
-
भारताचे अंतिम 11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
-
India vs Pakistan Toss result: नाणेफेक जिंकत पाकिस्तानची प्रथम गोलंदाजी
नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
? Toss Update ?
Pakistan have elected to bowl against #TeamIndia. #T20WorldCup #INDvPAK
Follow the match ▶️ https://t.co/eNq46RHDCQ pic.twitter.com/YT4Y3zTwYP
— BCCI (@BCCI) October 24, 2021
-
IND vs PAK: पाकिस्तानने जाहीर केला 12 सदस्यीय संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.
-
बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामना सुरु
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सध्या शारजाहच्या मैदानात बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामना सुरु असून बांग्लादेश प्रथम फलंदाजी करत आहे.
-
IND vs PAK: दोन्ही संघाचे संभाव्य अंतिम 11
भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
पाकिस्तान– बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.
-
IND vs PAK: भारतच आतापर्यंत सरस
भारत आणि पाकिस्तान T20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा आमने-सामने आले आहेत. यात दरवेळी भारताने विजय मिळवला आहे. तर एकूण T20 सामन्यांचा विचार करता 8 वेळा दोघेही भिडले असून भारत 6 वेळा तर पाकिस्तान 1 एकदा जिंकली असून एक सामना अनिर्णीत सुटला आहे.
-
IND vs PAK: भारताचा विश्वचषक प्रवास सुरु
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
Published On - Oct 24,2021 3:41 PM